या सोप्या पद्धतीनं मिळवा आपलं मतदान ओळखपत्र, असा भरा ऑनलाईन अर्ज

मतदान ओळखपत्र हे फक्त मतदानापुरतं मर्यादेत न राहता ते ओळखपत्र म्हणून वापरलं जातं. आता मतदान ओळखपत्रासाठी तुम्हाला शासकीय कार्यालयाला खेपा माराव्या लागणार नाही. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्हाला अर्ज करता येणार आहे. यासाठी नेमकं काय करावं जाणून घ्या.

News18 Lokmat | Updated On: Nov 29, 2018 06:42 AM IST

या सोप्या पद्धतीनं मिळवा आपलं मतदान ओळखपत्र, असा भरा ऑनलाईन अर्ज

आधार कार्डनंतर आता मतदान ओळखपत्राची गरज वाढली आहे. कारण मतदान ओळखपत्र हे फक्त मतदानासाठी नव्हे तर ओळखपत्र म्हणून त्याचं महत्त्व वाढलं आहे. तुम्ही जर आतापर्यंत मतदान ओळखपत्र बनवलं नसेल तर ऑनलाईन अर्ज करू शकता.

मतदान ओळखपत्रासाठी लागणारी कागदपत्रं तम्हाला स्कॅन करून अपलोड करावी लागतील. यासाठी तुमच्याकडे शिक्षण संस्थेचा शाळा सोडल्याचा दाखला, भारतीय पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे.

मतदान ओळखपत्र बनवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन प्रक्रिया करावी लागेल. नॅशनल वोटर सर्विसेज पोर्टल (National Voter Services Portal) या वेबसाईटवर जाऊन Apply online for registration of new voter/due to shifting from AC यावर क्लिक करा. यानंतर फॉर्म 6 ची विंडो उघडेल. त्यात दिलेला तपशील भरा.

Loading...

वेबसाईटवर दिलेली भाषा तुम्हाला समजत नसेल तर सगळ्यात वरील बाजुला ड्रॉप डाऊन मेन्युवर क्लिक करून तुमच्या सोयीनुसार भाषा निवडा. यानंतर आपआपल्या राज्यातील विधानसभा किंवा लोकसभा क्षेत्र निवडल्यावर तुमचं नाव, वय आणि पत्ता भरा.

तपशील भरून झाल्यावर तेथे संपर्क (Contact) तपशील द्यावा आणि त्यानंतर तुमच्या कुटुंबातील ज्या व्यक्तीचं नाव मतदान यादीत आहे त्या सदस्यांची माहिती भरावी.

ज्यावर स्टारचं चिन्ह असेल तिथे आवश्यक तपशील भरणं बंधनकारक आहे. यानंतर तुमच्या जवळ असलेल्या कागदपत्रांची स्कॅन फाईल अपलोड करावी. फॉर्म भरल्यानंतर ठिकाण आणि तारीख नमूद करावी.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्ही भरलेला फॉर्म सेव्ह करा. त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करावं. क्लिक केल्यावर तुम्हाला लिंकसोबतच एक ईमेल मिळेल. त्यामुळे तुम्ही मतदान ओळखपत्र अर्जाची हालचाल तुम्हाला कळेल.

यानंतर तुम्हाला 30 दिवसांच्या आत तुमचं मतदान ओऴखपत्र नमूद केलेल्या पत्त्यावर दिलं जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2018 06:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...