मुंबई, 10 जुलै : रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डानं 500 हून जास्त उमेदवारांची वेगवेगळ्या पदांवर भरती सुरू केलीय. या पदांमध्ये ज्युनियर इंजीनियर, क्लार्क, स्टेशन मास्टर, नर्सिंग सुप्रिटेंडेंट, लोको इन्स्पेक्टकर आणि सीनियर रेजिडेंट यांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी www.indianrailways.gov वर अर्ज करावा. या उमेदवारांची भरती सेंट्रल रेल्वे, साउथ वेस्टर्न रेल्वे, नाॅर्थ इस्ट फ्रंटइयर रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, साउथ इस्ट सेंट्रल रेल्वे अंतर्गत केली जाईल.
पश्चिम रेल्वे - पश्चिम रेल्वेनं भरती सुरू केलीय. अनेक पदांवर या व्हेकन्सीज आहेत. स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड, कमर्शियल कम टिकट क्लर्क, ट्रेनों क्लर्क या पदांसाठी पश्चिम रेल्वेनं भरती सुरु केली आहे. 1 जुलैपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2019 ही आहे.
फोनमध्ये इंटरनेट नाही? तरीही ट्रान्सफर करू शकता 'असे' पैसे
मध्य रेल्वे - सेंट्रल रेल्वेमध्ये ज्युनियर इंजीनियर, कमर्शियल क्लर्क, पाॅइंटमॅन, सीनियर सेक्शन इंजीनियर अशा अनेक पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. उमेदवारांनी अर्ज करावेत. शेवटची तारीख 19 जुलै आहे.
या पदांसाठी मुंबई सेंट्रल रेल्वेत काम केलेले माजी कर्मचारीही अर्ज करू शकतात. पण यांना फक्त महिन्याचा पगार मिळेल. त्यांना पेन्शन, अंतिम वेतन, सीएल, पीएल या सुट्ट्या मिळणार नाहीत. उमेदवारांची निवड लिखित परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल. या पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै आहे.
स्वस्त सोनं खरेदी करायची संधी, 'ही' आहे मोदी सरकारची खास योजना
साउथ वेस्टर्न रेल्वे - इथे ज्युनियर क्लार्कसह टायपिस्टसाठी 117 पदं, स्टेशनमास्टरसाठी 42 आणि गुड्स गार्डसाठी 20 पदं आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 42 वर्ष हवं. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै आहे.
हत्याकांडात धक्कादायक खुलासा, 'या' कारणामुळे प्रेयसीचा भररस्त्यात गळा चिरला
नाॅर्थ इस्ट फ्रंटियर रेल्वे - इथे नर्सिंग अधीक्षकासाठी 9 पदं, आरोग्य आणि मलेरिया इन्स्पेक्टरसाठी 2, लॅब असिस्टंटसाठी 1, फार्मासिस्टसाठी 1 आणि ईसीजी, टेक्निशियनसाठी 1 अशी पदं आहेत. इंटरव्ह्यूची तारीख 15 जुलै आहे.
साउथ ईस्ट सेंट्रल रेल्वे - इथे कोपा 90 पदं, स्टेनोग्राफर (हिंदी) 20 पदं, स्टेनोग्राफर (इंग्रजी) 20 पदं, फिटर 80 पदं, इलेक्ट्रॉनिक 50 पदं, वायरमॅन 50 पदं, इलेक्ट्रोनिक / मेकॅनिक 6 पद, आरएसी मेकॅनिक 6 पदं, वॉल्डर 40 पदं, प्लंबर 40 पदं, मेसन 10 पदं, पेंटर 10 पदं, कारपेंटर 10 पदं, मशीनिस्ट 10 पदं, टर्नर 10 पदं आणि शीट मेटल वर्करसाठी 10 पदं आहेत.
VIDEO: गोदावरी नदीपात्रात फेसाळ पाणी, प्रशासनाचं दुर्लक्ष