• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • KKR-Reliance Retail deal: केकेआर रिलायन्स रिलेटमध्ये गुंतवणार 5550 कोटी, खरेदी करणार 1.28 % भागीदारी

KKR-Reliance Retail deal: केकेआर रिलायन्स रिलेटमध्ये गुंतवणार 5550 कोटी, खरेदी करणार 1.28 % भागीदारी

अमेरिकन बायआऊट फर्म केकेआर अँड कं. (KKR & Co)रिलायन्स समूहाच्या रियालन्स रिटेलमध्ये 5,550 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 1.28 टक्क्यांची भागीदारी खरेदी करणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 सप्टेंबर : अमेरिकन बायआऊट फर्म केकेआर अँड कं. (KKR & Co)रिलायन्स समूहाच्या रियालन्स रिटेलमध्ये 5,550 कोटी रुपयांची गुंतवणूक करून 1.28 टक्क्यांची भागीदारी खरेदी करणार आहे. एकाच महिन्याच्या कालावधीत रिलायन्स समूहाच्या या युनिटचे केलेला हा दुसरा महत्त्वाचा करार असणार आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची सब्सिडिअरी असणारी रिलायन्स रिटेल भारतातील सर्वात मोठा किरकोळ व्यवसाय चालवते. याअंतर्गत देशभरातील 7000 शहरांमध्ये जवळपास 12 हजारांपेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. आरआयएल कडून 23 सप्टेंबर रोजी एक्सचेंज फायलिंगमध्ये अशी माहिती दिली की, या गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेलचे प्री-मनी इक्विटी मुल्य 4.21 लाख कोटी रुपये झाले आहे. रिलायन्स समूह अॅमेझॉन इंडिया आणि वॉलमार्टच्या मालकीचे असणाऱ्या फ्लिपकार्टशी स्पर्धा करण्यासाठी जगभरातील महत्त्वाच्या कंपन्यांशी करार करत आहे. तेल कंपन्या ते अगदी टेलिकॉम, आरआयएल त्यांच्या रिटेल बिझनेसचा विस्तार करत आहे. या स्पर्धकांशी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्स रिटेलच ग्लोबल गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. केकेआरची रिलायन्स समूहामध्ये असणारी ही दुसरी गुंतवणूक आहे. मे 2020 मध्ये केकेआरने अशी घोषणा केली होती की, ते डिजिटल सेवा पुरवणाऱ्या रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये (Jio Platform) 11,367 कोटींची गुंतवणूक करतील. (हे वाचा-नवीन बँकिंग कायद्याला संसदेत मिळाली मंजुरी, तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम) दरम्यान या कराराबाबत बोलताना रिलायन्स समूहाचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) असे म्हणाले की, 'सर्व भारतीयांच्या भल्यासाठी भारतीय रिटेल इकोसिस्टममध्ये वृद्धी आणि बदल करण्याच्या दृष्टीने पुढे जाताना रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये गुंतवणूकदार म्हणून केकेआरचे स्वागत करताना मला आनंद होत आहे.' केकेआरचे सह-संस्थापक आणि सह-मुख्य कार्यकारी अधिकारी हेनरी क्रॅविस (Henry Kravis) असे म्हणाले की, 'रिलायन्स रिटेलचा नवीन वाणिज्य प्लॅटफॉर्म ग्राहक आणि छोट्या व्यवसाय या दोघांसाठी महत्त्वाची गरज भागवत आहे कारण अधिक भारतीय ग्राहक ऑनलाइन शॉपिंगचा वापर करत आहेत आणि कंपनी किराणांना मूख्य साखळीतील भाग बनण्यासाठी साधने उपलब्ध करुन देते आहे. रिलायन्स रिटेलला भारतातील आघाडीचे सर्व साधारण विक्रेते बनविण्याच्या मोहिमेस पाठिंबा देताना आणि शेवटी एक सर्वसमावेशक भारतीय किरकोळ अर्थव्यवस्था तयार करण्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे.' (हे वाचा-सोन्याचांदीच्या किंमतीत या महिन्यातील सर्वात मोठी घसरण,चांदी 5781 रुपयांनी उतरली) दोन आठवड्यांपूर्वी प्रायव्हेट इक्विटी क्षेत्रातील मोठी फर्म असणाऱ्या सिल्ह्वर लेक पार्टनर्सने देखील रिलायन्स रिटेलमध्ये 7500 कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. रिलायन्स रिटेल व्हेंचर्समध्ये त्यांनी 1.75 टक्के भागीदारीत गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. तर याआधी रिलायन्स समुहाची (Reliance Industries) उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स (RRVL) ने किशोर बियानी प्रमोटेड फ्यूचर ग्रुप (Future Group)च्या रिटेल, होलसेल व्यवसाय, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊस व्यवसायाचे संपादन करण्याची घोषणा केली होती. रिलायन्स रिटेल आणि फ्यूचर ग्रृपमध्ये हा करार 24,713 कोटींमध्ये करण्यात आला.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: