घरबसल्या पोस्टाच्या India Post Payments Bank मध्ये कसे उघडाल खाते? हे आहे फीचर्स

घरबसल्या पोस्टाच्या India Post Payments Bank मध्ये कसे उघडाल खाते? हे आहे फीचर्स

इंड‍िया पोस्‍ट पेमेंट्स बँक अर्थात आयपीपीबी (India Post Payments Bank/IPPB) ही भारत सरकारच्या टपाल विभाग आणि दळणवळण मंत्रालयांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून, यात सरकारची 100 टक्के भागीदारी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : इंड‍िया पोस्‍ट पेमेंट्स बँक अर्थात आयपीपीबी (India Post Payments Bank/IPPB) ही भारत सरकारच्या टपाल विभाग आणि दळणवळण मंत्रालयांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून, यात 100 टक्के भागीदारी आहे. आयपीपीबी बचत खात्यावर सध्या 2.75 टक्के व्याज दिले जात आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही बँक प्रत्यक्षात कुणाला कर्ज नाही देऊ शकत. इंड‍िया पोस्‍ट पेमेंट्स बँक सामान्य माणसासाठी एक सोयीस्कर आणि परवडणारी बँक आहे कारण याअंतर्गत ग्राहकांना पोस्टाच्या नेटवर्कमधील विविध फायदे मिळतात.

आयपीपीबी Digital Saving Account उघडण्यासाठी आवश्यक बाबी

1. हे खाते उघडण्यासाठी कमीत कमी वय 18 वर्षे आहे

2. खाते उघडल्यानंतर 12 महिन्यांच्या आत केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. याकरता तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा चेक पॉईंटमध्ये तुमची कागदपत्र जमा करावी लागतील

3. केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचे Digital Saving Account, Regular Saving Account मध्ये अपग्रेड होते.

आयपीपीबी मध्ये ऑनलाइन बँक खाते उघडण्याची प्रक्रिया

1. गुगल प्ले स्टोअरवरून आयपीपीबीचे App डाऊनलोड करा

2. त्याठिकाणी देण्यात आलेल्या ओपन युअर अकाऊंट नाऊ ( Open Your Account Now) वर क्लिक करा.

(हे वाचा-कर्जावरील व्याज सवलतीबाबत सरकारकडून गाइडलाइन्स जारी, खात्यात परत येतील पैसे)

3. त्यानंतर तुमचा मोबाइल नंबर टाका

4. याठिकाणी तुमच्या पॅन क्रमांकाची आणि आधार क्रमांकाची गरज भासेल

5. त्यानंतर विचारण्यात आलेली माहिती भरून तुम्ही खाते उघडू शकता

विद्यमान ग्राहकांनी आयपीपीबी अ‍ॅप कसे वापरावे

1. IPPB APP मध्ये जाऊम तुम्हाला अकाऊंट नंबर, कस्टमर आयडी, जन्मतारिख आणि रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक टाकावा लागेल.

2. रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल

3. त्यानंतर MPIN सेट करून ओटीपी टाकावा लागेल. अशाप्रकारे विद्यमान ग्राहकांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होईल

IPPB मोबाइल APPचे फीचर

IPPB APPच्या माध्यमातून ग्राहक विविध प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू शकतात. या माध्यमातून तुम्ही खात्यातील बॅलन्स तपासू शकता, फंड ट्रान्सफर करू शकता किंवा याव्यतिरिक्तही काही महत्त्वाचे ट्रान्झॅक्शन करू शकता.

1. खात्यातील शिल्लक रकमेची माहिती

2. बँक स्टेटमेंटसाठी रिक्वेस्ट

(हे वाचा-सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक खूशखबर! पगारवाढ करण्याच्या तयारीत सरकार)

3. चेकबुकसाठी रिक्वेस्ट

4. चेकचे पेमेंट थांबवण्यासाठी रिक्वेस्ट

5. बँक नेटवर्क अंतर्गत फंड ट्रांसफर

6. दुसर्या बँक खात्यामध्ये फंड ट्रांसफर

7. वीज, पाणी आणि युटिलिटी बिलांचे पेमेंट

8. मोबाइल आणि डीटीएच रिचार्ज

Published by: Janhavi Bhatkar
First published: October 24, 2020, 1:17 PM IST

ताज्या बातम्या