मराठी बातम्या /बातम्या /मनी /तुमच्या PF खात्यात किती आणि कशा हिशेबाने आले व्याजाचे पैसे; जाणून घ्या संपूर्ण Calculation

तुमच्या PF खात्यात किती आणि कशा हिशेबाने आले व्याजाचे पैसे; जाणून घ्या संपूर्ण Calculation

आपल्या अकाउंटमध्ये नेमक्या कोणत्या आणि कशा हिशेबाने पैसे आले आहेत, हे जाणून घ्यायचं असेल, तर इथे त्याबद्दलचं संपूर्ण कॅल्क्युलेशन देत आहोत.

आपल्या अकाउंटमध्ये नेमक्या कोणत्या आणि कशा हिशेबाने पैसे आले आहेत, हे जाणून घ्यायचं असेल, तर इथे त्याबद्दलचं संपूर्ण कॅल्क्युलेशन देत आहोत.

आपल्या अकाउंटमध्ये नेमक्या कोणत्या आणि कशा हिशेबाने पैसे आले आहेत, हे जाणून घ्यायचं असेल, तर इथे त्याबद्दलचं संपूर्ण कॅल्क्युलेशन देत आहोत.

    नवी दिल्ली 10 नोव्हेंबर : केंद्र सरकारकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO) खात्यात व्याजाचे पैसे जमा केले जाऊ लागले आहेत. साडेसहा कोटी कर्मचाऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत. EPFOच्या सबस्क्रायबर्सच्या खात्यात (PF Account) हे व्याजाचे पैसे जमा केले जात असून, त्याचे मेसेजेसही संबंधित व्यक्तींना पाठवले जात आहेत.

    आपल्या अकाउंटमध्ये नेमक्या कोणत्या आणि कशा हिशेबाने पैसे आले आहेत, हे जाणून घ्यायचं असेल, तर इथे त्याबद्दलचं संपूर्ण कॅल्क्युलेशन देत आहोत.

    यावर्षी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यात (EPFO) पुढीलप्रमाणे या हिशेबाने व्याज दिलं जात आहे. 15 हजार रुपये मूळ वेतन अर्थात बेसिक सॅलरी गृहीत धरून हे कॅल्क्युलेशन करण्यात आलं आहे.

    खूशखबर! RBI देत आहे 40 लाख रुपये जिंकण्याची संधी, वाचा काय करावं लागेल काम

    बेसिक सॅलरी + DA = 15,000 रुपये

    EPF मध्ये कर्मचाऱ्याचा हिस्सा = 15,000 रुपयांचे 12% = 1,800 रुपये

    EPS मध्ये कंपनीचं योगदान = 15,000 रुपयांचे 8.33% = 1,250 रुपये

    EPF मध्ये कंपनीचं योगदान = कर्मचाऱ्या हिस्सा-EPS मध्ये कंपनीचं योगदान = 550 रुपये

    प्रत्येक महिन्याला EPF मध्ये जातात एवढे पैसे = 1800 रुपये+550 रुपये=2,350 रुपये

    2019-20 या आर्थिक वर्षासाठी इंटरेस्ट रेट (व्याजदर) = 8.50 %

    या हिशेबाने प्रत्येक महिन्याला इतकं असेल व्याज = 8.50 % /12 = 0.7083 %

    अशा प्रकारे कॅल्क्युलेट होणार व्याज

    एप्रिलच्या अखेरीला EPF अकाउंटचा बॅलन्स= 2,350 रुपये

    मे महिन्यात EPF अकाउंटमध्ये होणार इतकं योगदान = 2,350 रुपये

    मे महिन्याच्या अखेरीला EPF अकाउंटमध्ये एकूण जमा होणार = 4700 रुपये

    मे महिन्याच्या अखेरीला EPF अकाउंटमध्ये जमा होईल इतकं व्याज = 4700 रुपये X 0.7083%= 33.29 रुपये

    मे महिन्याच्या अखेरीला मिळणार इतकं व्याज = 33.29 रुपये

    याच आधारे आगामी महिन्यांचं व्याजही कॅल्क्युलेट केलं जाईल.

    14,500 रुपयांची गुंतवणूक करून उभा करा 23 कोटींचा फंड, वाचा सविस्तर

    दरम्यान, काही कालावधीपूर्वी केंद्र सरकारने नवे प्राप्तिकरविषयक नियम अधिसूचित (Notification of New Income Tax Rules) केले आहेत. त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO Account) खात्यांना दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये विभागलं जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (Central Direct Taxes Board) अर्थात CBDT ने अधिसूचित केलेल्या प्राप्तिकर नियमांनुसार, आता प्रॉव्हिडंट फंडामध्ये (PF) एका ठरावीक मर्यादेबाहेर जमा झालेल्या व्याजावर इन्कम टॅक्स (Income Tax) आकारला जाणार आहे.

    ज्यांच्या पीएफ अकाउंटमध्ये एका वर्षात 2.5 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा होते, त्यांना हा नियम लागू होणार आहे. सध्याच्या पीएफ अकाउंट्सना नवा नियम लागू करण्यासाठी दोन वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये त्यांची विभागणी केली जाणार आहे. हे नवे नियम एक एप्रिल 2022पासून लागू होतील.

    First published:

    Tags: Pf, PF Amount