लेकीचं, मुलाचं, भावाचं, बहिणीचं लग्न असो किंवा स्वतःचं लग्न असो. आता यासाठी तुम्ही स्पेशल लोन घेऊ शकता. यापूर्वी तुम्ही एज्यूकेशन लोनविषयी ऐकलं असेल. मात्र आज आपण वेडिंग लोनविषयी माहिती जाणून घेणार आहोत. ज्या प्रकारे डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड वाढत चाललाय, त्याचप्रमाणे लोक आता त्यांच्या लग्नासाठीही कर्ज घेताय. वेगवेगळ्या बँका देखील वेडिंग लोन देऊन कपल आणि त्यांच्या फॅमिलीसाठी हा दिवस अविस्मरणीय बनवत आहेत. चला जाणून घेऊया लग्नासाठी कर्जाशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती.
वेडिंग लोन किंवा मॅरेज घेण्याची प्रक्रिया देखील इतर कर्ज घेण्यासारखीच आहे. त्यामुळे लग्नासाठी कर्ज घेण्यासाठी थेट बँकेशी संपर्क साधावा. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक यासारख्या इतर बँकांकडून कर्ज घेतले जाऊ शकते. कर्जाची रक्कम 50 हजार ते 20 लाख रुपयांपर्यंत असू शकते. कर्ज घेतल्यानंतर, व्यक्तीला दरमहा ईएमआयद्वारे पैसे बँकेत भरावे लागतील.
टॅक्सपेयर्ससाठी गुडन्यूज! आता झटपट मिळणार TDS आणि AIS ची माहिती, सुरु झालंय नवं अॅप
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)- 10.65%-15.15%
एचडीएफसी (HDFC Bank)- 11.00%
आयसीआयसीआय (ICICI Bank)- 10.75%
अॅक्सिस बँक (Axis Bank)- 10.49%
कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)- 10.99% से शुरू
इंडसइंड बँक (Indusind Bank)- 10.49% से शुरू
ही ट्रेन आहे की, फाइव्ह स्टार हॉटेल? सुविधा पाहून प्रवासी होतील चकीत
1. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय किमान 21 वर्षे असावे
2. व्यक्तीचे मासिक उत्पन्न रु.15,000 असावे
3. क्रेडिट स्कोअर 750 किंवा त्याहून अधिक असावा
1. आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र
2. कायमचा पत्ता
3. मागील 3 महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट
4. मागील 3 महिन्यांची पेमेंट स्लिप
5. रोजगार प्रमाणपत्र
6. फॉर्म 16 किंवा मागील वर्षाचा ITR
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Loan