बंद झालेल्या खात्यामध्ये अद्यापही जमा आहे रक्कम? कधीही काढता येतील हे पैसे, वाचा सविस्तर

बंद झालेल्या खात्यामध्ये अद्यापही जमा आहे रक्कम? कधीही काढता येतील हे पैसे, वाचा सविस्तर

अर्थमंत्रालयाने फेब्रुवारीमध्ये एक अहवाल जारी करत अशी माहिती दिली होती भारतामध्ये अशाप्रकारे निष्क्रिय असणाऱ्या खात्यांमध्ये काही ठराविक लाख नाही तर 35 हजार कोटी रुपये जमा आहेत. ते काढण्यासाठी कुणी येत नाही

  • Share this:

नवी दिल्ली, 29  एप्रिल: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) पैशांची बचत करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहक सेव्हिंग खात्याबरोबरच (Saving Account) विविध पर्यायांमध्ये पैसे गुंतवत आहेत. शिवाय एखाद्या व्यक्तीची बचत खातीही एकापेक्षा अधिक असतात, तर काहीजण बचत खात्याबरोबरच चालू खातं (Current Account) देखील वापरतात. अशी मल्टिपल खाती वापरताना अनेकदा त्याचा वापर होत नाही. या निष्क्रिय खात्यांमध्ये जर पैसे असतील तर काय होईल?

सध्याच्या परिस्थितीत या निष्क्रिय खात्यात असणाऱ्या थोड्याथोडक्या पैशांचीही अनेकांना गरज आहे. जर तुम्ही विचार करत असाल की दीर्घकाळापासून अशाप्रकारे खात्याचा वापर न केल्याने ते निष्क्रिय झालं असेल आणि त्यामुळे तुमचे पैसे बुडाले आहेत, तर असं नाही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार ज्या खात्यांमध्ये दोन वर्षांपासून कोणताही व्यवहार केला जात नाही, त्यांना इनअॅक्टिव्ह केलं जातं पण त्यात जर ग्राहकांचे पैसे असतील तर ते काढता येऊ शकतात.

(हे वाचा-30 एप्रिलपूर्वी पूर्ण करा ही 4 महत्त्वाची आर्थिक कामं, मिळेल चांगला फायदा)

अर्थमंत्रालयाने फेब्रुवारीमध्ये एक अहवाल जारी करत अशी माहिती दिली होती भारतामध्ये अशाप्रकारे निष्क्रिय असणाऱ्या खात्यांमध्ये काही ठराविक लाख नाही तर 35 हजार कोटी रुपये जमा आहेत. ते काढण्यासाठी कुणी येत नाही. याला अनक्लेम्ड डिपॉझिट (Unclaimed Deposits) म्हटलं जातं. एवढी रक्कम बँकांमध्ये केवळ फिक्स्ड डिपॉझिट नाही तर सेव्हिंग आणि करंट अकाउंटमध्ये पडून आहे. दहावर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी हा पैसा बँकेत आहे.

असे मिळतील तुमचे पैसे

बँकिंग तज्ज्ञ जितेश श्रीवास म्हणतात की अनेर लोकांनी एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती उघडली आहेत. ज्यात त्यांच्या 500 ते 1000 रुपयांच्या देखील ठेवी आहेत. परंतु बँकेने अनेक शुल्क लावून ते पैसे कापले असावेत असा विचार करुन अनेकांनी ते पैसे काढले नाही आहेत. ज्या बँकांमध्ये कमीत कमी रक्कम खात्यात ठेवणं अनिवार्य असते, अशा खात्यांमधलीच रक्कम कापली जाते. किमान शिल्लक ठेवणे बंधनकारक नसल्यास आपण जेव्हा इच्छित असाल तेव्हा हे पैसे काढून घेऊ शकता. इतकेच नाही तर बँक तुम्हाला व्याजासहित पैसे परत करेल. तुम्ही बँकेत जाऊन केवायसी दाखवून तुमचे पैसे परत घेऊ शकता.

(हे वाचा-दररोज फक्त 167 रुपये बचत करून कोट्यधीश होण्याची संधी; जाणून घ्या या स्कीमबाबत)

दहा वर्षांपासून बँकांमध्ये असणारी ठेवी आरबीआयला दिली जाते. रिझर्व्ह बँक ही रक्कम डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेयरनेस फंड (DEAF) मध्ये जमा करते. या योजनेअंतर्गत ठेवीदारांच्या हितांचा प्रचार करण्याचे काम प्रामुख्याने केले जाते. दुसरीकडे, विमा पॉलिसींकडे असणारी अनक्लेम्ड रक्कम मॅच्युरिटीनंतर 10 वर्षांनी देखील क्लेम केली गेली नाही, तर ही रक्कम केंद्र  सरकारच्या वरिष्ठ नागरिक कल्याण निधीमध्ये (SCWF) जमा केली जाते.

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 29, 2021, 3:33 PM IST

ताज्या बातम्या