पोस्ट ऑफिस खात्यांच्या नियमांमध्ये बदल; बचत, PF किंवा सुकन्या खातं असल्यास जाणून घ्या ही माहिती

पोस्ट ऑफिस खात्यांच्या नियमांमध्ये बदल; बचत, PF किंवा सुकन्या खातं असल्यास जाणून घ्या ही माहिती

पोस्ट ऑफिसमध्ये छोट्या बचतीसाठी अनेकजण खातं (Post Office Saving Account) उघडतात. बदलत्या काळानुसार पोस्टातील सुविधांमध्येही सुधारणा होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी : पोस्ट ऑफिसमध्ये छोट्या बचतीसाठी अनेकजण खातं (Post Office Saving Account) उघडतात. बदलत्या काळानुसार पोस्टातील सुविधांमध्येही सुधारणा होत आहे. खात्यासंदर्भातील अनेक नियम देखील पोस्टाकडून बदलण्यात आले आहेत. बँकांप्रमाणेच आता पोस्ट ऑफिसमधील खात्यांमध्येही मिनीमम बॅलेन्स मेंटेन (Post office increases minimum balance limit) असणं आवश्यक आहे. 1 एप्रिलपर्यंत तुमच्या खात्यामध्ये ही कमीत कमी शिल्लक नसेल तर 100 रुपये तुमच्या खात्यातून कापण्यात येतील. पोस्ट ऑफिसनं बचत खात्यातील कमीत कमी रक्कम 50 रुपयांवरून 500 रुपये केली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या खात्यात कमीत कमी 500 रुपये असणं गरजेचं आहे. त्यामुळं तुमच्या खात्यात 50 रुपये असेल तर आत्ताच खात्यात 500 रुपये जमा करा नाही तर तुम्हाला आर्थिक भुर्दंड बसण्याची शक्यता आहे.

खात्यात 50 ऐवजी 500 रुपये ठेवावे लागणार आहे

पोस्ट ऑफिसनं त्यांच्या बचत खात्याचे निमय बदलले आहे. त्यामुळं तुमच्या खात्यात जर 50 रुपये असेल तर तातडीनं आता त्यात बदल करा. कारण पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात कमीत कमी 500 रुपये बॅलेन्स असणं गरजेचं असल्याचं म्हटलंय. जर तुमच्या बचत खात्यात 500 रुपये नसेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसकडून पेनल्टी लागणार आहे. 19 डिसेंबर 2019 पर्यंत पोस्ट ऑफिसच्या 13 कोटी बचत खात्यात 500 पेक्षा कमी बॅलन्स होतं. त्यामुळं पोस्ट ऑफिसनं नवा नियम जारी केला आहे.

ग्राहकांना बॅलेन्स ठेवण्याच्या सुचना

ग्राहकांच्या खात्यात 500 पेक्षा कमी बॅलेन्स असल्यानं पोस्ट ऑफिसकडून आता सर्व ग्राहकांना सुचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक खातेधारकांना त्यांच्या खात्यात मिनीमम बॅलेन्स ठेवणं गरजेच आहे. तशा सुचना पोस्ट ऑफिसच्या संचालकांनी सर्व पोस्ट ऑफिसला दिल्या आहे.

(हेही वाचा- SBI ग्राहक असाल तर घरबसल्या मिळतील या सुविधा, जाणून घ्या फायदे)

पोस्टऑफिसकडून आता सर्व खातेधारकांना बॅलेन्स ठेवण्याच्या सुचना देण्यात येणार आहे. मिनीमम बॅलेन्स नसल्यानं प्रत्येक वर्षी पोस्ट ऑफिसला तब्बल 2 हजार 800 कोटींचं नुकसान होतंय.

PPF, सुकन्या समृद्धी योजना खात्यामध्ये काय बदल झाला?

पोस्ट ऑफिस डिपार्टमेंटकडून मुलींना खात उघडण्यात यावं यासाठी सुरू केलेली सुकन्या समृद्धी योजना त्याचप्रमाणे पीपीएफ खाती, वरिष्ठ नागरिक बचत खाती आणि और मासिक जमा योजना (एमआयएस) खाती उघडण्यासाठी कोणत्याच नियमांमध्ये बदल केले नाही आहेत. सुकन्या समृद्धी खाती 250 रु., पीपीएफ 500 रु आणि एमआयएस तसच वरिष्ठ नागरिक बचत खाती 1000 रुपये भरुन काढता येतील. तुमच्या खात्यामध्ये कमीत कमी 500 रुपये नसतील तर 100 रुपये खात्यातून कापले जातील. शेवटचे 100 रुपये असेपर्यंत हा दंड कापण्यात येईल त्यांनतर तुमचं खातं बंद करण्यात येईल

पोस्ट ऑफिसमध्ये खातं असण्याचे फायदे

याठिकाणी खातं उघडण्यास कमीत कमी रक्कम 20 रुपये आहे. व्यक्तिगत/संयुक्त खात्यांवर 0.4 टक्के वार्षिक व्याज मिळतं. हे खातं केवळ रोखरक्कम देऊन काढता येत. 500 रुपये देऊन उघडण्यात येणाऱ्या खात्यांसाठी चेक सुविधा उपलब्ध आहे. तुमच्या सध्याच्या खात्यामध्येही चेक सुविधा उपलब्ध करून घेता येते. 10 वर्ष आणि त्याहून अधिक वय असणाऱ्यांना पोस्टात खातं काढण्यात येतं.

पोस्ट ऑफिसमधील छोट्या बचत योजनांचा सध्याचा व्याजदर

-पब्लिक प्रॉव्हिडंट फंड: 7.9%

-सुकन्या समृद्धी योजना: 8.4%

-वरिष्ठ नागरिक बचत योजना: 8.6%

-नेशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट्स: 7.9%

-किसान विकास पत्र: 7.6%

-नॅशनल सेव्हिंग्स मंथली इनकम अकाउंट: 7.6%

-नॅशनल सेव्हिंग्स रेकरिंग डिपॉझिट अकाउंट: 7.2%

First published: February 23, 2020, 7:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading