• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • मॅच्यूरिटीआधी FD तोडल्यास नाही द्यावा लागणार दंड, ही बँक देते आहे सुविधा

मॅच्यूरिटीआधी FD तोडल्यास नाही द्यावा लागणार दंड, ही बँक देते आहे सुविधा

आपात्कालीन परिस्थितीमध्ये ग्राहकांना मॅच्यूरिटीआधी त्यांची एफडी (Fixed Deposit) तोडावे लागते. अशावेळी त्यांना काही निश्चित स्वरुपात दंडाची रक्कम बँकेला द्यावी लागते. पण ही बँक (Axis Bank) ग्राहकांना एक खास सुविधा देते आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 जानेवारी: खाजगी क्षेत्रातील बँक अ‍ॅक्सिस बँक (Axis Bank) ने त्यांच्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. 15 डिसेंबर 2020 आणि त्यानंतर 2 वर्ष किंवा अधिक त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी बुक करण्यात आलेल्या नवीन रिटेल टर्म डिपॉझिटवर, वेळेआधी ते बंद करण्यावर दंड न आकारण्याची घोषणा अलीकडेच करण्यात आली आहे. ही सूट नवीन एफडी आणि आरडीवर मिळेल. बँकेने अशी माहिती दिली आहे की, या सवलतीचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना FD किंवा RD 15 महिन्यांसाठी सुरू ठेवावी लागेल. यामध्ये 15 महिने पूर्ण झाल्यानंतर ग्राहक एफडी किंवा आरडी तोडतात, तर त्यांना कोणत्याही प्रकारची प्री-मॅच्यूअर पेनल्टी द्यावी लागत नाही. याआधी जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर तुम्ही जमा केलेल्या रकमेच्या 25 टक्के रक्कम कोणतीही पेनल्टी न देता काढू शकता. साधारणपणे मॅच्यूरिटीआधी पैसे काढल्यास ग्राहकांना निश्चित दंड भरावा लागतो. नव्या कोरोना स्ट्रेनची भीती; तब्बल 47 खेळाडू क्वारंटाइन, प्रॅक्टिसही नाकारली काय आहे प्रीमॅच्यूअर विड्राल? प्रीमॅच्यूअर विड्रॉल अशी सुविधा आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांना आवश्यकतेनुसार मॅच्युरिटीपूर्वी गुंतवणूकीचे पैसे काढता येतात. आपत्कालीन परिस्थितीत ग्राहक अगोदरच त्यांची एफडी तोडतात, अशावेळी त्यांना दंड म्हणून बँकेला निश्चित रक्कम भरावी लागते. सामान्यत: एफडीमध्ये प्रीमॅच्यूअर विड्रालमध्ये व्याजाच्या रकमेवर साधारणपणे 1 टक्के दंड आकारला जातो. गुजरातमधील तरुणाचा प्रताप; अमेरिकेतील वयोवृद्धाला तब्बल 58 कोटींचा घातला गंडा उदाहरणार्थ- 5 वर्षांची एफडी 1 वर्षातच तोडायची झाल्यास गुंतवणूक- 1 लाख रुपये एफडीचा कालावधी - 5 वर्ष 5 वर्षांसाठी व्याज- 7 टक्के 1 वर्षांसाठी व्याज- 6 टक्के आणि जर पेनल्टी 1 टक्का आहे आणि एफडी 1 वर्षानंतर तोडली तर प्रभावी व्याजदर 6-1=5 आकारला जाईल.
  Published by:Manoj Khandekar
  First published: