मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुम्ही केलेल्या ऑर्डरमधून कशाप्रकारे Zomato करतं दरमहा कोट्यवधींची कमाई? वाचा सविस्तर

तुम्ही केलेल्या ऑर्डरमधून कशाप्रकारे Zomato करतं दरमहा कोट्यवधींची कमाई? वाचा सविस्तर

 तुमच्या-आमच्यासारख्या ग्राहकांनी झोमॅटोच्या माध्यमातून एखाद्या हॉटेलमधून खाद्यपदार्थांची ऑर्डर (Online Food Order) केली, तर त्यातून झोमॅटोला पैसे कसे मिळतात, असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.

तुमच्या-आमच्यासारख्या ग्राहकांनी झोमॅटोच्या माध्यमातून एखाद्या हॉटेलमधून खाद्यपदार्थांची ऑर्डर (Online Food Order) केली, तर त्यातून झोमॅटोला पैसे कसे मिळतात, असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.

तुमच्या-आमच्यासारख्या ग्राहकांनी झोमॅटोच्या माध्यमातून एखाद्या हॉटेलमधून खाद्यपदार्थांची ऑर्डर (Online Food Order) केली, तर त्यातून झोमॅटोला पैसे कसे मिळतात, असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 06 जुलै: झोमॅटो (Zomato) ही ऑनलाइन रेस्टॉरंट डिस्कव्हरी आणि फूड ऑर्डरिंग कंपनी लवकरच शेअर बाजारात आपला आयपीओ (IPO) दाखल करणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून 1.2 अब्ज डॉलरचा निधी उभा करण्याची तयारी झोमॅटो कंपनीने केली आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात SEBI ने ही या आयपीओला मंजुरी दिली आहे. शेअर बाजारातल्या (Share Market) गुंतवणूकदारांना (Investors) यापासून मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या-आमच्यासारख्या ग्राहकांनी झोमॅटोच्या माध्यमातून एखाद्या हॉटेलमधून खाद्यपदार्थांची ऑर्डर (Online Food Order) केली, तर त्यातून झोमॅटोला पैसे कसे मिळतात, असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असतो. त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.

    2020-21 या आर्थिक वर्षात झोमॅटोला 403 दशलक्षहून अधिक ऑर्डर्स प्राप्त झाल्या. या ऑर्डर्सचं मूल्य 1,12,209 दशलक्ष रुपये एवढं होतं. 2018मध्ये ऑर्डर्सचं मूल्य 13,314.4 दशलक्ष रुपये एवढं होतं. या तीन वर्षांच्या कालावधीत झोमॅटो कंपनीला 27,427 दशलक्ष रुपये मिळाले. या फूड डिलिव्हरी बिझनेसमध्ये (Food Delivery Business) तीन घटक (Stakeholders) आहेत. पहिला घटक म्हणजे ग्राहक (Customer), दुसरा घटक म्हणजे डिलिव्हरी पार्टनर आणि तिसरा घटक म्हणजे रेस्टॉरंट पार्टनर.

    हे वाचा-Gold Price: सोन्याचांदीच्या किंमतीत तेजी, दर 2 आठवड्यांच्या सर्वोच्च स्तरावर

    2020-21 या आर्थिक वर्षात झोमॅटोवर दर महिन्याला सरासरी 10.7 दशलक्ष ग्राहकांनी ऑर्डर्स नोंदवल्या. डिसेंबर 2020च्या आकडेवारीनुसार झोमॅटोच्या सक्रिय डिलिव्हरी पार्टनर्सची (Delivery Partners) संख्या 1,61,637 एवढी होती. 2020-21 या आर्थिक वर्षात झोमॅटोवरच्या सक्रिय रेस्टॉरंट्सची (Restaurant Partner) संख्या दर महिन्याला सरासरी 1,31,233 एवढी होती. रेस्टॉरंट्स हाच या व्यवसायाचा मुख्य घटक आहे.

    हे वाचा-1 ऑगस्टपासून बदलणार या मोठ्या खाजगी बँकेचे नियम, तुमचं खातं असल्यास जाणून घ्या

    झोमॅटो या अॅपवर रेस्टॉरंटचं लिस्टिंग (Listing) करण्यासाठी, तसंच खाद्यपदार्थ घरपोच पोहोचवण्यासाठी झोमॅटोकडून रेस्टॉरंट पार्टनर्सकडून कमिशन (Commission) घेतलं जातं. डिलिव्हरी चार्जेस (Delivery Charges) ग्राहकांकडून दिले जातात. काही निवडक ऑर्डर्सवर ग्राहकांकडून पॅकेजिंग चार्जेसही (Packaging Charges) घेतले जातात. ते रेस्टॉरंटला मिळतात. ग्राहकांकडून टिप दिली गेल्यास ती डिलिव्हरी पार्टनरला दिली जाते. या व्यतिरिक्त झोमॅटोला जाहिरातींतूनही (Advertisements) पैसे मिळतात.  झोमॅटो प्रोसारखे काही मेंबरशिप प्रोग्राम्सही (Membership Programs) झोमॅटोकडून चालवले जातात. त्या सदस्यांकडून काही ठरावीक शुल्क घेतलं जातं. त्या बदल्यात त्या ग्राहकांना काही डिस्काउंट्स दिले जातात.

    First published:
    top videos

      Tags: Food, Money, Restaurant, Tasty food, Zomato