PPF बाबत खूप कमी लोकांना माहिती आहेत या गोष्टी; तुम्ही याबाबत जागरूक आहात का?

PPF बाबत खूप कमी लोकांना माहिती आहेत या गोष्टी; तुम्ही याबाबत जागरूक आहात का?

PPF ही एक सरकारमान्य गुंतवणूक योजना आहे.

  • Share this:

मुंबई, 04 नोव्हेंबर : पीपीएफ (PPF) म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) ही एक सरकारमान्य गुंतवणूक योजना आहे. हे सर्वात चांगलं रिटायरमेंट फोकस्ट इन्स्ट्रुमेंट म्हणून मानलं जाते. 1968 मध्ये नॅशनल सेव्हिंग ऑर्गनायझेशननं ही योजना सादर केली. पीपीएफचा लॉक इन कालावधी 15 वर्षांचा असतो. त्यात करसवलत मिळते. गुंतवणुकीच्या काळात मिळालेली मॅच्युरिटी अमाऊंट आणि ओवर ऑल इंटरेस्ट हे करमुक्त असतात.

पीपीएफबद्दल लोकांना जास्त माहीत नसलेली तथ्यं

एलिजिबिलिटी

पीपीएफ खातं हे सिंगल रेसिडेंट इंडियनला उघडता येतं. अल्पवयीन व्यक्तीच्या वतीनं पालक देखील हे खातं उघडू शकतात. रिटायर्ड व्यक्तींनी निवृत्ती वेतन लाभ मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तसंच त्यांना जॉइंट अकाउंट उघडण्याची मुभा नाही.

मॅच्युरिटी डेट

पीपीएफमध्ये मॅच्युरिटी डेट ही खातं उघडण्याचा तारखेपासून मोजली जात नाही मात्र आर्थिक वर्षाच्या शेवटी त्यात पैसे जमा केले जातात. हे खाते कोणत्या महिन्यात किंवा किती दिवसाने कुठल्या तारखेला उघडले यानुसार काहीच फरक पडत नाही.

हे वाचा - कोट्यवधी कर्जदारांना मिळणार दिलासा? 5 नोव्हेंबरला SC मध्ये पुढील सुनावणी

उदाहरणार्थ गुंतवणूकदारानं जर 1 जुलै 2019 रोजी खातं उघडलं तर पंधरा वर्षांच्या लॉकइन कालावधीची गणना 31 मार्च 2020 पासून केली जाईल अशा प्रकारे मॅच्युरिटी डेट किंवा मदत पूर्तीची तारीख ही 1 एप्रिल 2035 असेल.

व्याज कॅलक्युलेशन्स

पीपीएफच्या नियमानुसार गुंतवणूकदारानं त्यांचे हप्ते  प्रत्येक महिन्याच्या पाचव्या तारखेला किंवा त्याआधी जमा करावे त्यामुळे त्यांना दर महिन्याला व्याज मिळण्यास मदत होते. पीपीएफ खात्यावरील व्याज दर महिन्याच्या पाचव्या दिवसापासून त्या महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मोजला जातो.

हे वाचा - घरखरेदी झाली स्वस्त, या बँका देत आहेत 15 वर्षातील सर्वात कमी व्याजदर

या जमा झालेल्या रकमेवरील व्याज पीपीएफमध्ये मासिक तत्त्वावर मोजले जाते मात्र प्रत्येक वर्षात 31 मार्च रोजी आर्थिक वर्षाच्या शेवटी ते जमा केले जाते. प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला रक्कम जमा केल्यास त्यावर जास्तीत जास्त व्याज मिळू शकतं असे फिनडॉकचे कार्यकारी अधिकारी नितीन शाही यांनी सांगितलं.

प्रिमॅच्युअर विड्रॉवल/लोन

एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही लोन घेऊ शकता. ज्यात इनिशियल सबस्क्रिप्शन हे पाच वर्षांच्या समाप्तीआधी दिलं जाईल. 5 वर्षांची मुदत संपल्यानंतर या खात्यातून पैसे काढणं शक्य आहे. खातेदार खात्यात असलेल्या रकमेच्या जास्तीत जास्त 50 टक्‍क्‍यांपर्यंत पैसे काढू शकतो. याव्यतिरिक्त पैसे काढणं हे आर्थिक वर्षात फक्त एकदाच शक्य होऊ शकते.

Published by: Priya Lad
First published: November 4, 2020, 11:48 PM IST
Tags: moneyPPF

ताज्या बातम्या