मुंबई, 13 जुलै : नवोदय विद्यालय समितीनं सर्व इच्छुक आणि योग्य उमेदवारांना असिस्टंट कमिशनर, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, (PGT ), ट्रेनेड ग्रॅज्युएट टीचर ( TGT ),विविध श्रेणीचे शिक्षक, लीगल असिस्टंट या पदांसाठी अर्ज करायला सांगितलंय. जवाहर नवोदय विद्यालयात महिला स्टाफ नर्स, कॅटेगरी सहाय्यक आणि लोअर डिव्हिजन क्लार्क या पदांवर अर्ज मागवलेत.
उमेदवारांनी 9 ऑगस्ट किंवा त्या आधी ऑफिशियल वेबसाइट navodaya.gov.in वर अर्ज करा. शेवटची तारीख आहे 12 ऑगस्ट 2019.
एनव्हीएस भरती 2019 - पदं आणि पदं संख्या
पदांची एकूण संख्या - 2,370
पदांची नावं
असिस्टंट कमिशनर : 5
टीजीटी: 1154
विविध श्रेणी: 564
महिला स्टाफ नर्स: 55
लीगल असिस्टंट : 1
कॅटरिंग असिस्टंट : 26
एलडीसी: 135
कुठल्याही मान्यताप्राप्त संस्थेतून ह्युमॅनिटी, सायन्स, काॅमर्स या शाखेत मास्टर डिगरी , प्रिन्सिपल पदावर असलेले अर्ज करू शकतात.
UGC NET Result June Result 2019: कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो निकाल
प्रशिक्षित ग्रॅज्युएट शिक्षक
NCERT च्या रिजनल काॅलेज ऑफ एज्युकेशनमध्ये कमीत कमी 50 टक्के मार्क मिळवून 4 वर्षाचा इंटिग्रेटेड डिगरी कोर्स उत्तीर्ण केला असेल. किंवा संबंधित विषयात कमीत कमी 50 टक्के मार्क मिळवून ग्रॅज्युएशन डिगरी हवी. उमेदवारानं त्या विषयाचा अभ्यास तीन वर्षातल्या डिगरीमध्ये कमीत कमी 2 वर्ष तरी करायला हवा. किंवा मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीमधून 50 टक्के मिळवून ग्रॅज्युएशन केलेलं असावं.
अधिक माहितीसाठीwww.navodaya.gov.in किंवा www.nvsrecruitment2019.org इथे क्लिक करा.
वयाची मर्यादा
असिस्टंट कमिशनर : जास्तीत जास्त 45 वर्ष
पीजीटी: 40 वर्ष
टीजीटी: 35 वर्ष
लीगल असिस्टंट : 32 वर्ष
कॅटरिंग असिस्टंट: 35 वर्ष
LDC: 27 वर्ष.
आरक्षण असलेल्या उमेदवारांना वयात सरकारी नियमांप्रमाणे सवलत मिळेल.
TVS ने लाँच केली पेट्रोल किंवा वीजेशिवाय चालणारी नवी इको फ्रेंडली बाईक
असा करा अर्ज
navodaya.gov.in किंवा nvsrecruitment2019.org या वेबसाइटवर अर्ज करा. अर्ज ऑनलाइनच स्वीकारले जातील.
अर्ज फी
असिस्टंट कमिशनर: 1,500
पीजीटी, टीजीटी, विविध श्रेणी, शिक्षक आणि महिला स्टाफ नर्स: 1,200
लीगल असिस्टंट, कॅटरिंग असिस्टंट आणि लोअर डिविजन क्लार्क: 1,000
खूशखबर, सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, 'हे' आहेत नवे दर
पगार
असिस्टंट कमिशनर: Pay Matrix ची लेव्हल -12 (78,800-2, 09,200 रुपये)
पीजीटी: Pay Matrix ची लेव्हल -8 (रु 47,600-1, 51,100)
टीजीटी: रु 44,900 ते रु 1, 42,400
कायदा सहाय्यक: रु 35,400 ते 1, 12,400 रु
कॅटरिंग सहाय्यक: रु 25,500 ते रु 81,100
एलडीसी: 19,900 ते 63,200 रुपये
महत्त्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 ऑगस्ट
लिखित परीक्षा, सीबीटीची तारीख : 5 ते 10 सप्टेंबर
VIDEO: एवढी गोंडस परी कुणाला 'नकुशी' झाली?