मुंबई, 27 मे : मोदी सरकारच्या पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना ( PMSYM )द्वारे तुम्ही दर महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळवू शकता. सरकारनं असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी पेंशन योजना सुरू केलीय. तुम्हाला त्यासाठी किती पैसे गुंतवावे लागतील, हे तुमच्या वयाप्रमाणे ठरेल. या योजनेत पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर ती रक्कम त्याच्या जोडीदाराला मिळण्याची सोय आहे. या योजनेअंतर्गत पेन्शन घेणारा आपल्या खात्यात जितके पैसे टाकेल, सरकारही तेवढे पैसे खात्यात भरेल. जाणून घेऊ याबद्दल-
आईला भेटताच गहिवरले नरेंद्र मोदी
कोणाला मिळू शकतो फायदा?
तुमचं वय 18 वर्ष ते 40 वर्षांपर्यंत हवं
तुमचं महिन्याचं उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा जास्त नको
या व्यक्तींचा या योजनेत समावेश होऊ शकत नाही
संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा कर्मचारी भविष्य निधी ( EPFO ), नॅशनल पेन्शन स्किम ( NPS ) किंवा राज्य विमा निगम ( ESIC )चे सभासद किंवा इन्कम टॅक्स भरणारे लोक या योजनेचा फायदा घेऊ शकत नाहीत.
या कागदपत्रांची गरज
आधारकार्ड
बचत खातं, जनधन खातं, सोबत IFSC कोड
मोबाइल नंबर
राज्यात मान्सून लांबण्याची शक्यता, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
कसा कराल अर्ज?
EPFO इंडियाच्या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या जवळच्या CSCचा पत्ता मिळवू शकता. याशिवाय LICच्या ब्रँच आॅफिस, ESIC, EPFO किंवा केंद्र आणि राज्य सरकारच्या लेबर आॅफिसमध्ये जाऊन CSC सेंटरचा पत्ता मिळवू शकता.
मोदी 2.0: सरकारमध्ये मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी? ही आहेत नावे!
किती योगदान करू शकता?
तुम्ही 18 वर्षांचे असाल, तर 60 वर्षांपासून तीन हजार रुपये पेन्शन हवं असेल तर दर महिन्याला 55 रुपयांची गुंतवणूक करा.
तुम्ही 29 वर्षांचे असाल, तर 60 वर्षांपासून तीन हजार रुपये पेन्शनसाठी दर महिन्याला 100 रुपये गुंतवणूक करा
तुम्ही 40 वर्षांचे असाल तर 60 वर्षांपासून तीन हजार रुपये पेन्शनसाठी दर महिन्याला 200 रुपये गुंतवणूक करा
अधिक माहितीसाठी https://www.epfindia.gov.in/site_docs/PDFs/MiscPDFs/Scheme_PM-SYM.pdf इथे क्लिक करा.
SPECIAL REPORT: काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी?