Home /News /money /

IRCTC Share स्वस्तात खरेदी करण्याची आज दुसरी संधी, पहिल्या दिवशी मिळालं दुप्पट सब्सक्रिप्शन

IRCTC Share स्वस्तात खरेदी करण्याची आज दुसरी संधी, पहिल्या दिवशी मिळालं दुप्पट सब्सक्रिप्शन

सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मधील भागीदारी 'ऑफर फॉर सेल' (Offer For Sale) अंतर्गत विकण्याच्या प्रक्रियेला गुरुवारी नॉन रिटेल इनव्हेस्टर्स (Non-Retail Investors) कडून चांगला प्रतिसाद मिळाला.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली, 11  डिसेंबर : सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU)  इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मधील भागीदारी 'ऑफर फॉर सेल' (Offer For Sale) अंतर्गत विकण्याच्या प्रक्रियेला गुरुवारी नॉन रिटेल इनव्हेस्टर्स (Non-Retail Investors) कडून चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी या श्रेणीमध्ये निश्चित आकारापेक्षा दुप्पट निविदा (Double Subscription) प्राप्त झाल्या होत्या. डिपार्टमेंट ऑफ इनव्हेस्टमेंट अॅसेट्स मॅनेजमेंट (DIPAM) चे सचिव तुहीनकांत पांडे यांच्या माहितीनुसार रिटेल इनव्हेस्टर्सना IRCTC च्या ओएफएस अंतर्गत बोली लावण्याची आज 11 डिसेंबर रोजी दुसरी आणि शेवटची संधी मिळेल. तुम्ही देखील आयआरसीटीसीचा शेअर खरेदी करून चांगला फायदा मिळवू शकता. रेल्वेची कंपनी असणाऱ्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) मधील भागीदारी ऑफर फॉर सेल (OFS) च्या माध्यमातून 20 टक्क्यांपर्यंत विकण्याची सरकारची योजना आहे. गुरुवारी याबाबत बोली लावण्यास सुरुवात झाली आहे. या ओएफएसमध्ये IRCTC च्या शेअरचा भाव (Floor Price) 1,367 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. सरकार OFS च्या माध्यमातून 3.4 कोटींच्या शेअर्सची विक्री करणार आहे. यातून सरकारला 4,374 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा आहे. कंपनीमध्ये सरकारची  87.40 हिस्सेदारी आहे. (हे वाचा-लग्नसराईच्या काळात हा व्यवसाय आहे BEST, होईल लाखो रुपयांची कमाई) कॅपिटल मार्केट रेग्यूलेटर सेबी (SEBI) च्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंतर्गत सरकारला या कंपनीमध्ये त्यांची भागीदारी 75 टक्क्यांपेक्षा कमी करायची आहे. आयआरसीटीचा शेअर मुंबई शेअर बाजारात (BSE) गुरुवारी 1,451.95 रुपयांवर बंद झाला. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत या शेअरची  किंमत 10.27 टक्क्याने कमी आहे. (हे वाचा-एप्रिल 2019 पासून घटणार तुमच्या हातात येणारा पगार, काय आहे फायदा आणि नुकसान?) गुरुवारी ज्या किंमतीवर आयआरसीटीच्या शेअरचा भाव बंद झाला होता, तो सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या  फ्लोअर प्राइजपेक्षा जास्त आहे. बुधवारी देखील फ्लोअर प्राइज 16 टक्क्यांनी कमी होती. अर्थात गुंतवणूकदारांना 16 टक्के सवलत मिळेल. बुधवारी या कंपनीचे शेअर  1618.05 रुपये प्रति शेअर या किंमतीवर बंद झाले होते. फेब्रुवारी 2020 मध्ये कंपनीचे शेअर 52 आठवड्याच्या सर्वोच्च स्तरावर अर्थात 1995 रुपये प्रति शेअरवर पोहोचले होते. केव्हा लाँच झाला IRCTC चा IPO ऑक्टोबर 2019 मध्ये आयआरसीटीसीने त्यांच्या आयपीओ लाँच केला होता. याकतरता गुंतवणूकदरांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आयपीओच्या माध्यमातून सरकारने जवळपास 645 कोटी रुपये कमावले होते आणि 12.60 टक्के भागीदारी विकली होती.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: IRCTC, Share market

    पुढील बातम्या