Home /News /money /

Solar Pump Yojana: सरकार शेतकऱ्यांच्या शेतात लावत आहे सौर पंप; कसा घ्यावा फायदा, जाणून घ्या

Solar Pump Yojana: सरकार शेतकऱ्यांच्या शेतात लावत आहे सौर पंप; कसा घ्यावा फायदा, जाणून घ्या

Solar Pump Yojana: शेतकऱ्यांच्या शेतात सरकार लावत आहे सौर पंप; जाणून घ्या कसा घ्यावा फायदा

Solar Pump Yojana: शेतकऱ्यांच्या शेतात सरकार लावत आहे सौर पंप; जाणून घ्या कसा घ्यावा फायदा

Solar Pump Yojana: प्रधानमंत्री कुसुम योजनेतर्गत, शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेत सहभागी होऊन शेतकरीही कमाई करू शकतात.

    मुंबई, 30 जून :  जर तुम्ही सोलर ऊर्जेशी (Solar Energy) संबंधित एखादा व्यवसाय सुरु करु इच्छित असाल तर सरकारच्या पीएम कुसुम योजनेशी जोडलं जाण्याचा विचार करू शकता. शेतकऱ्यांच्या पिकाला उत्तम पद्धतीने सिंचन करता यावं, यासाठी सरकरानं अनेक योजना सुरु केल्या आहेत. शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारा सौर पंप (Solar Pump) देण्याकरिता प्रधानमंत्री कुसुम योजना (Pradhan Mantri Kusum Yojana) सुरु आहे. या अंतर्गत सोलर पंप लावण्याकरिता मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जात आहे. अनुदानामुळे शेतकऱ्यांना सौरपंपासाठी खूपच कमी पैसे द्यावे लागतात. प्रधानमंत्री कुसुम योजना 2019 साली सुरु झाली. यानंतर 2020 च्या अर्थसंकल्पात वित्तमंत्र्यांनी या योजनेचा विस्तार केला. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सोलर पॅनल मिळतात. ज्यातून वीज उत्पन्न होते. जेवढी आवश्यक आहे, तेवढी वीज वापरून उरलेली वीज सरकारला विकून पैसेही कमावता येऊ शकतात. हेही वाचा- स्मार्टफोन-लॅपटॉपवर क्षणात डाऊनलोड करू शकता Instagram Reels; Android-iPhone युजर्ससाठी खास ट्रिक सौर पंप कमावण्याचं साधन- शेतीमधील प्रमुख समस्या म्हणजे भारनियमन. यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागते. त्यामुळे सौरऊर्जेवर चालणारे कृषीपंप आल्यास शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो.  या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 30 टक्के आणि राज्य सरकारकडून 45 टक्के अनुदान दिलं जाते. सर्व मिळून शेतकऱ्यांना सोलर पंप खरेदीसाठी 75 टक्के अनुदान दिलं जाईल. शेतकऱ्यांना फक्त 25 टक्के पैसे द्यावे लागतील. या पंपांना विम्याचं संरक्षणदेखील मिळतं. या योजनेचा हेतू सौरउर्जेवर चालणाऱ्या सौर पंपांना प्रोत्साहन देणे हा होय. देशात आतापर्यंत 3 कोटी सौरपंप लावले गेले आहेत. या योजनेअंतर्गत वीज आणि डिझेलवर चालणारी सौरपंप सौर उर्जेवर चालणाऱ्या पंपात बदलले जातील. सौर पॅनलच्या माध्यमातून निर्माण होणारी ऊर्जा सौरपंपासाठी वापरली जाईल आणि वीज शिल्लक राहिल्यास तुम्ही ती विकू देखील शकता. हेही वाचा- PM Kisan Yojana: 11 वा हप्ता अद्याप मिळालेला नाही? येथे करा तक्रार, पैसे होतील जमा कसा होईल फायदा- प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत राज्यांनी वेगवेगळ्या वेबसाईट बनवल्या आहेत. जर तुम्ही या योजनेचा फायदा उचलू इच्छित असाल तर तुम्ही सरकारी वेबसाईटला भेट द्या. अधिक माहितीसाठी https://mnre.gov.in वेबसाईटला भेट द्या.
    First published:

    Tags: Agriculture, Government, Scheme

    पुढील बातम्या