मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Paytm SBI Credit Card तुमच्यासाठी योग्य आहे का? काय होणार फायदा वाचा

Paytm SBI Credit Card तुमच्यासाठी योग्य आहे का? काय होणार फायदा वाचा

Paytm नं State Bank of India सह भागीदारीत दोन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड (Credit Cards) लाँच केले आहेत. या कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

Paytm नं State Bank of India सह भागीदारीत दोन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड (Credit Cards) लाँच केले आहेत. या कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

Paytm नं State Bank of India सह भागीदारीत दोन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड (Credit Cards) लाँच केले आहेत. या कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : पेटीएम मोबाईल पेमेंट ॲपनं (Paytm) नुकतंच देशातील आघाडीची बँक स्टेट बँक ऑफ इंडियासोबत (State Bank of India) भागीदारीत दोन को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड (Credit Cards) लाँच केले आहेत. यात पेटीएम एसबीआय कार्ड सिलेक्ट (Paytm SBI Card Select) आणि पेटीएम एसबीआय कार्ड  (Paytm SBI Card) आहे. पेटीएम ॲपवर जाऊन ह्या कार्डसाठी एका मिनिटात अप्लाय करता येऊ शकतं. यासाठी एक नोव्हेंबरपासून पेटीएम ॲपमध्ये अर्ज उपलब्ध आहे. मात्र या कार्डसाठी अर्ज करण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

क्रेडिट कार्डवर काय आहेत ऑफर्स

एसबीआय कार्डचे एमडी आणि सीईओ अश्विन कुमार तिवारी म्हणाले, एकदा तुम्ही पेटीएम वापरून या कार्डसाठी अर्ज केल्यास एसबीआय तुमच्या पेटीएम मनी व्यवहाराच्या आधारे तुमची क्रेडिट मर्यादा निश्चित करणार आहे.

वार्षिक फी किती असेल?

पेटीएम एसबीआय कार्डला वार्षिक शुल्क 1499 रुपये असणार आहे. जर आपण वार्षिक किमान दोन लाख रुपये खर्च केले तर आपली वार्षिक फी माफ होईल. त्याचबरोबर पेटीएम एसबीआय कार्ड धारकांसाठी वार्षिक 499 रुपये आहे. मात्र वार्षिक फीवर कुठली सूट नाही. या दोन कार्डसाठी 21 वर्षांपेक्षा जास्त वयाचे वापरकर्ते अर्ज करू शकतात. यावेळी केवायसीनंतर एका आठवड्यानंतर आपल्याला कार्ड मिळेल.

कार्डवर किती कॅशबॅक उपलब्ध असेल?

या दोन्ही कार्डवर कॅशबॅक सुविधा देण्यात येणार आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन स्टोअर करून त्या खरेदी केल्यानंतर आपल्याला कॅशबॅक ऑफर मिळणार आहेत. एसबीआय कार्डमधून मूव्ही तिकीट बुकिंग, प्रवासी तिकिट बुकिंगसाठी 5% आणि एसबीआय कार्डवर या बुकिंगसाठी 3% कॅशबॅक ऑफर, त्याचबरोबर पेटीएम मॉलमधून खरेदीवरही कॅशबॅक उपलब्ध आहे. एसबीआय कार्ड तुम्हाला तर खर्चावर 2% आणि इतरत्र खरेदीवर एक कॅशबॅक मिळणार आहे.

हे वाचा - SBI मध्ये अल्पवयीन मुलांचं बचत खातं उघडायचे आहे? फॉलो करा या 4 सोप्या स्टेप्स

तसंच पर्सनल फायनान्स ब्लॉगर तुषार जैन यांनी सांगितलं की, पेटीएम आणि मॉलशिवाय या कार्डद्वारे खरेदी केल्यावर मोठा फायदा होणार नाही. जर आपण या दोन कार्डची तुलना एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डशी केली तर तुम्हाला कळेल की लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर खरेदी केल्यानंतर 5 टक्क्यांहून अधिक कॅशबॅक मिळतो.

फ्लिपकार्ट, ॲक्सिस बँक, ऍमेझॉन पे, आयसीआयसीआय बँक अशा अन्य कार्डवर पेटीएम एसबीआय कार्ड आणि पेटीएमची तुलना करताना त्यात मोठा फरक आढळून आलेला नाही. www.creditcardz.in. कंपनीच्या प्रवक्त्याचं म्हणणं आहे की, पेटीएमऐवजी को-ब्रांडेड कार्ड कंपन्यांकडून खरेदी करण्यात लोकांना रस आहे आणि या कार्डचा वापर आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

हे वाचा - शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; नियमांमध्ये झालेत बदल

न्यूज 18 ची संलग्न वेबसाईट मनी कंट्रोलन्ं पेटीएम एसबीआय कार्ड सिलेक्ट एटीएम एसबीआय कार्डवरील आपले मत स्पष्ट केले आहे. मनी कंट्रोलच्या मते पेटीएम एसबीआय कार्ड आपल्याला पेटीएम ॲप्स जोडलेले ठेवतात. म्हणजेच इतर प्लॅटफॉर्मवरून खरेदी केल्यानंतर आपल्याला मोठा फायदा होणार नाही. म्हणून आपण दररोज खरेदी करता तेव्हा बिल भरणं, प्रवासी तिकीट बुक करणं या गोष्टीमुळे तुम्हाला कार्डचा फायदा होऊ शकतो. आपण या गोष्टी करत नसल्यास कार्ड घेणं तितकं योग्य ठरणार नाही.

First published:

Tags: Money, Paytm, Paytm offers, SBI, State bank of india