मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Johnson & Johnson कंपनी बंद करणार बेबी पावडरची विक्री; काय आहे कारण?

Johnson & Johnson कंपनी बंद करणार बेबी पावडरची विक्री; काय आहे कारण?

तान्ह्या मुलांसाठी वापरली जाणारी बेबी पावडर म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन. हे नाव बेबी प्रॉडक्ट्सशी गेली कित्येक वर्ष जोडलं गेलं आहे;

तान्ह्या मुलांसाठी वापरली जाणारी बेबी पावडर म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन. हे नाव बेबी प्रॉडक्ट्सशी गेली कित्येक वर्ष जोडलं गेलं आहे;

तान्ह्या मुलांसाठी वापरली जाणारी बेबी पावडर म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन. हे नाव बेबी प्रॉडक्ट्सशी गेली कित्येक वर्ष जोडलं गेलं आहे;

मुंबई, 12 ऑगस्ट-  तान्ह्या मुलांसाठी वापरली जाणारी बेबी पावडर म्हणजे जॉन्सन अँड जॉन्सन. हे नाव बेबी प्रॉडक्ट्सशी गेली कित्येक वर्ष जोडलं गेलं आहे; पण आता मात्र 2023 पासून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी जगभरातील टॅल्क बेस्ड बेबी पावडरची  विक्री पूर्णपणे बंद करणार आहे. या कंपनीच्या वतीनेच ही माहिती देण्यात आली. अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या हजारो कन्झ्युमर सेफ्टी केसेसमुळे या प्रॉडक्ट्सची विक्री बंद करणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. गेली कित्येक वर्षे बेबी पावडर संपूर्ण जगभरात विकली जात आहे; पण आता मात्र जगभरातील पोर्टफोलिओ काढून टाकण्यात येणार आहे. 2020 मध्ये कंपनीनं अमेरिका आणि कॅनडामध्ये पावडरची विक्री बंद केली होती. या पावडरमध्ये अ‍ॅस्बेटॉसचा एक धोकादायक फायबर आढळला होता. हा फायबर कॅन्सर होण्यास कारणीभूत असल्याचं मानलं जात होतं. या प्रकरणी 35 हजार महिलांनी गर्भाशयाचा कॅन्सर होण्याच्या आरोपावरून कंपनीवर खटला दाखल केला होतं. त्यामुळे अमेरिकेत जॉन्सनच्या प्रॉडक्ट्सची मागणी खूपच कमी झाली होती. विक्री कमी झाल्याच्या कारणावरून कंपनीनं 2020 मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये बेबी पावडरची विक्रीच बंद केली होती; पण ब्रिटनसह जगातील अन्य देशांमध्ये मात्र जॉन्सनच्या बेबी पावडरची विक्री सुरूच होती. आता तीसुद्धा बंद होणार आहे. या पावडरमुळे गर्भाशयाचा कॅन्सर होण्याच्या कारणावरून अमेरिकेतील एका कोर्टानं कंपनीला 15 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. कंपनीनं लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ केला आहे, असा ठपका कोर्टानं ठेवला होता. कंपनी त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये अ‍ॅस्बेस्टॉस मिसळत असल्याचा आरोपही कंपनीवर करण्यात आला होता. कंपनीनं जो गुन्हा केला त्याची भरपाई पैशांमध्ये होऊच शकत नाही. पण हा अपराध अत्यंत मोठा आहे, त्यामुळे त्याचा दंड, शिक्षाही मोठ्याच प्रमाणात व्हायला हवी, असंही कोर्टानं थेट सुनावलं होतं. (हे वाचा:बापरे! ब्युटी ट्रिटमेंटचा हा असा कसला भलताच साइड इफेक्ट; 'पाल' बनली महिला ) 1984 पासून जॉन्सन कंपनी बेबी पावडरची विक्री करते. फॅमिली फ्रेंडली असल्याचं दाखवल्यानं ही पावडर म्हणजे कंपनीचं सिंबॉल प्रॉडक्ट बनलं होतं. 1999 पासून कंपनीच्या इंटर्नल बेबी प्रॉडक्ट डिव्हिजनच्या वतीने याचं मार्केटिंग रिप्रेझेंटेशन केलं जात होतं. या सगळ्यांत मुख्य प्रॉडक्ट J & J #1 अ‍ॅसेटच्या रुपात बेबी पावडर असे. आता अमेरिकेत तर जॉन्सनच्या बेबी पावडरची विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. जगातील इतर देशांमध्येही आता ती बंद होईल.
First published:

Tags: Lifestyle, Money

पुढील बातम्या