मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कंपन्या सेलमध्ये 80-90% पर्यंत सूट देऊनही कशा कमवतात भरघोस नफा? हे आहे गणित

कंपन्या सेलमध्ये 80-90% पर्यंत सूट देऊनही कशा कमवतात भरघोस नफा? हे आहे गणित

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन वर वार्षिक सेल सर्वांसाठी सुरू झाला आहे. काही उत्पादनांवर कंपन्या 80-90 टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत. अशा परिस्थितीत एवढी मोठी सूट देऊनही या कंपन्या नफ्यात कशा राहतात, असा प्रश्न मनात येतो.

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन वर वार्षिक सेल सर्वांसाठी सुरू झाला आहे. काही उत्पादनांवर कंपन्या 80-90 टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत. अशा परिस्थितीत एवढी मोठी सूट देऊनही या कंपन्या नफ्यात कशा राहतात, असा प्रश्न मनात येतो.

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन वर वार्षिक सेल सर्वांसाठी सुरू झाला आहे. काही उत्पादनांवर कंपन्या 80-90 टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत. अशा परिस्थितीत एवढी मोठी सूट देऊनही या कंपन्या नफ्यात कशा राहतात, असा प्रश्न मनात येतो.

  • Published by:  Rahul Punde
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनवर सध्या वार्षिक सेल सुरू झाला आहे. सेलमध्ये स्मार्टफोन, कपडे, गृहोपयोगी उपकरणे, गॅजेट्ससह इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे. ई-कॉमर्स कंपन्या काही उत्पादनांवर 80-90 टक्क्यांपर्यंत सूट देत आहेत. एकीकडे अॅमेझॉन इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर 75 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे, तर फ्लिपकार्टही यात मागे नाही. फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीज उत्पादनांवर 80% पर्यंत सूट देत आहे. अशा स्थितीत मनात प्रश्न येतो की, या कंपन्या एवढी मोठी सूट कशी देतात? या कंपन्या मोठ्या सवलती देऊन काही कमावतात की खिशातले पैसे घालतात? एवढी स्वस्त उत्पादने विकूनही कंपन्या नफा कमावतात, तो नेमका कसा? सामान्य लोकांना हे समजणे थोडे कठीण असले तरी ते कसे शक्य आहे, हे आपण समजून घेऊया. नुकसानापासून सुरुवात ऑनलाइन प्लॅटफॉर्म आज निःसंशयपणे नफा कमवत आहेत. मात्र, त्यांची सुरुवात तोट्याने झाली होती. सुरुवातीला लोकांना ऑनलाइन खरेदीचे आमिष दाखवल्यानंतर आता या कंपन्या नफाही कमावत आहेत. पूर्वी बहुतेक लोक ऑनलाइन खरेदी करणे टाळत असत. मात्र, आज वेळ अशी आहे की प्रत्येकजण ऑनलाइन खरेदीला महत्त्व देतो. सुरुवातीला बड्या गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये घेऊन उत्पादने तोट्यात विकली गेली आणि लोकांच्या सवयी बदलल्या. वाचा - एक सेकंद थांबा! ऑनलाईन फोन घेताना तुम्ही तर करत नाही 'या' चूका, नाहीतर Offer पडेल महागात विक्री वाढवून नफा कमी करत व्यवस्थारली कमाईचे दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे तुम्ही महागड्या किमतीत वस्तू विकता आणि कमी ग्राहक आल्यावरही नफा मिळवता आणि दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही प्रति ग्राहक नफा कमी करून वस्तू स्वस्तात विकता. पहिल्या मार्गाने, आज तुम्हाला वस्तू एका मर्यादेपेक्षा जास्त महाग करण्यात अडचण जाणवेल. मात्र, अन्य मार्गाने दर कमी करून, तुम्ही मोठ्या संख्येने ग्राहकांना तुमच्याकडे आकर्षित करू शकता. त्यामुळे ई-कॉमर्स कंपन्या सेलच्या दिवसांत ही दुसरी पद्धत अवलंबतात. भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी, ज्याची सुरुवात नवरात्रीपासून होते. या दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत कंपन्यांचा पूर्ण भर जास्तीत जास्त विक्री करण्यावर आहे. दरम्यान, सूट देऊन नफा कमी केला जातो. पण एकूणच बघितले तर ही विक्री इतकी मोठी आहे की या दिवसात वर्षभराची कमाई होते. कंपन्या आणि विक्रेते दोघेही करार करतात ग्राहकांना सवलत देण्यात प्लॅटफॉर्म आणि विक्रेते दोन्ही महत्त्वाची भूमिका बजावतात. विक्रीदरम्यान व्हॉल्यूम वाढवण्यासाठी प्लॅटफॉर्म त्यांचे कमिशन कमी करतात, तर विक्रेते त्यांच्या जुन्या वस्तूंच्या विक्रीसाठी सूट देतात. ही सवलत मर्यादित संख्येत उपलब्ध होते. वाचा : Smartphone Guidelines: सावधान! स्मार्टफोन युजर्ससाठी केंद्र सरकारची नवी गाईडलाईन, ‘या’ गोष्टी न करण्याचा सल्ला वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री ऑनलाइन प्लॅटफॉर्म कंपन्यांकडे जागतिक बाजारपेठ असते. ती जगात कुठेही कोणतेही उत्पादन विकू शकते. अनेक वेळा ऑनलाइन प्लॅटफॉर्म जगभरातील बाजारपेठ काबीज करण्यासाठी उत्पादनाची कमी फरकाने विक्री करते. कंपन्या कमी मार्जिनवर माल विकत असल्या तरी मोठ्या प्रमाणात वस्तू विकल्यामुळे त्यांना नफा मिळतो. मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री केल्याने कंपनीला नफा तर होतोच, पण विक्रेत्याचा नफाही वाढतो.
First published:

Tags: Amazon, Flipkart, Online shopping

पुढील बातम्या