2021 च्या सुरुवातीलाच जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

2021 च्या सुरुवातीलाच जवळपास 1 रुपयाने महागलं पेट्रोल-डिझेल, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

आज सलग तीन दिवस सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price today) कोणतीही वाढ केली नाही आहे. आज देशातील बहुतांश भागात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जानेवारी: आज सलग तीन दिवस सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price today) कोणतीही वाढ केली नाही आहे. आज देशातील बहुतांश भागात पेट्रोल-डिझेलचे दर स्थीर आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये देखील कच्च्या तेलाच्या किंमती आठवड्याच्या शेवटी कमी झाल्याचे पाहायला मिळाले. असे असले तरी 2021 या वर्षात पेट्रोलचे दर 99 पैशांनी महागले आहेत. तर डिझेलच्या किंमतीत जवळपास 1.01 रुपयांची वाढ झाली आहे. जाणून घ्या काय आहे महानगरातील भाव-

हे आहेत महानगरातील आजचे पेट्रोलचे दर

-दिल्ली: पेट्रोल 84.70 रुपये आणि डिझेल 74.88 रुपये प्रति लीटर

-मुंबई: पेट्रोल 91.32 रुपये आणि डिझेल 81.60 रुपये प्रति लीटर

-कोलकाता: पेट्रोल 86.15 आणि डिझेल डीजल 78.47 रुपये प्रति लीटर

-चेन्नई: पेट्रोल 87.40 आणि डिझेल डीजल 80.19 रुपये प्रति लीटर

-बैंगलूरु: पेट्रोल 87.56 आणि डिझेल डीजल 79.40 रुपये प्रति लीटर

नोएडा: पेट्रोल 84.45 आणि डिझेल डीजल 75.32 रुपये प्रति लीटर

गुरुग्राम: पेट्रोल 82.87 रुपये आणि डिझेल 75.48 रुपये प्रति लीटर

लखनऊ: पेट्रोल 84.36 रुपये आणि डिझेल 75.24 रुपये प्रति लीटर

पटना: पेट्रोल 87.23 रुपये आणि डिझेल 80.02 रुपये प्रति लीटर

गुजरातमधील तरुणाचा प्रताप; अमेरिकेतील वयोवृद्धाला तब्बल 58 कोटींचा घातला गंडा

दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

कसे तपासाल पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.

केवळ 50 हजार गुंतवून दरमहा कमावता येतील 30 ते 40 हजार, वाचा काय आहे व्यवसाय

BPCL कस्टमर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर तर एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.

First published: January 17, 2021, 9:53 AM IST

ताज्या बातम्या