मराठी बातम्या /बातम्या /मनी /

या व्यवसायात आहे दमदार फायदा, तुम्हाला मिळेल 9 लाखांपर्यंत उत्पन्न

या व्यवसायात आहे दमदार फायदा, तुम्हाला मिळेल 9 लाखांपर्यंत उत्पन्न

देशभरात वाढणाऱ्या प्रदुषणामुळे केंद्र सरकारने प्लॅस्टिकवर बंदी आणली आहे. अशावेळी तुम्ही पेपर कपचा व्यवसाय करू शकता. सध्या या कप्सची खूप मागणी बाजारात आहे.

देशभरात वाढणाऱ्या प्रदुषणामुळे केंद्र सरकारने प्लॅस्टिकवर बंदी आणली आहे. अशावेळी तुम्ही पेपर कपचा व्यवसाय करू शकता. सध्या या कप्सची खूप मागणी बाजारात आहे.

देशभरात वाढणाऱ्या प्रदुषणामुळे केंद्र सरकारने प्लॅस्टिकवर बंदी आणली आहे. अशावेळी तुम्ही पेपर कपचा व्यवसाय करू शकता. सध्या या कप्सची खूप मागणी बाजारात आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 16 डिसेंबर: देशभरात वाढणारं प्रदुषण लक्षात घेता प्लॅस्टिकवर बंदी आणण्यात आली आहे. अशावेळी तुम्ही प्लॅस्टिकचा व्यवसाय सुरू करू शकता. सध्या या कप्सना बाजारात विशेष मागणी आहे. शिवाय तुम्ही चांगला नफा देखील मिळवू शकता. विशेष म्हणजे पेपर कप मॅन्यूफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठी सरकार देखील मुद्रा योजनेअंतर्गत मदत करत आहे. केंद्र सरकारकडून याबाबत एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. यामध्ये व्यवसाय सुरू करताना होणाऱ्या होणाऱ्या खर्चापासून ते  त्यामध्ये होणाऱ्या नफ्यापर्यंत सर्वांच गणित मांडण्यात आलं आहे. जाणून घ्या या व्यवसायाविषयी जमीन- हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला 500 वर्गफीट जागेची आवश्यकता भासेल खर्च- या व्यवसायात मशिनरी, इक्विपमेंट, फर्निचर, डाय, इलेक्ट्रिफिकेशन, इन्स्टॉलेशन आणि प्री ऑपरेटिव्हसाठी खर्च असा एकूण खर्च मिळून 10.70 लाख रुपये लागतील कामागारांचा पगार- जर तुम्ही तुमच्या कप व्यवसायात स्किल्ड आणि अनस्किल्ड दोन्ही प्रकारचे कामगार कामासाठी ठेवाल तर त्यांच्या पगारासाठी साधारण 35000 रुपये महिना इतका खर्च उचलावा लागेल. रॉ मटेरिअलवरील खर्च- 3.75 लाख रुपये (हे वाचा-LPG Gas Cylinder Price: सामान्यांचं बजेट कोलमडलं! पुन्हा महागला घरगुती गॅस) युटिलिटीजवर खर्च- 6000 रुपये अन्य खर्च- 20,500 रुपये किती होईल फायदा? जर तुम्ही हा व्यवसाय सुरू करत आहात आणि वर्षाला 300 दिवस काम केले तर तुम्ही 2.20  कोटी युनिट पेपर कप्स तयार करू शकता. तुम्ही हे 30 पैसे प्रति कप किंवा ग्लास या दराने विकू शकता. सरकार करेल मदत केंद्र सरकारच्या मुद्रा लोन योजनेतून तुम्हाला या व्यवसायासाठी मदत मिळेल. अर्थात तुम्ही कर्ज घेऊन देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. मुद्रा लोन अंतर्गत सरकार व्याजावर सबसिडी देतं. या योजनेअंतर्गत एकूण प्रोजेक्ट कॉस्टच्या 25 टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागते, तर 75 टक्के मदत सरकार करतं. (हे वाचा-Gold Price Today: सोन्याचांदीला पुन्हा एकदा झळाळी, वाचा काय आहेत आजचे नवे दर) कुठे मिळेल मशिन? कागदाचे कप्स बनवणारी मशिन तुम्हाला दिल्ली, हैदराबाद, आग्रा तसंच अहमदाबाद यासारख्या शहरात मिळेल. याप्रकारच्या मशिन्स तयार करण्याचे काम इंजीनिअरिंग वर्क करणाऱ्या कंपन्या करतात.
First published:

Tags: Money, Small business

पुढील बातम्या