मराठी बातम्या /बातम्या /मनी /अवघ्या 5 वर्षांत लाखो लोकांचे पैसे झाले दुप्पट; जाणून घ्या LIC च्या सर्वात फायदेशीर योजनेविषयी...

अवघ्या 5 वर्षांत लाखो लोकांचे पैसे झाले दुप्पट; जाणून घ्या LIC च्या सर्वात फायदेशीर योजनेविषयी...

money-news18

money-news18

LIC च्या या अत्यंत फायदेशीर म्युच्युअल फंडाच्या योजनेत आजच पैसे गुंतवा.

नवी दिल्ली, 30 जानेवारी : कमाईतील काही रक्कम भविष्यासाठी गुंतवावी, पण कुठे? असा प्रश्न अनेक गुंतवणुकदारांना नेहमीच पडतो. गुंतवणुकदारांसाठी आज विविध कंपन्यांच्या अनेक योजना उपलब्ध आहे. या कंपन्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दामदुप्पटीसारख्या योजना जाहीर करतात, पण त्याबाबत खात्री देता येत नाही. त्यामुळे आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवला जावा आणि त्यातून भरभक्कम परतावा मिळावा, या उद्देशाने अनेक गुंतवणूकदार एलआयसीला (Life Insurance Of India) प्राधान्य देतात. म्युचअल फंडाच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्याने अनेक गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळाल्याचे सध्या दिसून येत आहे. एक वर्षात 10 टक्के, दोन वर्षात 31 तर पाच वर्षात 100 टक्के रिटर्न मिळत असल्याने जाणून घेऊया एलआयसीच्या अशाच काही खास योजनांविषयी...

म्युचअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक (Investment) का करावी, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. त्यावर तज्ज्ञ म्हणतात, गेल्या वर्षी कोरोना महामारीची (Corona Pandemic) स्थिती असतानाही अनेक म्युचअल फंड कंपन्यांनी 72 लाख फोलियो (Folio) किंवा अकांऊट जोडले आहेत. याचाच अर्थ असा की नवे गुंतवणूकदार सातत्याने गुंतवणूक करीत आहेत. मागील एक वर्षात 72 लाख रिटेल गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली आहे, अशी माहिती असोसिएशन आॅफ म्युचअल फंडस इन इंडिया (इम्फी) ने दिल्याचे टिव्ही 9च्या वृत्तात म्हटले आहे. फोलिओचा हा आकडा वैयक्तिक गुंतवणुकदारांच्या खात्याला दिला जातो. एका गुंतवणुकदाराचे अनेक फोलिओ असू शकतात.

डिसेंबर 2020 पर्यंत 45 म्युचअल फंड कंपन्यांच्या एकूण फोलिओंची संख्या 72 लाखांहून 9.43 कोटींवर पोहोचली आहे. डिसेंबर 2019 पर्यंत ही संख्या 8.71 कोटी होती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार म्युचअल फंडात गुंतवणूक करुन वेगात पैसा कमवता येणे शक्य आहे. 5 वर्ष कालावधीसाठी फिक्स डिपाॅझिटमध्ये (FD) रक्कम ठेवल्यास त्यावर 7 ते 8 टक्केच व्याज मिळते. परंतु म्युचअल फंडात गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा मिळू शकतो.

जाणून घेऊयात एलआयसी एमएफ लार्ज (MF Large) आणि मिड कॅप (Mid Cap) फंडविषयी

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एक वर्षात या फंडातून 10 टक्के रिटर्न मिळाला आहे. जर कुणी 10 हजार रुपये गुंतवले असतील त्यांना 10,990 रुपये परतावा मिळाला आहे. तोच 5 वर्षांत दुप्पट होऊन 20083 रुपये परतावा मिळाला आहे. जर कोणी व्यक्तीने यात एसआयपीच्या माध्यमातून 1000 रुपये भरले तर एक वर्षात ही रक्कम वाढून 14568.66 रुपये होते. तर गुंतवणूक 12,000 रुपये होतएलआयसी एमएफ लार्ज आणि मिड कॅप फंडाने खरेदी केलेत चांगले मुलभूत शेअर्स

एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये आयसीआयसीआय, इन्फोसिस, एचडीएफसी बॅंक, व्होल्टास, रिलायन्स इंडस्ट्री यांचे शेअर्स समाविष्ट आहेत. या शेअर्सने मार्केटमध्ये दमदार परतावा दिलेला आहे.

एसआयपीमध्ये पैसे कसे लावावेत?

सिस्टीमॅटीक इन्व्स्टमेंट प्लॅनच्या (SIP) माध्यमातून तुम्ही दरमहा एक निश्चित रक्कम तुमच्या आवडीच्या म्युचअल फंडाच्या योजनेत गुंतवू शकता. गरजेनुसार एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही दर आठवड्याला गुंतवणूक करु शकता. गुंतवणूकीत शिस्तीला फार महत्व आहे. एसआयपी गुंतवणूकीत शिस्त राखतो. तसेच या माध्यमातून नियमित गुंतवणूक होत राहते. बाजारात तेजी असो अथवा मंदी तुमचा पैसा म्युचअल फंडात जात राहतो. जर तुम्ही एखाद्या म्युचअल फंडात दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम टाकण्याचा विचार केला असेल तर तुम्हाला त्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नाही.

हे देखील वाचा - Budget 2021 सादर होण्यापूर्वी जाणून घ्या या शब्दांचे अर्थ, अर्थमंत्र्यांचे भाषण समजण्यास होईल मदत

तीन टप्प्यांमध्ये जाणून घेऊया गुंतवणूकीची प्रक्रिया...

एसआयपी सुरु करण्यासाठी तुमच्याकडे पॅन कार्ड, अॅड्रेस प्रुफ, पासपोर्टसाईज फोटो आणि चेक बुक ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. बॅंक खाते आणि अन्य तपशील असल्याने चेक बुक असणे गरजेचे आहे.

31 मार्चपर्यंत आपले आधार कार्ड म्युचअल फंडला जोडणे अनिवार्य आहे. म्युचअल फंडात गुंतवणूक करण्यापुर्वी केवायसी (KYC) करणे आवश्यक आहे. यात तुम्हाला नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, पत्ता आदी देणे गरजेचे आहे. हे सर्व तुम्हाला एकदाच द्यावे लागेल. ऑनलाईन देखील तुम्ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करु शकता.

जर तुम्ही म्युचअल फंडाच्या योजनेत दर महिन्याला एक निश्चित रक्कम गुंतवण्याचे ठरवले असेल तर तुम्हाला त्यासाठी वेळ द्यावा लागेल. जर तुम्ही वेळ काढून म्युचअल फंडात गुंतवणूक करत असताना शेअर बाजारात तेजी अथवा मंदी आली तर आपले पैसे जातील या विचाराने तुम्ही गुंतवणूक करण्याचे टाळता. परंतु, एसआयपी तुमचा या सर्व अडचणींपासून बचाव करते. आणि तुम्ही ठरवलेल्या दिवशी तुमच्या आवडत्या म्युचअल फंडातील निर्धारित रक्कम तुमच्या बॅंक खात्यात जमा करते.

First published:

Tags: Budget 2021, Business News, Hdfc bank, Icici bank, Investment, Money, Nirmala Sitharaman, Share market, Union budget, हंगामी अर्थसंकल्प Finance minister