मराठी बातम्या /बातम्या /मनी /

महत्त्वाची बातमी! पोस्ट ऑफिसच्या 'या' 9 योजनांमध्ये गुंतवा पैसे; मिळणार भरघोस परतावा; बघा details

महत्त्वाची बातमी! पोस्ट ऑफिसच्या 'या' 9 योजनांमध्ये गुंतवा पैसे; मिळणार भरघोस परतावा; बघा details

चांगला परतावा देणाऱ्या पोस्टाच्या योजनांबद्दल जाणून घेऊया.

चांगला परतावा देणाऱ्या पोस्टाच्या योजनांबद्दल जाणून घेऊया.

चांगला परतावा देणाऱ्या पोस्टाच्या योजनांबद्दल जाणून घेऊया.

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट: प्रत्येकाला वाटतं असतं की, आपला चांगला बँक बॅलन्स (Bank Balance) असावा. त्यासाठी कमाईतील ठराविक रक्कम सेव्हिंग (Saving) करण्याकडे लोकांचा कल असतो. हे सेव्हिंग लोकं विविध प्रकारे गुंतवून त्यावर नफा मिळवण्याचा प्रयत्न करतात. म्युच्युअल फंड (Mutual Fund), बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (Fixed Deposit) पैसे गुंतवण्याला लोकं प्राधान्य देतात. यासाठी वेगवेगळ्या बँकांत गुंतवणूक केली जाते. प्रामुख्याने जी बँक चांगला परतावा देईल, ज्या ठिकाणी पैसे सुरक्षित असतील, अशा बँकेमध्ये लोकं पैसे गुंतवतात. अलीकडे भारतीय पोस्टाच्या (Office) विविध योजनांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहेत. पोस्टाने विविध प्रकारच्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. चला तर मग चांगला परतावा देणाऱ्या पोस्टाच्या योजनांबद्दल जाणून घेऊया. याबाबतचं वृत्त टीव्ही 9 हिंदीने दिलं आहे.

तुम्ही नोकरी, व्यवसाय किंवा शेती करत असलात तरी बचत व गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. महत्वाचे म्हणजे ही गुंतवणूक सुरक्षित असायला हवी. सुरक्षित गुंतवणुकीच्या बाबतीत पोस्ट च्या योजना अधिक चांगल्या मानल्या जातात. तुमची बचत, गरजा आणि उद्देशानुसार पोस्टामध्ये अनेक प्रकारच्या चांगल्या योजना उपलब्ध आहेत. पोस्टामध्ये गुंतवणूक करण्याचं मोठं कारण म्हणजे या ठिकाणी सुरक्षितता आणि परताव्याची हमी असते कारण पोस्ट खातं भारत सरकारचं आहे. त्यामुळे इथं सरकार पैशांच्या रक्षणाची हमी देत असतं त्यामुळे ते पैसे बुडत नाहीत अशा धारणेने लोक गुंतवणूक करतात. अशा 9 प्रमुख योजनांबद्दल आम्ही आपणाला सांगणार आहोत, कोणत्या योजनेत तुमचे पैसे किती दिवसांत दुप्पट होतील, याची माहिती देणार आहोत.

हे समजून घेण्यासाठी तुम्हाला फक्त एक युनिव्हर्सल फॉर्म्युला (universal Formula) तयार करावा लागेल. त्यालाच Formula 72 म्हणतात. या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला योजनेच्या व्याजदराला 72 भागांमध्ये विभाजित (Divide) करायचं आहे. म्हणजेच व्याजदराने 72 ला भागायचं. त्यांनतर जे उत्तर येईल त्या वर्षी तुमचे पैसे दुप्पट होतील. या फॉर्म्युल्याच्या आधारावर 9 प्रमुख योजनांबद्दल जाणून घेऊया.

हे वाचा - गुंतवणुकीचा प्लान करताय? पुढच्या महिन्यात मिळतील हे दोन जबरदस्त पर्याय

1. पोस्ट टाईम डिपॉझिट (Post Office Time Deposit)

या योजनेमध्ये पोस्ट 1 ते 3 वर्षांच्या ठेवींवर 5.5 टक्के व्याजदर (Interest Rate) देते. या व्याजदराने 72 ला भागल्यास परिणाम 13.09 हा आकडा येतो. याचा अर्थ असा की, जर कोणी या योजनेत पैसे गुंतवले तर सुमारे 13 वर्षांनी त्याचे पैसे दुप्पट होतील. त्याचबरोबर पोस्ट 5 वर्षांच्या टाइम डिपॉजिटवर 6.7 टक्के व्याजदर देत आहे. यामध्ये तुमचे पैसे 10.74 मध्ये म्हणजेच सुमारे 11 वर्षे (10 वर्षे, 9 महिने) मध्ये दुप्पट होतील.

2. पोस्ट बचत योजना (Post Office Saving Scheme)

पोस्टामधील या बचत योजनेमध्ये 4.4 टक्के व्याजदर दिला जातो. ही देखील एक अतिशय विश्वसनीय योजना आहे. जर कोणी या योजनेत गुंतवणूक केली तर Formula 72 नुसार त्याचे पैसे सुमारे 18 वर्षांनी दुप्पट होतील.

3. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana)

अगदी सुरुवातीपासूनच सुकन्या समृद्धी योजना बऱ्याच लोकांना आकर्षित करत आहे. मुलींच्या नावाने ही योजना चालवली जाते. या योजनेअंतर्गत 7.6 टक्के व्याजदर दिला जातो. या योजनेत गुंतवणूक केल्यावर 9 वर्षे आणि 6 महिन्यांत पैसे दुप्पट होतील.

4. आरडी म्हणजे रिकरिंग डिपॉझिट (Post Office Recurring Deposit)

सध्या पोस्टाच्या आरडी योजनेमध्ये 5.8% व्याजदर दिला जातो. या योजनेत 12 वर्षं 5 महिन्यांत पैसे दुप्पट होतील.

5. पोस्ट ज्येष्ठ नागरिक योजना (Post Office Senior Citizen Scheme)

सध्या पोस्ट ज्येष्ठ नागरिक योजनेमध्ये 7.4 टक्के व्याजदर दिला जात आहे. तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत 9.73 वर्षात पैसे दुप्पट होतील.

6. पोस्ट मासिक उत्पन्न योजना (Post Office Monthly Income Scheme)

सध्या पोस्टाच्या पोस्ट मासिक उत्पन्न योजनेमध्ये 6.6 टक्के व्याजदर दिला जात आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमचे पैसे 10.91 म्हणजेच सुमारे 11 वर्षांमध्ये दुप्पट होतील.

7. पीपीएफ योजना (Post Office PPF Scheme)

पीपीएफ म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना होय. ही दीर्घकालीन (Long Term) गुंतवणूक योजना आहे. या योजनेवर सध्या 7.1 टक्के व्याजदर दिला जातो. या योजनेत पैसे गुंतवल्यास 10.14 वर्षात पैसे दुप्पट होतील.

8. किसान विकास पत्र (Post Office KVP Scheme)

या योजनेत गुंतवणूक केल्यास सुद्धा चांगला परतावा मिळतो. यामध्ये सध्या 6.9 टक्के व्याजदर दिला जातो. यानुसार तुमचे पैसे 124 महिन्यांत म्हणजेच 10 वर्षे 4 महिन्यांमध्ये दुप्पट होतील. यामध्ये किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करू शकता. कमाल गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही.

9. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Saving Certificate)

किसान विकास पत्राप्रमाणे पोस्ट राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजनेमध्ये चांगला परतावा मिळत आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर 6.8 टक्के व्याजदर दिला जातो. यानुसार सुमारे 10 वर्षे आणि 7 महिन्यांत पैसे दुप्पट होतील.

First published:

Tags: Money, Post office saving, Savings and investments