तुम्ही देखील या कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण

तुम्ही देखील या कंपनीचे शेअर खरेदी केले असतील तर मिळणार नाही एकही रुपया, काय आहे कारण

शेअर बाजारात (Share Market) अगदी अल्पावधीत मोठी कमाई करता येत असली तरी अनेकदा अंदाज चुकतात आणि क्षणात आपली गुंतवणूक मातीमोल होऊ शकते. असाच फटका सध्या गुंतवणूकदारांना एका दिग्गज उद्योगसमूहाकडून मिळाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जून: शेअर बाजारात (Share Market) अगदी अल्पावधीत मोठी कमाई करता येत असली तरी अनेकदा अंदाज चुकतात आणि क्षणात आपली गुंतवणूक मातीमोल होऊ शकते. म्हणूनच अत्यंत सावधपणे अभ्यासपूर्वक गुंतवणूक करणं महत्त्वाचं असतं. असाच फटका सध्या गुंतवणूकदारांना एका दिग्गज उद्योगसमूहाकडून मिळाला आहे. एकेकाळी कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातला दिग्गज ब्रँड असलेला व्हिडीओकॉन समूह (Videocon Group) कर्जबाजारी झाला असून, दिवाळखोरीत निघाला आहे. या समूहातल्या दोन कंपन्यांची शेअर बाजारातली नोंदणीही (Listings) समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्याकडे या दोन कंपन्यांचे शेअर्स असतील तर त्यांची किंमत आता शून्य झाली आहे. या शेअर्सच्या बदल्यात काहीही परतावा देण्यास कंपनीनं नकार दिला आहे. यामुळे या कंपन्यांचे शेअर्स असणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.

व्हिडीओकॉन समूहाच्या या दोन कंपन्यांचे (लिक्विडेशन) बाजारमूल्य थकित कर्जाची पूर्तता करण्यासाठी पुरेसे नाही. व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेड (VIL) आणि व्हॅल्यूज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांना दिवाळखोर घोषित केल्यानं शेअर बाजारानं त्यांची नोंदणी समाप्त केली आहे. थोडक्यात या कंपन्यांना आता शेअर बाजारातून काढून टाकण्यात आलं आहे.

हे वाचा-मोदी सरकारच्या या योजनेत दरमहा जमा करा 55 रुपये, तुमच्या खात्यात येतील 36 हजार

1991 मध्ये औरंगाबादमधील धूत ब्रदर्सनी (Dhoot Brothers) सुरू केलेला व्हिडीओकॉन हा देशातला सर्वांत नामांकित इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅंड (Electronics Brand) म्हणून प्रसिद्ध झाला होता. तब्बल 59 हजार 457 कोटी रुपयांचं थकीत कर्ज असलेल्या व्हिडीओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडचं (Videocon Industries Limited) अधिग्रहण अनिल अग्रवाल यांच्या वेदान्ता समूहाकडून (Vedanta Group) केलं जाणार आहे. त्यासाठी कंपनीला 292 कोटी रुपये देण्यात येणार आहेत.

व्हिडीओकॉनचं काय आहे म्हणणं?

या कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या एका अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे, की या दोन्ही कंपन्यांच्या कोणत्याही समभागधारकांना शेअर्सची नोंदणी रद्द करताना कोणतीही ऑफर दिली जाणार नाही. सेबीच्या नियमांनुसार, ज्या कंपनीला स्टॉक एक्स्चेंजमधून बाहेर पडायचं असेल त्यांनी सर्व भागधारकांना ऑफर देणं आवश्यक आहे.

हे वाचा-EPFO Alert! सब्सक्रायबर्सना नॉमिनीचं आधारही करावं लागणार लिंक, वाचा सविस्तर

कंपनीनं अशी ऑफर न देण्यामागे काय आहे कारण?

व्हॅल्यूज इंडस्ट्रीज लिमिटेडनं म्हटलं आहे, की केवळ व्हिडीओकॉन समूहाच्या कंपनीचं (लिक्विडेशन) बाजारमूल्य कंपनीचं कर्ज परतफेड करण्यासाठी पुरेसं नाही. म्हणूनच समभागधारकांच्या शेअर्सचं मूल्य 'शून्य' आहे. त्यामुळे समभागधारकांना त्यांच्या शेअर्सचं कोणतंही मूल्य मिळणार नाही. व्हिडीओकॉन समूहाच्या समभागधारकांना त्यांचे समभाग कंपनीकडे देण्याचीही आवश्यकता नाही.

Published by: Janhavi Bhatkar
First published: June 19, 2021, 8:03 PM IST

ताज्या बातम्या