मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सामान्यांचं बजेट कोलमडणार! आयात शुल्क कमी होऊनही खाद्यतेलाच्या किंमतीत दिलासा नाही

सामान्यांचं बजेट कोलमडणार! आयात शुल्क कमी होऊनही खाद्यतेलाच्या किंमतीत दिलासा नाही

खाद्यतेलाच्या किंमतीही (Edible Oil Prices) आसमंताला भिडत आहेत, त्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

खाद्यतेलाच्या किंमतीही (Edible Oil Prices) आसमंताला भिडत आहेत, त्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

खाद्यतेलाच्या किंमतीही (Edible Oil Prices) आसमंताला भिडत आहेत, त्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 16 जून: एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव (Petrol-Diesel Price Hike) वाढत आहेत, एलीपीजी गॅसच्या किंमतीही (LPG Gas Price) सामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. या परिस्थितीत खाद्यतेलाच्या किंमतीही (Edible Oil Prices) आसमंताला भिडत आहेत, त्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोहरीचं तेलाच्या किंमती दुहेरी शतकाच्या दिशेने आहेत तर पाम तेलाचे दर देखील गेल्या एका वर्षात दुपटीने वाढले आहेत.

खाद्यतेलाचे दर कमी करण्यासाठी त्यावरील आयात शुल्क (Import Duty) कमी  करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. आयात शुल्कात कपात केल्याने देशांतर्गत बाजारात खाद्य तेलाचे दर खाली येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परंतु तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की यामुळे फारसा फरक पडणार नाही. तसं बघायला झालं तर खाद्यतेलांच्या वाढीमागील खरं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलबिया पिकांच्या उत्पादनातील संकट. यातील मागणी आणि पुरवठ्यातील अंतर खूप मोठं आहे. महत्त्वाचे म्हणजे भारत आपली देशांतर्गत गरज भागवण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात करतो.

हे वाचा-तुमचं PAN आधार कार्डशी लिंक नसेल तर होईल निष्क्रिय, दंड भरण्यासाठीही राहा तयार

बायोडिझेलचा वापर वाढवल्याने किंमतींमध्ये तेजी

जगभरात तेलबिया (Oilseeds) पिकांच्या उत्पादनावर संकट आहे. दुष्काळामुळे अमेरिका आणि ब्राझिलमधून सोयाबीनचा पुरवठा घटल्याने असं घडत आहे. अमेरिकन कृषि विभागाच्या (US Department of Agriculture) मते जगभरात सोयाबीनचा स्टॉक सप्टेंबरपर्यंत 8.79 कोटी टनच्या पाच वर्षांच्या निचांकी पातळीवर पोहोचलं आहे. अशाप्रकारेच कोरोनामुळे दक्षिणपूर्व आशियायी देशात पाम तेलाच्या प्लांटेशनमध्ये अडचणी निर्माण झाल्याने किंमती वाढल्या आहेत. शिवाय बायोडिझेलचा (biodiesel) वापर वाढत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलांच्या किंमतीत तेजी आली आहे.

हे वाचा-या सरकारी बँकेच्या नेट बँकिंगमध्ये गोंधळ, ग्राहकांच्या विविध तक्रारी

सोया ऑइल फ्यूचर्समध्ये 70 टक्क्यांनी वाढ

सोया ऑइल फ्यूचर्समध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्यावर्षी पाम तेलाच्या किंमती 18 टक्क्यांनी वाढल्या होत्या. जगभरात सर्वाधिक वापर याच तेलाचा होतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती सर्वोच्च पातळीवर असल्याने देशांतर्गत बाजारात पाम ते आणि सोया तेलाच्या किंमती एका वर्षात दुप्पट झाल्या आहेत.

क्रूड, सोन्यानंतर आता खाद्यतेल आयतीमध्ये तिसऱ्या स्थानावर

खाद्य तेलाच्या किंमती वाढल्यामुळे भारताचा आयात खर्च वाढेल. कारण दरवर्षी खाद्यतेलांच्या आयातीवर भारत सरासरी 8.5 ते 10 अब्ज डॉलर्स खर्च करतो. क्रूड ऑइल आणि सोन्यानंतर खाद्यतेल हा तिसरा सर्वात मोठी आयात होणारा घटक आहे.  उद्योगांच्या अंदाजानुसार, भारतातील पाम तेलाची आयात केवळ दोन दशकांत 4 दशलक्ष टनांवरून 15 दशलक्ष टनांपर्यंत वाढली आहे.

First published:

Tags: Money