Home /News /money /

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PFRDA ने सुरू केल्या 3 नवीन ऑनलाइन सुविधा

पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! PFRDA ने सुरू केल्या 3 नवीन ऑनलाइन सुविधा

कोरोना संकटाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर पेन्शन फंड रेग्‍युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने (PFRDA) नॅशनल पेन्शन स्कीमच्या सब्‍सक्राइबर्ससाठी (NPS Subscribers) तीन नवीन ऑनलाइन सुविधा सुरू केल्या आहेत.

    नवी दिल्ली, 02 डिसेंबर: कोरोना संकटाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर पेन्शन फंड रेग्‍युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथॉरिटीने (PFRDA) नॅशनल पेन्शन स्कीमच्या सब्‍सक्राइबर्ससाठी (NPS Subscribers) तीन नवीन ऑनलाइन सुविधा सुरू केल्या आहेत. नुकतीच पीएफआरडीएने डी-रेमिट (D-Remit) सुविधा सुरू केली आहे. त्याअंतर्गत राष्ट्रीय पेन्शन योजनेचे सब्सक्रायबर्स त्यांच्या एनपीएस खात्यातून (NPS Account) थेट बँक खात्यात (Bank Account) पैसे ट्रान्सफर करू शकतात. तसंच, त्यांना त्याच दिवसाच्या नेट ॲसेट व्हॅल्युच्या (NAV) आधारावर पैसे दिले जातात. एनपीएसमध्ये म्युच्यूअल फंडाच्या पॉलिसीमध्ये एसआयपी (SIP) करता येते डी-रेमिट (D-Remit) सुविधेअंतर्गत, ग्राहक म्युच्युअल फंडासाठी (Mutual Funds) सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) च्या पॉलिसीमध्ये नियमित अंतरावरील एनपीएसमध्ये गुंतवणूक (Regular Investment) करु शकतात. नॉमिनी बदलण्यासाठी पीएफआरडीएने नुकतीच ई-सिग्नेचर आधारित ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. त्याअंतर्गत एनपीएस ग्राहकांची जेव्हा इच्छा असेल तेव्हा ते त्यांच्या नॉमिनीचे नाव बदलू शकतात. यापूर्वी, पेन्शन फंड रेग्युलेटरने व्हिडिओ-आधारित ग्राहक ओळख प्रक्रिया सुरू केली. यामुळे सब्सक्रायबर्सना ऑनलाईन पैसे काढण्याची सुविधा मिळते आहे. एनपीएससाठी डी-रेमिट सुविधा कशी वापरावी डी-रेमिट अंतर्गत, एनपीएस सब्सक्रायबर्सकडून शनिवार, रविवार आणि सुट्टीचे दिवस वगळता इतर सर्व दिवस सकाळी 9.30 वाजेपर्यंत ट्रस्टी बँकेला मिळालेली स्वेच्छा सहयोग रक्कम त्याच दिवशी एनएव्ही करत स्वीकारली जाईल. डी-रेमिट सुविधेअंतर्गत, किमान 500 रुपये स्वीकारले जातील. (हे वाचा-FASTag नसेल तरी नो टेन्शन! हे काम केल्यास भरावा लागणार नाही दुप्पट टोल) -डी-रेमिट सुविधा वापरण्यासाठी एनपीएस ग्राहकांकडे व्हर्च्युअल आयडी (Virtual Account) असणं आवश्यक आहे. सब्सक्रायबरने सेंट्रल रेकॉर्डकीपिंग एजन्सी (CRA) पोर्टलवर जावं. -त्यानंतर परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN) मध्ये नोंदणीकृत ग्राहकाच्या मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. -व्हर्च्युअल आयडी एकदाच जनरेट करावा लागेल. यानंतर, डी-रेमिटसाठी आयडी कायमस्वरुपी PRAN शी अटॅच केला जातो. -टीयर -1 आणि टीयर -2 या एनपीएस खात्यांसाठी विशिष्ट व्हर्च्युअल आयडी आहेत. -नेट बँकिंग सुविधेचा वापर करणारे एनपीएस ग्राहक आर-रेमिट फीचर देखील वापरू शकतात. -नेट बँकिंगमध्ये लॉग इन केल्यानंतर ग्राहकाने त्याचा व्हर्चुअल आयडी ट्रस्टी बँकेच्या आयएफएससी डिटेल्ससोबत लाभार्थी म्हणून जोडला पाहिजे. यानंतर, सबस्क्रायबरच्या बँक खात्यातून त्याचं काँट्रिब्युशन आपोआप डेबिट होईल. तसेच ग्राहक फंडसदेखील ट्रान्सफर करू शकता. एनपीएस नॉमिनेशनमध्ये  अशाप्रकारे करता येतील ऑनलाइन बदल -एनपीएस सब्सक्रायबर असल्यास तुमच्या सीआरए (CRA) सिस्टममध्ये लॉगिन करा. यानंतर, डेमोग्राफिक चेंजेस मेनूमधील अपडेट पर्सनल डिटेल्सवर क्लिक करा. (हे वाचा-कमाईचा हिट फॉर्म्यूला! 5000 रुपयांची गुंतवणूक करून मिळवा लाखो, सरकारही करेल मदत) -यानंतर, ॲड/अपडेट नॉमिनी डिटेल पर्याय निवडा. त्यानंतर मागितलेली माहिती जसे की नॉमिनी असलेल्या व्यक्तीचे नाव, आपला त्याचा संबंध आणि त्याचा सहभाग किती टक्के भरा. -सर्व माहिती सेव्ह आणि कन्फर्म केल्यानंतर, नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ग्राहकांकडून मिळालेल्या ओटीपीद्वारे डिटेल्स कन्फर्म करा. -त्यानंतर नॉमिनेशनमध्ये केलेले बदल ई-सिग्नेचरद्वारे कन्फर्म करा. यानंतर, एनपीएस रेकॉर्डमधील नॉमिनी डिटेल्स अपडेट केले जातील.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Money

    पुढील बातम्या