बँक खात्याचा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक बदलायचा आहे? घरबसल्या करा हे काम

बँक खात्याचा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक बदलायचा आहे? घरबसल्या करा हे काम

बँक खात्याशी मोबाइल नंबर (Mobile Number) जोडलेला असेल, तर खात्याशी संबंधित अगदी बारीकसारीक गोष्टींचे अपडेट्सही आपल्याला मिळत राहतात

  • Share this:

नवी दिल्ली, 12 जानेवारी: बँक खात्याशी (Bank Account) मोबाइल नंबर जोडलेला असणं किती महत्त्वाचं आहे, हे गेल्या काही वर्षांत आपल्याला समजलं आहे. दिवसेंदिवस त्याची उपयोगिता वाढते आहे. बँक खात्याशी मोबाइल नंबर (Mobile Number) जोडलेला असेल, तर खात्याशी संबंधित अगदी बारीकसारीक गोष्टींचे अपडेट्सही आपल्याला मिळत राहतात; पण बँक खात्याशी जोडलेल्या नंबरला काही समस्या निर्माण झाली किंवा आपला मोबाइल नंबर बदलला, तर मोठी अडचण होऊ शकते. अलीकडे खोट्या मोबाइल नंबरच्या साहाय्याने बँकेचे अनेक घोटाळे (Frauds) केले जात आहेत. तसं काही झालं तर बँक खातं रिकामंही होऊ शकतं. त्यामुळे आपला मोबाइल नंबर बदलला, तर बँकखात्याशी निगडित नंबरही लगेचच बदलून घेतला पाहिजे.

कोणत्याही बँकेच्या खात्याशी जोडलेला मोबाइल नंबर (Registered Mobile Number) बदलायचा असेल, तर काही अगदी सोप्या अशा काही स्टेप्समध्ये तुम्ही तो नंबर बदलू शकता. बँकखात्याशी निगडित मोबाइल नंबर ऑनलाइन (Online Method) आणि ऑफलाइन (Offline Method) अशा दोन्ही पद्धतीने बदलता येऊ शकतो.

ऑनलाइन अर्थात घरसबल्या असा बदला बँकेमध्ये रजिस्टर्ड मोबाइल नंबर 

- तुमच्याकडे नेटबँकिंगची (Netbanking) सुविधा असेल, तर तुम्ही अगदी घरसबल्या मोबाइल किंवा कम्प्युटरद्वारे बँक खात्याशी जोडलेला नंबर बदलू शकता.

(हे वाचा-आठवडाभरात गमावला 'सर्वात श्रीमंत व्यक्ती'चा मान, Elon Musk दुसऱ्या क्रमांकावर)

- आपण एक उदाहरण पाहू या. तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियात (SBI) खातं असेल, तर सर्वांत आधी तुम्हाला नेटबँकिंगच्या वेबसाइटवर म्हणजे www.onlinesbi.com या लिंकवर जावं लागेल. त्यानंतर तुम्ही जेव्हा अकाउंटमध्ये लॉगिन कराल, तेव्हा तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करावं लागेल.

- त्यानंतर पर्सनल डिटेल्स या पर्यायावर क्लिक करावं.

- त्यानंतर तुम्हाला प्रोफाइल पासवर्ड द्यावा लागेल.

- पासवर्ड सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ई-मेल आयडी आणि तुमचा जुना मोबाइल नंबर दिसेल. तसंच मोबाइल नंबर बदलण्याचा पर्यायही तिथे उपलब्ध असेल.

- तिथे दिलेल्या सूचनांचा अवलंब करून तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर बदलता येईल.

ऑफलाइन पद्धत

(हे वाचा-कोरोनाचा परिणाम! आरोग्य क्षेत्रासाठी सरकार आणणार नवी फंड योजना)

इंटरनेट बँकिंगची सुविधा तुम्ही वापरत नसाल, तर तुम्हाला बँकेत जाऊन मोबाइल नंबर बदलून घ्यावा लागेल. त्यासाठी तुमचं खातं बँकेच्या ज्या शाखेमध्ये आहे, तिथे जाऊन मोबाइल नंबर बदलण्याकरिताचा फॉर्म तुम्हाला भरावा लागेल. त्यासोबत तुम्हाला तुमच्या पासबुकची आणि आधार कार्डची प्रतही द्यावी लागेल. त्यानंतर बँक त्यांच्याकडे नोंदणीकृत असलेला तुमच्या खात्याशी संलग्न मोबाइल नंबर बदलून देईल.

तुमचा मोबाइल नंबर, ई-मेल आयडी, वास्तव्याचा पत्ता यांमध्ये काहीही बदल झाला, तर लगेचच ही माहिती बँक खात्यात बदलून घेणं ही आपली जबाबदारी आहे. कारण समजा  दुर्दैवाने कधी काही संशयास्पद व्यवहार झालेच, तर त्या वेळी आपली माहिती अपडेट असेल तरच बँक आपल्याशी संपर्क साधून आपल्याला माहिती देऊ शकेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 12, 2021, 6:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading