तीनही दलांमध्ये 78,291 पदं रिकामी, लवकरच भरती सुरू

तीनही दलांमध्ये 78,291 पदं रिकामी, लवकरच भरती सुरू

Indian Armed Forces, Office Rank - लष्कर, नौदल आणि वायू दल या तीनही दलांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता जाणवतेय

  • Share this:

मुंबई, 02 जुलै : लष्कर, नौदल आणि वायू दल या तीनही दलांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता जाणवतेय. हा मुद्दा राज्यसभेत एका प्रश्नोत्तरादरम्यान संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी मांडला. राज्यमंत्र्यांनी सांगितलं, तीनही दलांमधली 78,291 पदं रिकामी आहेत. यात 9427 पदं अधिकारी रँकमधली आहेत. तर ज्युनियर लेव्हलची 68,864 पदं  रिकामी आहेत. दुसऱ्या बाजूला अधिकारी नोकरी सोडण्याचा सिलसिला सुरूच आहे.

याबाबत असं सांगण्यात आलंय की तीनही दलांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरुणांना जागरुक केलं जातंय. जाॅब फेअरमध्ये तरुणांना माहिती दिली जाते. वेळोवेळी कँपेन चालवलं जातं. इतर उपायही केले जातात. म्हणजे प्रमोशनमध्ये सुधारणा, आकर्षक वेतन पॅकेज, धोकादायक आव्हान पेललं तर बक्षीसही दिलं जातं, कुटुंबासाठी घर आणि इतर सुविधा अशा गोष्टींचा समावेश केला जातो.

10 वर्ष बँकेत पडून राहिलेल्या पैशांचं काय होतं?

बापरे, 1000 लोकांना कामावरून काढून टाकणार ही टेलिकाॅम कंपनी

तीनही दलात अधिकारी पदं रिकामी

संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितल्याप्रमाणे, अधिकाऱ्यांची 50,312 पदं आहेत.  त्यापैकी 42,913 पदांवर अधिकारी आहेत. म्हणजे 7399 पदं रिकामी आहेत. नौदलात 11,557 अधिकाऱ्यांची पदं आहेत. त्यात 10,012 पदांवर अधिकारी आहेत. त्यातली 1545 पदं रिकामी आहेत. वायू दलात एकूण 12,625 पदं आहेत. त्यात 483 पदं रिकामी आहेत. तीनही दलात एकूण 9427 पदं रिकामी आहेत.

दर महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे असतील तर सुरू करा 'हा' व्यवसाय

तीनही दलात पर्सनल बिलो आॅफिसर (PBOR )ची पदं रिकामी

लष्करात 38,325, नौदलात 16,806 पदं रिकामी आहेत. वायुदलात 13, 823 पदं रिकामी आहेत. याशिवाय 1718 पदांवरचे एपीएस नाॅन-रेग्युलर जेसीओ आणि 10,486 जवान आता लष्करात वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्राथमिक ट्रेनिंग करतायत.

VIDEO: विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 2, 2019 05:56 PM IST

ताज्या बातम्या