मराठी बातम्या /बातम्या /मनी /

लग्नसराईच्या काळात हा व्यवसाय आहे BEST, होईल लाखो रुपयांची कमाई

लग्नसराईच्या काळात हा व्यवसाय आहे BEST, होईल लाखो रुपयांची कमाई

सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात लग्नाची तयारी करण्यासाठी देखील कुणाकडे वेळ नसतो. त्यामुळे वेडिंग (Wedding Industry) प्लॅनरला मोठी मागणी असते.

सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात लग्नाची तयारी करण्यासाठी देखील कुणाकडे वेळ नसतो. त्यामुळे वेडिंग (Wedding Industry) प्लॅनरला मोठी मागणी असते.

सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात लग्नाची तयारी करण्यासाठी देखील कुणाकडे वेळ नसतो. त्यामुळे वेडिंग (Wedding Industry) प्लॅनरला मोठी मागणी असते.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 10 डिसेंबर: सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात लग्नाची तयारी करण्यासाठी देखील कुणाकडे वेळ नसतो. त्यामुळे वेडिंग (Wedding Industry) प्लॅनरला मोठी मागणी असते. सध्या याचे मार्केट देखील मोठे असून अनेकजण या व्यवसायात आहेत. जवळपास 50 बिलियन डॉलरचे हे मार्केट असून तुम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कमाई करू शकता. सध्या कोरोनाचा काळ (Coronavirus) सुरु आहे, पण भारतीय लोकांचा लग्न करण्याचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. या काळात तुम्ही हा वेडिंग प्लॅनरचा (wedding planner) व्यवसाय सुरु करून उत्तम व्यावसायिक होऊ शकता.

प्मरी वेडिंग शूटपासून वधूवरांच्या डोक्यावर अक्षता पडेपर्यंत ते नवरीची पाठवणी होईपर्यंतचे व्यवस्थापन या वेडिंग प्लॅनरच्या टीमकडून केले जाते. यासाठी विविध कॉलेजमध्ये व्यावसायिक शिक्षण देखील देण्यात येतं. इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स करून तुम्ही करिअर म्हणून हा एक पर्याय निवडू शकता.

इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा

यासाठी तुम्ही प्राथमिक पातळीवर डिप्लोमाचे शिक्षण घेऊन या व्यवसायाला सुरुवात करू शकता. याचबरोबर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये (Event Management Diploma) डिप्लोमा कोर्स देखील करू शकता. यामुळे तुम्हाला याची प्राथमिक माहिती आणि प्रशिक्षण मिळेल.

मिळवू शकता लाखो रुपये

आजकालच्या या जमान्यात अनेकजण वेडिंग प्लॅनरला लग्नाची जबाबदारी देतात. यामध्ये वेडिंग प्लॅनर हा सर्व गोष्टीचे नियोजन करतात. वधू आणि वराला केवळ मंडपात उभं राहायचं असतं. अनेक विक्रेत्यांबरोबर समन्वय साधून योग्य ती पैशांची बचत हे वेडिंग प्लॅनर करत असतात. यामध्ये तुम्हाला व्यावसायिक प्रशिक्षणाबरोबरच काही स्किल (Skills) देखील महत्त्वाचे आहेत. वेळेचे नियोजन, अनेक कामे एकत्रित करू शकण्यासारखे गुण तुमच्याकडे असल्यास तुम्ही याकडे करिअरचा पर्याय म्हणून पाहू शकता.

(हे वाचा-सामान्यांना काहीसा दिलासा! जाणून घ्या काय आहेत पेट्रोल-डिझेलचे नवे दर)

लग्नाची संपूर्ण जबाबदारी वेडिंग प्लॅनरकडे असल्याने वधूवराच्या कुटुंबियांना कोणती काळजी करावी लागत नाही.  या वेडिंग प्लॅनरकडून थीम वेडिंग (Theme Wedding) किंवा डेस्टिनेशन वेडिंगही आयोजित केले जाते. क्लायंटने केवळ गरज आणि लग्न कशा पद्धतीने करायचे आहे हे सांगितल्यानंतर ते सर्व जबाबदारी स्वीकारतात. यासाठी काही कंपन्या टीम लीडर (Team Leader) देखील निवडतात. सुरुवातीला तुम्हाला यामध्ये कमी वेतन मिळेल पण अनुभवानुसार महिन्याला 1 लाख रुपये देखील मिळवू शकता.

(हे वाचा-एप्रिल 2019 पासून घटणार तुमच्या हातात येणारा पगार, काय आहे फायदा आणि नुकसान?)

याचबरोबर तुम्ही तुमची स्वतःची कंपनी देखील सुरु करू शकता. परंतु तुम्हाला यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. यासाठी सुरुवातीला 5 ते 10 लाख रुपये गुंतवणूक करावी (Money Investment)लागणार आहे. त्याचबरोबर मार्केटिंगसाठी देखील तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील.

First published:

Tags: Wedding