Home /News /money /

फक्त 1000 रुपयाच्या गुंतवणुकीत पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार डबल रिटर्न! असा घ्या फायदा

फक्त 1000 रुपयाच्या गुंतवणुकीत पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार डबल रिटर्न! असा घ्या फायदा

तुमच्या बॅंकेपेक्षा FD वर दुप्पट व्याज देणार पोस्टाची 'ही' योजना. जाणून घ्या योजनेबाबत सर्व काही.

    नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : प्रत्येक व्यक्ती आपल्या कष्टानं मिळवलेले पैसे गुंतवताना 100 वेळा विचार करतो. जेणेकरून भविष्यात आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल. मात्र बर्‍याच वेळा लोक आपली कमाई केलेली रक्कम अशा ठिकाणी गुंतवणूक करतात जिथं केलेल्या गुंतवणूक रिटर्न चांगले मिळत नाहीत. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशा योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला डबल रिटर्न मिळेल. तुम्ही पोस्ट ऑफिस किसान विकास पत्र (KVP) योजनेत चांगल्या परताव्यासाठी आपले पैसे गुंतवू शकता. या योजनेत तुम्हाला वार्षिक व्याज 6.9 टक्के मिळेल. या योजनेत पैशाची गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकाला पोस्ट ऑफिसकडून बॉण्डच्या स्वरूपात प्रमाणपत्र दिले जाते. जी तुम्हाला देशातील कोणत्याही टपाल कार्यालयातून मिळू शकेल. वाचा-Aadhaar PVC card: असं बनवा ATM सारखं दिसणार आधार कार्ड, ऑनलाइन करा ऑर्डर KVP योजनेत गुंतवणूकीची मर्यादा नाही तुम्ही पोस्ट ऑफिसच्या KVP योजनेत जास्तीत जास्त पैसे गुंतवू शकता. मात्र या योजनेत आपण किमान 1000 रुपयांपर्यंत गुंतवणूक केली पाहिजे. आपण या योजनेतील गुंतवणूकीचे प्रमाणपत्र इतर कोणत्याही व्यक्तीस सहज हस्तांतरित करू शकता तसेच एका पोस्ट ऑफिसमधून दुसर्‍या पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकते. त्याच वेळी तुम्ही देशातील काही बँकांकडून या योजनेचे बाँड खरेदी करू शकता. वाचा-7th Pay Commission:केंद्रीय कर्मचारी, पेंशनधारकांना 'या' महिन्यापासून मिळणार वाढ दोन लोकांच्या नावाने करू शकता गुंतवणूक पोस्ट ऑफिसच्या KVP योजनेत गुंतवणूकीचे तुम्ही दोन लोकांची नावेदेखील निवडू शकता. मात्र यात गुंतवणूक करणार्‍या व्यक्तीचे वय किमान 18 वर्षांपेक्षा जास्त असावे. जर सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास तर या योजनेसाठी एक प्रौढ आणि एक अल्पवयीन व्यक्तीचे नाव देऊ शकता. वाचा-रिलायन्स रिटेलची मोठी गुंतवणूक, अर्बन लॅडरचा 96 टक्के हिस्सा घेतला विकत! 30 महिन्यांसाठी करू शकता गुंतवणूक KVP योजनेत केलेली गुंतवणूक किमान अडीच वर्षे लॉक राहते. तुम्ही 30 महिन्यांपर्यंत या गुंतवणूकीची पूर्तता करू शकत नाही. त्याच वेळी, या योजनेतील आपली गुंतवणूक 6.9 टक्के वार्षिक व्याजदराने 10 वर्ष आणि 4 महिन्यांत दुप्पट होईल. मात्र, जर तुम्हाला आयकर बचतीसाठी गुंतवणूक करायची असेल तर त्यात गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या