• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • तुम्हालाही नवीन कारसाठी Loan हवंय? मग आधी जाणून घ्या त्यासाठीची पात्रता आणि महत्त्वाची कागदपत्रं

तुम्हालाही नवीन कारसाठी Loan हवंय? मग आधी जाणून घ्या त्यासाठीची पात्रता आणि महत्त्वाची कागदपत्रं

कार लोण घेण्यासाठीची पात्रता आणि कागदपत्रं जाणून घ्या

कार लोण घेण्यासाठीची पात्रता आणि कागदपत्रं जाणून घ्या

जाणून घेऊया काय असतात हे निकष आणि आवश्यक कागदपत्रे.

  • Share this:
    मुंबई, 25 नोव्हेंबर: प्रत्येक व्यक्तीला आपली आवडती कार (Car) घेण्याची इच्छा असते काही स्वतः च्या वापरासाठी कार घेतात तर काही लोक व्यवसाय करण्यासाठी त्या गरजा पूर्ण करणारी वाहनं खरेदी करतात. स्वतःसाठी, कुटुंबासाठी घेतल्या जाणाऱ्या वाहनांना पॅसेंजर व्हेईकल्स (Passenger Vehicle) म्हटलं जातं. यामध्ये हॅचबॅक, सेदान, एसयूव्ही अशा अनेक प्रकारच्या कार्स उपलब्ध असतात. आकार, सुविधा यानुसार या कार्सची किंमत वाढत जाते. छोट्या कार्सची किंमत चार ते पाच लाखांपासून सुरू होते तर त्याहून मोठ्या कार्सची किंमत पाच, सहा लाखांपासून पुढे असते.अलिशान कार्सची किंमत तर काही लाखांपासून कोटींपर्यंत असते. त्यामुळे आपली आवडती कार घेण्यासाठी बहुतांश लोकांना कर्ज घेण्याची गरज भासते. त्याकरता बँक किंवा वित्तीय संस्थाची मदत घेतली जाते. कार घेण्यासाठी कर्ज मिळण्यासाठी आपण बँक (Bank) किंवा वित्तीय संस्थेकडे (Financial Institution)अर्ज केल्यास कर्ज मंजूर करण्यापूर्वी बँक किंवा वित्तीय संस्था कर्जदाराची काही पात्रता निकषांनुसार (Eligibility Criteria) पडताळणी करतात. ते सर्व निकष कर्जदार पूर्ण करत असेल तरच कर्ज मंजूर केले जाते. तसेच कर्ज मिळण्यासाठी काही कागदपत्रेही (Documents)आवश्यक असतात. नवीन कार (New Car) घेण्यासाठी कर्ज मिळते तसेच जुनी कार (Used Cars) घेण्यासाठीही कर्ज मिळते. त्यासाठी कागदपत्रे आणि निकष सारखेच असतात. जाणून घेऊया काय असतात हे निकष आणि आवश्यक कागदपत्रे. Personal Loan, Credit Card आणि BNPL शॉपिंगसाठी कोणता पर्याय फायदेशीर? पात्रता निकष : वाहन कर्ज मिळण्यासाठी 18 ते 75 वर्षे वयाची व्यक्ती अर्ज करू शकते. त्या व्यक्तीचे किमान मासिक उत्पन्न (Monthly Income) 20 हजार रुपये असणे आवश्यक आहे. ती व्यक्ती जिथे नोकरी करत असेल तिथं ती गेल्या एका वर्षापासून काम करत असल्याचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. कर्ज मिळण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती सरकारी किंवा खासगी कंपनीत नोकरी करणारी किंवा व्यावसायिक असणे आवश्यक आहे. हे सर्व निकष पूर्ण होत असतील तरच बँक किंवा वित्तीय संस्था वाहन कर्ज मंजूर करते. हे निकष सिद्ध करणारी काही कागदपत्रे देणेही अनिवार्य असते. या कागदपत्रांमध्ये वैध ओळखपत्र पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, प्रमाणपत्र आदींचा समावेश असतो. आवश्यक कागदपत्रे : ओळखीचा पुरावा देण्यासाठी (Indentity Proof) आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड यापैकी एक ओळखपत्र असणे आवश्यक असते. पत्त्याचा पुरावा (Address Proof) देण्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशनकार्ड, वीज, पाणी, दुरध्वनी यांची बिले यापैकी एक कागदपत्र असणे महत्त्वाचे आहे. यासह उत्पन्नाचा पुरावा देणेही आवश्यक आहे. याकरता फॉर्म 16, नोकरदार असल्याचा मासिक उत्पन्नाची स्लिप, इन्कमटॅक्स रिटर्न (Income Tax Return)आणि गेल्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट (Bank Statements)ही कागदपत्रे देणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे वरील कागदपत्रेच सगळीकडे ग्राह्य धरली जातात आणि त्याचीच मागणी केली जाते. तरीही प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थेची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे वेगवेगळ्या कागदपत्रांचीही गरज भासू शकते. कर्जदाराच्या स्थितीनुसारही कागदपत्रांमध्ये बदल होऊ शकतो, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. बँक किंवा वित्तीय संस्था गेल्या तीन किंवा सहा महिन्यांची पेमेंट स्लिप, दोन वर्षांचे इन्कमटॅक्स रिटर्न्स मागवते कारण त्या आधारे कर्जदाराची कर्ज परतफेडीची क्षमता तपासली जाते. आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट याद्वारे कर्जदाराचे नागरिकत्व, ओळख आणि कायमचा पत्ता याची खात्री पटवली जाते.पॅनकार्डचा उपयोग कर्जदाराने आधी काही कर्ज घेतलं आहे का? याची खात्री घेण्यासाठीही केला जातो. तुमच्या बँकेतल्या अकाउंटचं Cash withdrawal limit किती असतं आणि ते कसं ठरतं? त्याचप्रमाणे कारचे डीलरकडे बुकिंग झाल्यानंतर पावत्याही द्याव्या लागतात. जेणेकरून बँक कर्जाची रक्कम आणि कारची किंमत याची पडताळणी करते. कार इश्युरन्स आणि ड्रायव्हिंग लायसन्स हेदेखील तपासले जाते. त्या आधारे सर्व कायदेशीर बाबींचे पालन केले गेले असल्याची खात्री केली जाते. आजकाल वाहन कर्ज मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि जलद झाली आहे. कार डीलर्स किंवा कार उत्पादक कंपन्यांनी बँका किंवा वित्तीय संस्थांशी सहकार्य करार केलेला असतो. त्यामुळे ग्राहक डीलरकडे कार खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा त्याला कर्ज घ्यायचे असल्यास तिथेच त्याला कर्ज सुविधा पुरवल्या जातात. आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर अत्यंत जलदगतीने कर्ज प्रक्रिया पूर्ण होते. अनेकदा कर्ज प्रक्रिया शुल्क माफीची सवलतही दिलेली असते किंवा अन्य काही फायदे दिलेले असतात. त्याचा लाभही ग्राहकांना मिळतो. ग्राहकाने त्याला आवडलेली जी कार बुक केली आहे, तिच्या ऑन रोड किमतीच्या 80 ते 90 टक्के रक्कम कर्जाऊ मिळते. त्यामुळे अनेकांचे महागडी कार घेण्याचे स्वप्नही सहजपणे पूर्ण होते. फक्त आवश्यक तेवढे डाउन पेमेंट केले की ग्राहक आपली आवडती कार घरी घेऊन येऊ शकतो. तेव्हा तुम्हालाही तुमची आवडती कार घरी आणायची असल्यास वरील निकष पूर्ण होतात का याची खात्री करा आणि डीलरकडे जाऊन तुमची स्वप्नातील कार घरी घेऊन या. या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दारात आणा तुमची आवडती कार...
    Published by:Atharva Mahankal
    First published: