कमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर

कमी Income असणाऱ्यांसाठी बेस्ट आहे ही पॉलिसी, वाचा किती मिळेल रिस्क कव्हर

वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून टर्म प्लॅन खरेदी करणं खूप सोपं झालं आहे. नवीन वर्षांपासून सर्व विमा कंपन्या ग्राहकांना सरल जीवन विमा पॉलिसी देत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जानेवारी: वर्षाच्या पहिल्या महिन्यापासून टर्म प्लॅन खरेदी करणं खूप सोपं झालं आहे. नवीन वर्षांपासून सर्व विमा कंपन्या ग्राहकांना सरल जीवन विमा पॉलिसी देत आहेत. यामध्ये खास बाब अशी आहे की तुम्ही कमी प्रीमियम वर देखील टर्म प्लॅन खरेदी करू शकता. या सुविधेचा मोठा फायदा कमी उत्पन्न असणाऱ्या लोकांना होईल. हा एक स्टँडर्ड इन्शुरन्स आहे. यामुळे ग्राहकाना कंपन्यांकडून आधीच देण्यात आलेल्या आलेल्या माहितीच्या आधारे निर्णय घेण्यास मदत होईल. जाणून घ्या सर्वकाही..

सर्व विमा कंपन्यांच्या अटी आणि नियम एकसारखे असतील, ज्यामध्ये विमाराशीची रक्कम आणि प्रीमियम देखील समान असतील. याचा फायदा असा असेल की क्लेम वेळी वाद होण्याची शक्यता कमी असेल. ग्राहक योजना निवडताना, या योजनेच्या किंमती आणि भिन्न विमा कंपन्यांच्या क्लेम सेटलमेंट रेशोची तुलना करू शकतात.

(हे वाचा- 2021 च्या सुरुवातीलाच जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर)

सरल जीवन विमा काय आहे?

सरल जीवन विमा हा एक टर्म लाइफ इन्शूरन्स प्रोडक्ट आहे. हा विमा 18 ते 65 वर्षे वयोगटातील लोक खरेदी करण्यास सक्षम असतील. इंश्योरन्स रेग्यूलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) ने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या पॉलिसींचा कालावधी 4 वर्ष ते 40 वर्षे असेल. मार्गदर्शक सूचनांनुसार आपण सरल जीवन विम्यात 5 लाख ते 25 लाखांपर्यंतचा पॉलिसी खरेदी करू शकता.

45 दिवस जुन्या पॉलिसीवरही मिळेल पूर्ण कव्हर

लिसी जारी झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास अपघातातील मृत्यू वगळता अन्य कोणत्याही परिस्थितीत देय रक्कम दिली जाणार नाही. सरल जीवन विमा अंतर्गत ग्राहकांना मॅच्यूरिटीचा लाभ आणि सरेंडर मूल्य देखील मिळणार नाही.

आत्महत्या प्रकरणात क्लेम मिळणार नाही

पॉलिसीधारकाचा पॉलिसीदरम्यान मृत्यू झाल्यात विम्याच्या रकमेवर नॉमिनीला क्लेम करता येईल. मात्र पॉलिसीधारकाने आत्महत्या केल्यास यामध्ये कोणताही क्लेम मिळणार नाही.

तीन प्रकारे करता येईल पेमेंट

या विम्यासाठी तुम्ही तीन प्रकारे पेमेंट करू शकता. सिंगल प्रीमियम, 5-10 कालावधीसाठी लिमिटेड प्रीमियम पेमेंट किंवा रेग्यूलर लाइफ लाँग मंथली प्रीमियम निवडण्याचा पर्याय आहे. कोणतीही व्यक्ती ही पॉलिसी खरेदी करू शकेल.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 17, 2021, 11:38 AM IST
Tags: insurance

ताज्या बातम्या