नवी दिल्ली, 25 मार्च: एलआयसी हाउसिंग फायनान्स (LIC Housing Finance) कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे. जर तुम्ही गृह कर्ज (Home Loan) घेतले असेल तर तुम्हाला 6 महिन्यांचा ईएमआय (EMI on Home Loan) द्यावा लागणार नाही. अर्थात कंपनीने आपल्या ग्राहकांचे 6 ईएमआय माफ केले आहेत. Griha Varishtha योजनेंतर्गत कर्ज घेणार्या ग्राहकांना कंपनीने गुरुवारी ही सुविधा दिली आहे. पगारदार तसेच पेन्शनधारकांसाठी ही योजना डिफॉल्ट बेनिफिट पेन्शन स्कीम (DBPS) अंतर्गत येते.
कोणत्या EMI वर मिळणार सूट?
कंपनी ग्राहकांना 37व्या, 38व्या, 73व्या, 74व्या, 121व्या आणि 122व्या EMI वर सूट देत आहे. ग्राहकांना जेव्हा हे EMI भरायचे असतील तेव्हा त्यांना या सवलतीचा लाभ घेता येईल
कोण घेऊ शकते कर्ज?
गृह वरिष्ठ ही सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या होम लोन पर्यांयांपैकी चांगली योजना आहे. या योजनेद्वारे कर्ज घेणार्याचे वय 65 वर्षांपर्यंत असू शकते. निवृत्तीवेतनधारकांसाठी देखील कंपनीने 'गृह वरिष्ठ' योजना जारी केली आहे. याअंतर्गत, कर्जाची मुदत ग्राहकाचे वय 80 वर्षे होईपर्यंत किंवा जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
(हे वाचा-Gold Price Today: काय आहेत आजचे सोन्याचे दर? आतापर्यंत 11500 रुपयांची घसरण)
6 EMI वर सूट
या योजनेअंतर्गत तयार घरे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 6 EMI ची सूट देण्यात येत आहे. निर्माणाधीन म्हणजेच बांधकाम सुरू असणारी घरे घेणाऱ्यांना देखील या योजनेत काही फायदे देऊ केले आहेत.
कंपनी अधिकाऱ्यांनी दिली माहिती
एलआयसी हाउसिंग फायनान्स (LIC Housing Finance) चे मुख्य कार्यकारी अधिकारी वाय विश्वनाथ गौड यांनी अशी माहिती दिली आहे की, 'गृह वरिष्ठ त्याच्या वैशिष्ट्यांमुळे जुलै 2020 मध्ये लाँच केल्यापासून वर येत आहे. कंपनीने 3000 कोटी रुपयांची सुमारे 15,000 कर्जे वितरित केली आहेत. यावेळी ग्राहकांना कंपनीकडून सहा-ईएमआयमध्ये सूट देण्यात येत आहे.'
(हे वाचा- मे महिन्यापासून तुमच्या हातात येणार कमी Salary! वाचा काय असणार पगाराचं गणित)
किती सिबिल स्कोअर आवश्यक?
कंपनीने अशी माहिती दिली आहे की, सध्या सिबिल स्कोअर 700 आणि त्यापेक्षा जास्त असणाऱ्या ग्राहकांना 15 कोटी पर्यंतच्या गृहकर्जावर मिळणारा व्याजदर 6.90 टक्के पासून सुरू होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.