Elec-widget

एअर इंडियाचं टॉयलेट साफ करायलाही कचरले नाहीत हे बडे उद्योगपती!

एअर इंडियाचं टॉयलेट साफ करायलाही कचरले नाहीत हे बडे उद्योगपती!

टाटा ग्रुपवरच्या एका पुस्तकात लेखक शशांक शाह यांनी लिहिलं आहे, जेआरडी टाटा एअर इंडियाच्या कारभारात एवढं बारीक लक्ष घालायचे की त्यांनी एकदा कर्मचाऱ्यांसोबत टॉयलेटही साफ केलं होतं.

  • Share this:

मुंबई, 29 नोव्हेंबर : भारतात विमान उद्योगाची मुहूर्तमेढ रोवणारे जेआरडी टाटा हे टाटा एअरलाइन्सशी असे जोडलेले होते की या एअरलाइन्सच्या राष्ट्रीयीकरणानंतरही ते यात लक्ष घालायचे. स्वातंत्र्यांनंतर जेव्हा पंडित नेहरूंनी टाटा एअरलाइन्सचं राष्ट्रीयीकरण करून त्याचं नाव एअर इंडिया केलं तेव्हा जेआरडी म्हणजेच जहांगीर रतनजी भाई टाटा त्याचे अध्यक्ष झाले.

स्वत:पासून सुरुवात

टाटा ग्रुपवरच्या एका पुस्तकात लेखक शशांक शाह यांनी लिहिलं आहे, जेआरडी टाटा एअर इंडियाच्या कारभारात एवढं बारीक लक्ष घालायचे की त्यांना एकदा कर्मचाऱ्यांसोबत टॉयलेटही साफ केलं होतं. एअर इंडियाच्या काउंटरवर थोडीशी धूळ असली तरी ते ती हातांनी साफ करायलाही कचरायचे नाहीत. ते प्रत्येक गोष्टीत काटेकोर होते. विमानाच्या आतलं डेकोरेशन, एअर होस्टेसच्या साडीचा रंग, एअर इंडियाचं होर्डिंग हे सगळं कसं असावं याबद्दल त्यांची रसिक दृष्टी होती.

(हेही वाचा : अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का, 8 प्रमुख उद्योगांमध्ये झाली घट)

अनेक क्षेत्रांत ओळख

Loading...

जेआरडी टाटा हे फक्त उद्योगपतीच नव्हते तर त्यांनी विज्ञान, आरोग्य आणि विमान उद्योग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. जेआरडी टाटा 22 व्या वर्षी टाटा सन्सचे संचालक बनले आणि 12 वर्षांनंतर अध्यक्षही झाले. 1926 ते 1991 या काळात त्यांनी टाटा ग्रुपची धुरा समर्थपणे सांभाळली आणि या ग्रुपला प्रगतीच्या शिखरावर नेलं.

(हेही वाचा : सोनंखरेदीचा हा नियम पाळा नाहीतर होईल 1 लाखांचा दंड आणि तुरुंगवास)

टाटांच्या कार्यकाळात या ग्रुपमधल्या 14 कंपन्यांची संख्या 90 वर गेली. या कंपन्यांमध्ये त्यांनी कामगारांच्या कल्याणासाठी पर्सनल विभागाची स्थापना केली. समाज कल्याणाच्या योजनाही त्यांनी सुरू केल्या.

मुंबई ते कराची उड्डाण

टाटा स्टील, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, टाटा मेमोरियल कॅन्सर रिचर्च सेंटर, टीसीएस या सगळ्याच कंपन्यांमध्ये त्यांनी रुजवलेली कार्यसंस्कृती पाहायला मिळते.

भारतरत्न जेआरडी टाटा हे या ग्रुपचे अध्यक्ष होते. त्याचबरोबर ते कमर्शिअल पायलटही होते. त्यांनी स्वत: कराची ते मुंबई असं उड्डाण केलं होतं. त्यानंतर 78 व्या वर्षीही सोलो उड्डाण करून त्यांनी तरुणांना साहसासाठी प्रेरणा दिली.

=================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2019 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com