मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Rakesh Jhunjhunwala biography : 5 हजार रुपयांपासून 39 हजार कोटींचा प्रवास, बिग बुल झुनझुनवालांचा प्रवास खतरनाक

Rakesh Jhunjhunwala biography : 5 हजार रुपयांपासून 39 हजार कोटींचा प्रवास, बिग बुल झुनझुनवालांचा प्रवास खतरनाक

भारताचे वॉरन बफे म्हटल्या जाणार्‍या झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. एका भारतीय टॅक्स अधिकाऱ्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या झुनझुनवालांचा बिग बुल बनण्याचा प्रवास रोमांचकारी आहे.

भारताचे वॉरन बफे म्हटल्या जाणार्‍या झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. एका भारतीय टॅक्स अधिकाऱ्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या झुनझुनवालांचा बिग बुल बनण्याचा प्रवास रोमांचकारी आहे.

भारताचे वॉरन बफे म्हटल्या जाणार्‍या झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. एका भारतीय टॅक्स अधिकाऱ्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या झुनझुनवालांचा बिग बुल बनण्याचा प्रवास रोमांचकारी आहे.

  मुंबई, 14 ऑगस्ट : भारताचे वॉरन बफे म्हटल्या जाणार्‍या झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. (Rakesh Jhunjhunwala biography) एका भारतीय टॅक्स अधिकाऱ्याच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या झुनझुनवालांचा बिग बुल बनण्याचा प्रवास रोमांचकारी आहे. राकेश झुनझुनवाला यांचा जीवनप्रवास मोठा आहे त्यांचा भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठा दबदबा तयार केला आहे. 

  1985 मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात

  राकेश झुनझुनवाला यांनी कॉलेज वयापासून म्हणजे 1985 मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी BSE सेन्सेक्स 150 च्या आसपास होता. आणि झुनझुनवाला यांनी 5000 च्या भांडवलाने गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. फोर्ब्सच्या मते, राकेश झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सध्या सुमारे 4.6 अब्ज डॉलर म्हणजे 39 हजार कोटी रुपये आहे.

  हे ही वाचा : शेअर मार्केटमधील बादशाह राकेश झुनझुनवाला यांचं निधन

  पहिला विजय - 1986 मध्ये तीन महिन्यांत पैसे तिप्पट झाले

  राकेश झुनझुनवाला यांनी टाटा टीकडून शेअर बाजारात पहिला विजय मिळाला. 1986 मध्ये झुनझुनवाला यांनी 5 लाखांचा नफा कमावला होता. त्यांनी टाटा चहाचे 5000 शेअर्स खरेदी केले. बघता बघता अवघ्या तीन महिन्यांत तो १४३ च्या पातळीत जाऊन पोहोचला. त्याचे पैसे 3 पटीने वाढल्याने त्यांना पहिल्यादांच एवढा मोठा फायदा झाला होता.

  हर्षद मेहताच्या काळात झुनझुनवालांचा मोठा दबदबा होता

  The big bull राकेश झुनझुनवाला हर्षद मेहताच्या काळात अस्वल म्हणून ओळखले जायचे. हर्षद मेहता घोटाळा 1992 नंतर झुनझुनवाला यांनी शेअर्स विकून भरपूर पैसे कमवले. झुनझुनवाला यांनी स्वत: एका मुलाखतीत सांगितले की, त्यांनी शेअर्स विकून खूप पैसा कमावला.

   त्यांच्या माहितीनुसार तो एक bear cartel चा भाग होता. अशाच एका bear cartel चे नेतृत्व मनू मानेक करत होते, त्याला black cobra म्हणून ओळखले गेले होते, त्यात राधाकिशन दमानी आणि राकेश झुनझुनवाला यांचा समावेश आहे. हर्षद मेहता यांच्यावर बनवलेल्या स्कॅम 1992 या वेबसिरीजमध्येही या सर्वांचा उल्लेख आहे. पत्रकार सुचेता दलाल यांनी 1992 मध्ये हर्षद मेहता घोटाळा फोडला, त्यानंतर शेअर बाजार कोसळला.

  RARE Enterprises: 'रा' मधून राकेश आणि 'रे' मधून रेखा

  1987 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी रेखा झुनझुनवालासोबत लग्न केले. रेखा झुनझुनवाला या ही शेअर बाजारातील गुंतवणूकदार होत्या. 2003 मध्ये राकेश झुनझुनवाला यांनी स्वतःची स्टॉक ट्रेडिंग फर्म Rare Enterprises सुरू केली. स्वतःच्या आणि पत्नीच्या नावे एकत्र करून हे नाव देण्यात आले.

  हे ही वाचा : Rakesh Jhunjhunwala यांचा सर्वात आवडता होता 'हा' शेअर, ज्यांने अनेक गुंतवणूकदारांना केलं मालामाल

  राकेश झुनझुनवाला यांच्या 37 stocks ची किंमत सुमारे 20 हजार कोटी

  राकेश झुनझुनवाला आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये 31 मार्च 2021 पर्यंत 37 stocks मध्ये सार्वजनिक गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्ये टायटन कंपनी, टाटा मोटर्स, क्रिसिल, ल्युपिन, फोर्टिस हेल्थकेअर, नाझारा टेक्नॉलॉजीज, फेडरल बँक, डेल्टा कॉर्प, डीबी रियल्टी आणि टाटा कम्युनिकेशन्स हे त्यांचे प्रसिद्ध स्टॉक्स आहेत. त्यांची एकूण संपत्ती 19,695.3 कोटी रुपये आहे. यामध्ये घड्याळ आणि दागिने बनवणारी टायटन कंपनी (7,879 कोटी), टाटा मोटर्स (1,474.4 कोटी), क्रिसिल (1,063.2 कोटी) हे त्यांचे सर्वात महत्वाचे स्टॉक आहेत.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Share market, Stock Markets

  पुढील बातम्या