मोदी सरकारच्या या पेन्शन योजनेमध्ये करताय गुंतवणूक? अशाप्रकारे तपासा तुमचं योगदान

मोदी सरकारच्या या पेन्शन योजनेमध्ये करताय गुंतवणूक? अशाप्रकारे तपासा तुमचं योगदान

अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana) या महत्त्वाच्या योजनेमध्ये 18-40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. यामध्ये वयाच्या साठाव्या वर्षानंतर पेन्शन मिळते

  • Share this:

नवी दिल्ली, 23 जानेवारी: अटल पेन्शन योजना  (Atal Pension Yojana - APY) ही असंघटित क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी लाँच करण्यात आलेली योजना आहे. या योजनेमध्ये 18-40 वयोगटातील कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. यामध्ये वयाच्या साठाव्या वर्षानंतर पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. APY  मध्ये पेन्शनची रक्कम तुम्ही गुंतवलेल्या रकमेनुसार आणि तुमच्या वयावर निर्भर असते. या योजनेमध्ये कमीतकमी 1000, 2000, 3000, 4000 रुपये ते जास्तीत जास्त 5000 रुपये पेन्शन मिळते. तुम्ही तुमच्या योगदानाची रक्कम भरल्यानंतर ते ट्रॅक देखील करू शकता. केंद्र सरकारने या योजनेची सुरुवात मे 2015 पासून केली होती.

वाचा या योजनेचे फायदे

जितक्या लवकर तुम्ही अटल पेन्शन योजनेशी जोडले जाल, तितका अधिक फायदा तुम्हाला मिळेल. वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत एखादी व्यक्ती सामील झाली तर त्याला दरमहा 210 रुपये गुंतवावे लागतील. सेवानिवृत्तीनंतर वयाच्या 60 व्या वर्षापासून तुम्हाला दरमहा 5000 रुपये मासिक पेन्शन मिळेल.

(हे वाचा-Home Loan: ही बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, वाचा किती आहे व्याजदर)

करू शकता मोबाइल अॅपचा वापर

एपीवाय ग्राहक या योजनेचे मोबाइल अॅप देखील वापरू शकतात. ज्यामुळे त्यांचे काम अधिक सुलभ होईल. एपीवाय युजर्सना शेवटचे 5 व्यवहार तपासण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तुम्ही कोणत्याही शुल्काशिवाय ट्रांझॅक्शन स्टेटमेंट आणि ई-PRAN देखील डाउनलोड करू शकता.

तुमचे एपीवाय व्यवहाराचे स्टेटमेंट पाहण्यासाठी  तुम्हाला APY NSDL CRA च्या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याठिकाणी लॉग इन करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या PRAN आणि बचत खात्याचा तपशील आवश्यक असेल. जर PRAN सहजपणे उपलब्ध नसेल तर तुम्हाला तुमचे नाव, खाते क्रमांक आणि जन्मतारीख वापरावी लागेल.

(हे वाचा-तुम्हाला माहित आहे का की किती महत्त्वाचे आहेत क्रेडिट कार्ड स्टेटमेंट डिटेल्स?)

इनकम टॅक्समध्ये सूट

APY कॉन्ट्रीब्यूशन केल्यानंतर इनकम टॅक्स कायदा 1961 च्या सेक्शन 80CCD (1) अंतर्गत सूट मिळते. दरम्यान सरकारने यामध्ये ऑटो-डेबिट सुविधा थांबवली होती. पण 1 जुलै 2020 पासून ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही एप्रिल 2020 ते ऑगस्ट 2020 पर्यंतचे योगदान सप्टेंबरपर्यंत जमा केले असेल, तर तुम्हाला कोणतीही पेनल्टी द्यावी लागणार नाही.

Published by: Janhavi Bhatkar
First published: January 23, 2021, 2:26 PM IST

ताज्या बातम्या