नवी दिल्ली, 4 जानेवारी, : फ्युचर ग्रुप (Future Group) आणि अॅमेझॉन (Amazon) या दोन रिटेल कंपन्यातील वाद आता शिगेला पोहचला आहे. अमेरिकन कंपनी अॅमेझॉननं याबद्दलच्या करारातील तरतुदींचा भंग केल्याचा आरोप फ्युचर ग्रुपचे सीईओ किशोर बियानी (Kishore Biyani) यांनी केला आहे. या प्रकरणात तब्बल 8 वेळा कंपनीशी संपर्क साधूनही त्यांनी आमची मदत केली नाही, असा त्यांचा आरोप आहे.
‘इकॉनॉमिक टाईम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखातीमध्ये बियानी यांनी याबबतचा विस्तृत अनुभव सांगितला आहे. बियानी यांनी त्यांचे रिटेल स्टोअर्ल आणि अन्य लॉजिस्टीक व्यवसाय रिलायन्स रिटेल व्हेंचर्स (RRVL) या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीला (RIL) 24,713 कोटींना विकण्याचा निर्णय मागच्या वर्षी घेतला होता
हे वाचा-
Bank of Barodaची नवीन सेवा, अवघ्या 30 मिनिटांत मंजूर होणार कर्ज
रिलायन्स रिटेलनं आमच्या मदतीसाठी तारणहार म्हणून धाव घेतली, अशी माहिती बियाणी यांनी सांगितली. तर अॅमेझॉन कंपनीचा याबद्दलचा व्यवहार हा सुस्त होता, असा फरक देखील बियाणी यांनी सांगितला. आमच्या कंपनीचे सर्व कर्मचारी व्हेंडर्स आणि गुंतवणुकदारांना त्यांच्या सुस्त कारभाराचा त्रास देण्याचा त्यांचा हेतू होता का? असा प्रश्नही बियानी यांनी विचारला आहे.
फ्युचर समूहाने रिलायन्सशी झालेल्या कराराबाबत अनेकदा अॅमेझॉनला माहिती दिली होती आणि त्यांनी नेहमीच पाठिंबा दर्शविला. तसंच या गोष्टीला कधीही विरोध केला नाही, असेही बियानी यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.