मराठी बातम्या /बातम्या /मनी /PF अकाउंटमधून Advance रक्कम काढणं कितपत योग्य? जाणून घ्या काय सांगताहेत तज्ज्ञ

PF अकाउंटमधून Advance रक्कम काढणं कितपत योग्य? जाणून घ्या काय सांगताहेत तज्ज्ञ

रक्कम अॅडव्हान्स म्हणून काढता येते, अशी रक्कम काढणं कितपत योग्य आहे?

रक्कम अॅडव्हान्स म्हणून काढता येते, अशी रक्कम काढणं कितपत योग्य आहे?

रक्कम अॅडव्हान्स म्हणून काढता येते, अशी रक्कम काढणं कितपत योग्य आहे?

  नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : देशात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाचा (Corona) कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे लॉकडाउन किंवा कडक निर्बंधाचं पालन करावं लागत असल्यानं दैनंदिन व्यवहारांवर मोठा परिणाम झाल्याचं चित्र आहे. यामुळं सर्वच क्षेत्रांना फटका बसला असून, अनेकांच्या नोकऱ्या (Jobs) अडचणीत आल्या आहेत. कोरोना काळात अनेक कंपन्यांनी पगारकपात केल्यानं कर्मचारी वर्गाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर `ईपीएफओ`नं पीएफ अकाउंटमधून (PF Account) पैसे काढण्यासाठीच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता पीएफ खातेधारकांना पीएफ अॅडव्हान्स काढण्याचा पर्याय `ईपीएफओ`नं (EPFO) उपलब्ध करून दिला आहे. कोरोनाकाळात या खात्यातून सहज पैसे काढता यावेत हा यामागील उद्देश आहे. जी व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबातले सदस्य कोरोनाबाधित झाले आहेत, तसंच ज्यांना कोरोनामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशाच व्यक्तींसाठी ही सुविधा आहे. ही सुविधा नेमकी काय आहे, या अकाउंटमधून किती रक्कम अॅडव्हान्स म्हणून काढता येते, अशी रक्कम काढणं कितपत योग्य आहे, याबाबतची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे.

  कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना तातडीनं आर्थिक मदत मिळावी या उद्देशानं `ईपीएफओ`नं पीएफ अॅडव्हान्स (PF Advance) काढण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यापूर्वी पीएफधारक काही विशिष्ट कारणांसाठीच पीएफ अकाउंटमधून रक्कम काढू शकत होते आणि त्या वेळी अकाउंटमध्ये पुन्हा पैसे येण्यासाठी बराच कालावधी लागत होता. परंतु, आता नियम बदलल्याने अशी स्थिती राहिलेली नाही.

  जाणकारांच्या म्हणण्यानुसार, तुम्हाला पैशांची फारच गरज असेल, तरच तुम्ही पीएफ अकाउंटमधून पैसे काढण्याचा निर्णय घ्यावा. तुम्हाला वैद्यकिय उपचारांसाठी (Medical) पैशांची गरज असेल तरच तुम्ही या अकाउंटमधून पैसे काढावेत. परंतु, या वेळी पैसे काढून तुम्ही अन्यत्र गुंतवणूक (Investment) करण्याचा विचार करत असाल, तर अशी गुंतवणूक चुकीची ठरू शकते. एकदा पीएफ अकाउंटमधून पैसे काढले तर निवृत्तीच्या कालावधीपर्यंत तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं.

  हे वाचा - कर्ज दिल्लीच्या व्यक्तीचं वसुली बीडच्या फिरोजकडून; मोठ्या बँकेचा भोंगळ कारभार

  `ईपीएफओ`ने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी हा निर्णय घेतला होता. ज्या पीएफधारकांना पैशांची गरज आहे, ते पीएफमधून 3 महिन्यांच्या वेतनाइतकी रक्कम काढू शकतात आणि हे पैसे परत करण्याचीही गरज नाही. या नियमांतर्गत खातेधारकाला तीन महिन्यांचं मूळ वेतन आणि महागाई भत्ता किंवा खात्यात जमा रकमेच्या 75 टक्के रक्कम यांपैकी जी कमी असेल ती रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली होती. विशेष म्हणजे अॅडव्हान्सची ही रक्कम काही दिवसांत पुन्हा खात्यात जमा केली जाणार होती. सर्वप्रथम कोरोनाशी निगडित केसेसचा निपटारा केला जातो आणि त्यानंतर सामान्य प्रक्रियेंतर्गत करण्यात आलेल्या क्लेमची रक्कम जमा केली जात असल्याची माहिती `ईपीएफओ`कडून देण्यात आली.

  जाणकारांचं मत लक्षात घेता फार गरज असेल तरच पीएफ अॅडव्हान्स काढण्याचा पर्याय संबंधित कर्मचाऱ्यानं निवडणं योग्य राहील, अन्यथा त्यामुळे होणारं नुकसान निवृत्तीच्या कालावधीपर्यंत सहन करावं लागू शकतं.

  First published:

  Tags: Money, PF Amount