मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! कोरोनाशी लढण्यासाठी बँक देतंय 'Kavach' योजना, मिळेल विशेष कर्ज

SBI ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! कोरोनाशी लढण्यासाठी बँक देतंय 'Kavach' योजना, मिळेल विशेष कर्ज

कोरोना काळात सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) एसबीआय कवच पर्सनल लोन स्कीम (SBI Kavach Personal Loan Scheme)  लाँच केली आहे.

कोरोना काळात सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) एसबीआय कवच पर्सनल लोन स्कीम (SBI Kavach Personal Loan Scheme) लाँच केली आहे.

कोरोना काळात सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) एसबीआय कवच पर्सनल लोन स्कीम (SBI Kavach Personal Loan Scheme) लाँच केली आहे.

नवी दिल्ली, 16 जून: देशभरात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेनं कहर केला. या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. परिणामी आरोग्य व्यवस्थेवर ताण आला. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडस आणि औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दुसऱ्या लाटेचा प्रभाव बघता अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध जारी करण्यात आले होते. याचा थेट परिणाम लोकांच्या रोजगार, नोकऱ्यांवर झाला. अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली तर अनेकांचे उद्योग, रोजगार (Employment) अडचणीत सापडले. सद्यःस्थितीत ही लाट काहीशी ओसरताना दिसत आहे. परंतु, सरकार आणि तज्ज्ञांनी आता कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. रोजगार, नोकऱ्या गमवाव्या लागल्यानं सध्या अनेक जण आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. अशातच कुटुंबातील कोणाला कोरोनाचा संसर्ग होऊन आपत्कालीन आरोग्य स्थिती निर्माण झाली तर वैद्यकिय खर्च कसा करायचा असा प्रश्न भेडसावत आहे. यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) एसबीआय कवच पर्सनल लोन स्कीम (SBI Kavach Personal Loan Scheme)  लाँच केली आहे. तुम्ही SBI ग्राहक असाल तर जवळच्या शाखेत जाऊन किंवा 1800 11 2211 या क्रमांकावर संपर्क करून याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ शकता. जाणून घेऊया या योजनेविषयी. हे  वाचा-30 वर्षाच्या नोकरीनंतर MAला प्रवेश; पुण्यातील 56 वर्षीय महिलेनं पटकावली 4 पदकं स्टेट बॅंक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआयने 11 जूनला कोविड -19 रुग्णांसाठी (Covid-19 Patient) कवच पर्सनल लोन ही योजना लाँच केली आहे. ही एक युनिक कोलॅटरल फ्री (Unique Collateral Free) लोन स्कीम आहे. या योजनेअंतर्गत कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांसाठी स्वस्त दरात कर्ज घेता येते. या माध्यमातून कोरोनावरील इलाजासाठी झालेला मेडिकल खर्च रिइम्बर्समेंट (Reimbursement) केला जाऊ शकतो. यासाठी इच्छूक ऑनलाइन अर्ज करु शकतात. यांना मिळू शकते लोन या स्कीमनुसार, पगारदार किंवा पगारी नसलेल्या अशा दोन्ही व्यक्ती कर्ज घेऊ शकतात. त्याचप्रमाणे पेन्शनर देखील या कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकतात. 1 एप्रिल 2021 नंतर कोरोना पॉझिटिव्ह झालेले ग्राहक स्वतःसाठी किंवा कुटुंबियांच्या वैद्यकीय इलाजासाठी हे कर्ज घेऊ शकतात. कुठे कराल अर्ज या कर्ज योजनेसाठी इच्छूक ग्राहक एसबीआयच्या कोणत्याही शाखेत अर्ज करु शकतो. याव्यतरिक्त YONO च्या माध्यमातूनही कर्ज प्री- अॅप्रुव्ड होऊ शकते. हे वाचा-चांगली नोकरी मिळवायचीये? मग बायोडाटामध्ये 'या' चुका कधीच करू नका किती कर्ज मिळेल आपल्या एलिजीबिलिटीनुसार (Eligibility) ग्राहक 25,000 ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतो. जर आधीच ग्राहकाकडे कर्ज असेल तर हे त्या व्यतिरिक्त असेल. SBI च्या वेबसाइटनुसार बँकेचं असं लक्ष्य आहे की, अशा व्यक्तींच्या (ग्राहक आणि त्यांचे कुटुंबीय) कोविड ट्रीटमेंटसाठी कर्ज उपलब्ध करून देणे जे 1 एप्रिल 2021 रोजी आणि त्यांनंतर कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ही कागदपत्रे आवश्यक ग्राहक किंवा त्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला कर्ज हवे असल्यास त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह असणं आवश्यक आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी अन्य कोणत्याही कोलॅटरल ची आवश्यक नाही. हे एक टर्म लोन किंवा मुदत कर्ज आहे. व्याज दर किती असेल या विभागांतर्गत ग्राहकाला सर्वात स्वस्त म्हणजेच 8.5 टक्के दराने कर्ज उपलब्ध होईल. कर्ज परतावा कालावधी 60 महिने असेल. यात 3 महिन्यांच्या मॉरेटोरियमचाही (Moratorium) समावेश आहे. प्रक्रिया शुल्क आणि प्री-पेमेंट पेनल्टी एसबीआय इच्छूक ग्राहकांना या योजनेंतर्गत झीरो प्रोसेसिंग फीवर कर्ज उपलब्ध करुन देत आहे. या व्यतरिक्त ग्राहकांसाठी प्री क्लोजर चार्जेस आणि प्री-पेमेंट पेनल्टी (Pre-Payment Penalty) रद्द केली आहे.
First published:

Tags: Coronavirus, Coronavirus cases, SBI, Sbi ATM, SBI bank

पुढील बातम्या