तुम्ही Credit Card वापरता? मग न विसरता 'या' गोष्टी कराच

तुम्ही Credit Card वापरता? मग न विसरता 'या' गोष्टी कराच

हल्ली क्रेडिट कार्ड खूप महत्त्वाचं झालंय. ते सोयीचंही पडतं.

  • Share this:

मुंबई, 09 मे : हल्ली क्रेडिट कार्ड खूप महत्त्वाचं झालंय. ते सोयीचंही पडतं. बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना रिवाॅर्ड पाॅइंट्स ( Rewad Points ) देतं. कार्डधारक किती पैसे खर्च करतोय त्यावर हे रिवाॅर्ड पाॅइंट्स अवलंबून असतात. तुम्ही मिळालेले रिवाॅर्ड पाॅइंट्स रिडिम केले नाहीत तर तुमचं नुकसान होऊ शकतं. जाणून घ्या रिवाॅर्ड पाॅइंट्स रिडिम करण्याची पद्धत -

मुंबईहून निघणाऱ्या पहिल्या Bullet Train मध्ये मिळतील 'या' सुविधा, पाहा VIDEO

काय आहे रिवाॅर्ड पाॅइंट्स?

कुणीही ग्राहक क्रेडिट कार्डाच्या खरेदीवर रिवाॅर्ड पाॅइंट्स मिळवू शकतात. क्रेडिट कार्डावर खर्च केलेल्या पैशावर तुम्हाला रिवाॅर्ड पाॅइंट्स मिळतात. बँक आणि वस्तू यांच्या आधारावर प्रत्येक पाॅइंट्सची किंमत 0.25पासून 1पर्यंत असते. तुम्ही सहा महिने किंवा वर्षभरच्या क्रेडिट कार्डाच्या खरेदीच्या हिशेबावर जमा झालेले रिवाॅर्ड पाॅइंट्स एकत्र करून त्याचा उपयोग करू शकता.

रिवाॅर्ड पाॅइंट्स कसे वापरायचे?

ग्राहक खर्च करताना रिवाॅर्ड पाॅइंट्स मिळवतात. ते नेट बँकिंग किंवा फोन बँकिंगद्वारे अनेक वस्तू आणि वाउचर्ससाठी रिडिम करता येतात. म्हणजे ग्राहकांनी एक्सपायरी डेटकडे लक्ष दिलं पाहिजे.

...म्हणून 7व्या दिवशी शेअर बाजार कोसळला, तुमचेही पैसे लागलेत पणाला

काय आहे पद्धत?

बँक आपल्या ग्राहकांना Credit Card रिवाॅर्ड पाॅइंटच्या बदल्यात गिफ्टचा कॅटलाॅग देतो. त्यातून तुम्ही गिफ्टची निवड करायची. यात क्राॅकरी, खाण्या-पिण्याचे पदार्थ, गिफ्ट वाउचर आणि कपडे हे पर्याय असतात.

अनेक बँका ग्राहकांना क्रेडिट कार्ड रिवाॅर्ड पाॅइंट रिडिम करण्यासाठी पैसे देतात. हे पैसे क्रेडिट कार्डाच्या बॅलन्सशी जोडले जातात. त्यांचा उपयोग तुम्ही क्रेडिट कार्डानं केलेल्या कुठल्याही गोष्टीसाठी करू शकता. म्हणजे बिल भरणं इत्यादी.

मुंबईहून बँकाॅकला जा फक्त 10 हजार रुपयांत, 'या' विमानकंपनीनं दिलीय मोठी ऑफर

यात अनेक बँका ग्राहकांना सुविधाही देतात. त्यात सुट्टीचं पॅकेज, हाॅटेल बुकिंगसाठीही क्रेडिट कार्डाच्या रिवाॅर्ड पाॅइंट्सचा उपयोग करता येतो.

VIDEO : जब मिले दो यार, मग मैदानात नुसता राडा!

First published: May 9, 2019, 7:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading