नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी: डिजिटल पेमेंटच्या या जमान्यात क्रेडिट कार्ड (Credit Card) चा वापर खूपच सामान्य बाब झाली आहे. खात्यामध्ये पैसे नसतानाही क्रेडिट कार्डमधून एखाद्या गोष्टीचे पेमेंट करता येते. मात्र जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल आणि त्याचे पेमेंट (Credit Card Bill Payment) वेळेत करू शकला नाहीत तर हे तुमच्यासाठी नुकसानाकारक ठरू शकते. जाणून घ्या पेमेंट वेळेत न केल्यास तुम्हाला कोणते नुकसान सहन करावे लागू शकते.
1. कमी होईल क्रेडिट स्कोअर
तुम्ही वेळेवर क्रेडिट कार्ड बिल भरले नाही तर तुमचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) खाली येईल. क्रेडिट स्कोअर पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. क्रेडिट स्कोअरवर परिणाम होण्याशिवाय याचा कर्जावरही परिणाम होतो. त्यामुळे क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरणे गरजेचे आहे.
(हे वाचा-RBI कडून व्याजदरात कोणताही बदल नाही, तुमच्या कर्जाच्या EMI वर काय होईल परिणाम?)
2. लेट फी भरावी लागेल
जर तुम्ही क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले नाही तर तुम्हाला उशीरा भरण्याचा दंड अर्थात लेट फी देखील भरावी लागेल. हे पुढील बिलिंग तपशीलात लेट फी जोडली जाईल. प्रत्येक बँकेप्रमाणे हे शुल्क वेगवेगळे असते
3. कर्ज मिळण्यात समस्या
जर क्रेडिट कार्ड वेळेवर बिल भरले नसेल तर आपले क्रेडिट प्रोफाइल कमी होते. याचा फटका तुम्हाला सहन करावा लागेल कारण जर तुम्हाला बॅंकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुमचा खराब क्रेडिट प्रोफाइल/स्कोअर पाहून बँक तुम्हाला कर्ज देण्यास नकार देऊ शकते.
(हे वाचा-ग्राहकांनो लक्ष द्या! बँकिंग फ्रॉडपासून वाचण्यासाठी या चुका टाळा, SBIचा इशारा)
4. व्याज द्यावे लागेल
जर क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरले नाही तर तुम्ही रिवॉर्ड पॉईंटचा फायदा घेण्यास सक्षम राहणार नाही. तुम्ही ठराविक मुदतीत पैसे न भरल्यास व्याज देखील वाढते. त्यामुळे क्रेडिट कार्ड युजर्सना बिल वेळेत भरले नाही तर केवळ लेट फीच द्यावी लागते असे नाही, तर तुमच्या व्याजात देखील वाढ होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money