• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम अशी सरकारी योजना; LIC च्या माध्यमातून मिळवा लाभ

ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम अशी सरकारी योजना; LIC च्या माध्यमातून मिळवा लाभ

योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 10 वर्षे कालावधीत निश्चित दराने निश्चित पेन्शन मिळू शकते.

  • Share this:
नवी दिल्ली, 26 मार्च : उतारवयात पेन्शनचा (Pension) आधार मिळावा,अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. यासाठी प्रत्येक जण आपापल्या आर्थिक कुवतीनुसार बचत किंवा गुंतवणूक करत असतो. यासाठी केंद्र सरकारने देखील काही योजना आणल्या आहेत. या योजनेतून दरमहा ठराविक रक्कम संबंधित व्यक्तीस मिळू शकते. याच अनुषंगाने केंद्र सरकारने नुकतीच पंतप्रधान व्यय वंदना योजनेला (Prime Minister Vaya Vandan Scheme) 3 वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. या मंजुरीनंतर व्यय वंदन योजनेचा कालावधी 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान व्यय वंदना योजना ही प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठीची (Senior citizen) योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून मासिक पेन्शन (Monthly Pension) मिळू शकते. योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 10 वर्षे कालावधीत निश्चित दराने निश्चित पेन्शन मिळू शकते. केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ भारतीय जीवन विमा निगम (Bhartiya Jeevan Bima Nigam) मार्फत मिळतो. हे वाचा - तुमच्याकडे आहे का 100 रुपयांची ही नोट; मग तुम्हाला मिळतील 50,000 रुपये या योजने अंतर्गत दरवर्षी 7.40 टक्के दराने व्याज मिळतं. आतापर्यंत देशभरातील सुमारे 6.28 लाख नागरिकांनी व्यय वंदन योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कमाल वयाची कोणतीही अट नसल्याने 60 वर्षांवरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिक योजनेत सहभागी होऊ शकतात. योजने अंतर्गत कोणतीही व्यक्ती 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकते. 1 महिन्याला किमान 1000 ते कमाल 9250 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकतं. पेन्शन पेमेंटचा लाभ मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक यानुसार घेता येतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यास एक अॅप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो. या अर्जासोबत काही महत्त्वाची कागदपत्रंदेखील जोडावी लागतात. या योजनेत सहभागासाठी आॅनलाईन (Online) पद्धतीनेदेखील अर्ज करता येतो. हे वाचा - LIC ग्राहकांसाठी खूशखबर! 6 महिन्यांसाठी नाही द्यावा लागणार गृहकर्जाचा EMI या योजनेत काही विशेष प्रकरणांमध्ये मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. या योजनेचा फायदा घेत असलेली व्यक्ती किंवा त्याच्या पती/पत्नी गंभीर आजारी पडल्यास मुदतपूर्व पैसे काढता येतात. अशा परिस्थितीत केवळ खरेदी किमतीचे 98 टक्के सरेंडर मूल्य (Surrender Value) परत केले जाते. या योजनेतून तीन वर्षांनंतर कर्जाची सुविधा (Loan Facility) मिळते,हे योजनेचे वैशिष्ट्य म्हणावं लागेल. या कर्जाची रक्कम खरेदी किमतीच्या 75 टक्क्यांपेक्षा अधिक नसते.
First published: