मराठी बातम्या /बातम्या /मनी /नोकरी गेली तरी EPF अकाऊंटमधून होईल कमाई; जाणून घ्या नियम आणि अटी

नोकरी गेली तरी EPF अकाऊंटमधून होईल कमाई; जाणून घ्या नियम आणि अटी

EPF account

EPF account

कोरोना संकटाच्या वेळी बहुतेकांनी आपली नोकरी गमावली. अशा परिस्थितीत त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्याचं (EPF Account) काय होईल असा प्रश्न पडतो.

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Corona lockdown) आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. कंपनीने या कठीण परिस्थितीत कॉस्ट कटिंगसारखे अनेक निर्णय घेतले होते. या दरम्यान लाखो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. काही कर्मचाऱ्यांनी आपली आधीची नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत नोकरी सुरू केली. तुम्ही सुद्धा अशाच लोकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बरेच जण आपली नोकरी सोडल्यानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) ट्रान्सफर करणं विसरून जातात. चला तर मग जाणून घेऊया नोकरी सोडल्यानंतर आपलं पीएफ अकाऊंट (PF account) आणि त्यामध्ये असलेल्या रकमेचं काय होतं.

नोकरी सोडणारे बहुतेक जण आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये गुंतवणूक करत नसतील तरीसुद्धा व्याज मिळाल्याने त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा असलेली रक्कम वाढत असते त्यामुळे ते समाधानी असतात. यासाठी तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचे आहे की, पहिल्या 36 दिवसांमध्ये काहीच योगदान नसल्यानं कर्मचाऱ्यांचं पीएफ अकाऊंट इन-ऑपरेटिव्ह अकाऊंटच्या (In-Operative Account) श्रेणीमध्ये टाकलं जातं.

हे वाचा -  RBI कडून व्याजदरात कोणताही बदल नाही, तुमच्या कर्जाच्या EMI वर काय होईल परिणाम?

अशामध्ये तुम्हाला तुमचं अकाऊंट अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी काही रक्कम तीन वर्षांच्या आत काढावी लागेल. सध्याच्या नियमांनुसार, जर कर्मचारी 55 व्या वर्षी निवृत्त होत असेल आणि त्याने 36 महिन्यांच्या आतमध्ये जमा रक्कम काढण्यासाठी अर्ज केला नाही तर त्याचं पीएफ अकाऊंट निष्क्रिय म्हणजे इन-ऑपरेटिव्ह होईल. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, कंपनी सोडल्यानंतरसुद्धा पीएफ अकाऊंटवर व्याज मिळत असतं आणि 55 वर्षांपर्यंत अकाउंट निष्क्रिय होत नाही.

पीएफमधील रकमेवर मिळणाऱ्या व्याजावर लागतो टॅक्स -

नियमांनुसार, कॉन्ट्रिब्युशन केलं नाही तर पीएफ अकाऊंट निष्क्रिय होत नाही. पण यादरम्यान मिळालेल्या व्याजावर टॅक्स (Tax on Interest Income) लागतो. पीएफ अकाऊंट निष्क्रिय झाल्यानंतरही क्लेम म्हणजेच दावा केला नाही तर त्यामधील रक्कम सीनियर सिटीझस वेलफेयर फंडमध्ये (SCWF) जाते. पीएफ अकाऊंटमध्ये सात वर्षांपर्यंत निष्क्रिय राहिलेली रक्कम क्लेम न केल्यास या फंडमध्ये ट्रान्सफर केली जाते. ईपीएफ आणि एमपी कायदा 1952 च्या कलम 17 अंतर्गत सूट मिळणारे ट्रस्टसुद्धा सिनियर सिटिझन वेलफेयर फंडांच्या नियमांच्या कक्षामध्ये येतात. यांना सुद्धा आपल्या अकाऊंटमधील रक्कम वेलफेयर फंडाला ट्रान्सफर करावी लागते.

25 वर्षांपर्यंत वेलफेयर फंडामध्ये ट्रान्सफर झालेल्या रक्कमेवर करू शकता दावा

पीएफ अकाऊंटमध्ये ट्रान्सफर झालेली आणि क्लेम न केलेली रक्कम 25 वर्षांपर्यंत सिनिअर सिटीझन वेलफेयर फंडामध्ये राहते. या दरम्यान पीएफ अकाऊंटचा खातेधारक या रकमेवर दावा करू शकतो. जुन्या कंपनीत आपली पीएफ रक्कम सोडण्याचा काही विशेष फायदा होत नाही कारण नोकरी न केल्याच्या काळामध्ये कमावलेल्या व्याजावर टॅक्स लागतो.

हे वाचा - Gold Price Today: चार दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याचांदीला झळाळी, वाचा नवे दर

जर तुम्ही 55 वर्षांत निवृत्त होत असाल तर तुमच्या अकाऊंटला निष्क्रिय होऊ देऊ नका. शिल्लक राहिलेली रक्कम लवकरात लवकर काढून घ्या. पीएफ अकाऊंट आपलं वय 55 वर्षे  होईपर्यंत निष्क्रिय होत नाही. तरी सुद्धा पीएफ अकाऊंटमध्ये असलेली रक्कम जुन्या संस्थेतून नवीन संस्थेमध्ये ट्रान्सफर करणंच चांगलं असतं. त्यामुळे सेवानिवृत्त होईपर्यंत बरीच रक्कम जमा होते.

First published:

Tags: Business News, Coronavirus, Income tax, Jobs, Personal finance, Rate of interest