Home /News /money /

LIC ची खास पॉलिसी! दररोज 200 रुपयांची बचत मिळवून देईल 28 लाखांचा फंड, काय आहे योजना?

LIC ची खास पॉलिसी! दररोज 200 रुपयांची बचत मिळवून देईल 28 लाखांचा फंड, काय आहे योजना?

LIC Policy: तुम्ही एलआयसीच्या एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. यामध्ये तुम्ही दररोज 200 रुपयांची बचत करुन 28 लाखांचा फंड उभारू शकता

    नवी दिल्ली, 31 जुलै: भविष्याच्या सुरक्षेसाठी पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यावर अनेकांचा विश्वास आहे. यातही एलआयसी (LIC) कडे एक विश्वासार्ह कंपनी म्हणून पाहिले जाते. एलआयसीकडून ग्राहकांच्या सोयीसाठी विविध वयोगटातील ग्राहकांसाठी योजना लाँच केल्या जातात. तुम्ही एलआयसीच्या एखाद्या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. ही अशी एक योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दररोज 200 रुपयांची बचत करुन 28 लाखांचा फंड उभारू शकता. या पॉलिसीची खास बाब म्हणजे यामध्ये 15000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन देखील दिली जाते. जाणून घ्या सविस्तर.. एलआयसी जीवन प्रगती स्कीम (LIC Jeevan Pragati Scheme) या योजनेचें नाव एलआयसी जीवन प्रगती स्कीम (LIC Jeevan Pragati Scheme) असं आहे. यामध्ये तुम्ही जितकी सम अश्योर्ड निवडता त्यामध्ये प्रगती होते आणि पॉलिसीच्या अखेरीस सम अश्योर्ड जवळपास दुप्पट होते. ही एक नॉन लिंक्ड पॉलिसी आहे. पॉलिसीतील महत्त्वाचे मुद्दे >> हा एक एंडोमेंट प्लॅन आहे, जो एकाच वेळी तुम्हाला सुरक्षा आणि बचतीची सुविधा प्रदान करतो >> पॉलिसीमध्ये दर पाच वर्षांनी रिस्क कव्हर वाढतो >> पहिल्या पाच वर्षात सम अश्योर्ड तेवढीच राहते >> यानंतर 6 ते 10 वर्षांच्या काळात यामध्ये 25% वरुन 125% होते >> 11 ते 15 वर्षासाठी सम अश्योर्ड 150% होते >> 16 ते 20 वर्षासाठी सम अश्योर्ड 200% होते हे वाचा-तुमच्या जीवनावर थेट परिणाम करणारे हे 7 नियम बदलणार, उद्यापासून लागू होणार बदल काय आहेत फायदे? जर पॉलिसी अवधी दरम्यान पॉलिसी धारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला विम्याची रक्कम सिंपल रिवर्सनरी बोनस (जमा झालेला बोनस) + फायनल अॅडीशन बोनस (जर असल्यास) चे पेमेंट केले जाते. जर तुम्ही 2 लाख रुपये सम अश्योर्डची पॉलिसी घेतली तर पहिल्या 5 वर्षात डेथ बेनिफिटसाठी कव्हरेज 2 लाख, 6 ते 10 वर्षांसाठी कव्हरेज 2.50 लाख, 11 ते 15 वर्षांसाठी कव्हरेज 3 लाख, 16 ते 20 वर्षांसाठी कव्हरेज 4 लाख होतो. अर्थात सम अश्योर्ड दुप्पट होते. याअंतर्गत अपघाती मृत्यू आणि डिसेबिलिटी रायडर देखील उपलब्ध आहे. मात्र याकरता अतिरिक्त प्रीमियम द्यावा लागेल. अशाप्रकारे मिळतील 28 लाख रुपये या योजनेअंतर्गत 15 लाखांची सम अश्योर्ड आणि दररोज 200 रुपयांची बचत करुन तुम्हाला 20 वर्षानंतर जवळपास 28 लाखांचा फंड मिळेल. ही रक्कम थोडीफार कमीजास्त होऊ शकते. हे वाचा-RBI New Rule: उद्यापासून ATM मधून पैसे काढणं, डेबिट-क्रेडिट कार्डचा वापर महागणार काय आहेत अटी? >>वय- 12 ते 45 वर्ष >>पॉलिसी कालावधी: 12 ते 20 वर्ष >>मॅच्योरिटीचे जास्तीत जास्त वय- 65 वर्ष >>कव्हर रक्कम कमीतकमी 1,50,000 रुपये जास्तीत जास्त मर्यादा नाही >>जर पॉलिसीधारकाने 3 वर्ष प्रीमियम भरला तर तो पॉलिसी सरेंडर करू शकतो आणि सरेंडर मुल्य मिळवू शकतो.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Investment, LIC, Money, Savings and investments

    पुढील बातम्या