मराठी बातम्या /बातम्या /मनी /

केवळ 50 हजार गुंतवून दरमहा कमावता येतील 30 ते 40 हजार, वाचा काय आहे व्यवसाय

केवळ 50 हजार गुंतवून दरमहा कमावता येतील 30 ते 40 हजार, वाचा काय आहे व्यवसाय

हा व्यवसायाची खास बाब म्हणजे इतर व्यवसायांपेक्षा खूप कमी पैशात तुम्ही हा व्यवसाय उभारू शकता. केवळ 50 हजार ते 70 हजार रुपये गुंतवून तुम्ही दरमहा एक चांगली कमाई करू शकता.

नवी दिल्ली, 16 जानेवारी: आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत की त्याची सध्या बाजारात अधिक डिमांड आहे. हा व्यवसाय आहे स्मॉल स्केलमध्ये टीशर्ट प्रींटिंग (T-Shirt Printing) चा. प्रिंटेंड टी-शर्टची सध्या बाजारातील मागणी खूप वाढली आहे. वाढदिवस किंवा कोणत्याही गिफ्ट देण्याच्या प्रसंगी प्रिंटेड टीशर्ट देण्याला आजकाल अधिक पसंती दिली जाते. याशिवाय शाळा, कॉलेजेस आणि बिझनेस ऑर्गनायझेशन्स (Business Organization) देखील अनेक प्रसंगी कस्टमाइझ्ड प्रिंटेड टी-शर्ट बनवून घेतात. एकूणच असा बिझनेस सुरू केल्यास तो चालण्याची जास्त शक्यता आहे. वाचा सविस्तर 50-70 हजारात सुरू करा तुमचा व्यवसाय या व्यवसायातील विशेष बाब म्हणजे तुम्ही कमी रकमेत हा व्यवसाय सुरू करू शकता. केवळ 50 ते 70 हजार रुपयांची गुंतवणूक करून टी शर्ट प्रिंटिंग बिजनेस सुरू करू शकता. या गुंतवणुकीतून तुम्ही दरमहा 30 ते 40 हजार रुपये दरमहा कमावू शकता. याशिवाय तुम्हाला काही महिन्यात अधिक नफा मिळू लागला की अधिक गुंतवणूक देखील करता येईल. तज्ञांच्या मते कपड्यांची एक प्रिटिंग मशीन 50 हजार रुपयांना येते आणि त्यातूनच काम सुरू करता येते. प्रिटिंगसाठी तुम्ही साधा पांढरा टी-शर्ट 120 रुपयांना घेऊ शकता. याची प्रिटिंग कॉस्ट 1 ते 10 रुपयांदरम्यान येते. तुम्ही कमीतकमी 250 ते 300 रुपयांना टा टीशर्ट विकू शकता. अशाप्रकारे, जर मध्यस्थांची भूमिका कमी केली तर एखादी व्यक्ती टी-शर्टवर कमीतकमी 50 टक्के नफा देऊ शकते. तुम्ही स्वत: देखील टीशर्ट विकू शकता. ऑनलाइन विक्री देखील शक्य आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यत पोहोचता येते.योग्य स्ट्रॅटजी वापरून तुम्ही यामध्ये सोशल मीडिया मार्केटिंग करू शकता. कमी खर्चात तुम्ही तुमचा ब्रँड लोकांपर्यंत पोहोचू शकता.
First published:

Tags: Business News, Investment

पुढील बातम्या