मुंबई, 18 जुलै : नौदलात नोकरी करण्याची चांगली संधी आहे. सेलर पदासाठी भरती सुरू होणार आहे. या पदासाठी 400 जागा आहेत. 10वी उत्तीर्ण झालेल्यांना ही संधी आहे.
पदाचं नाव - सेलर (MR) एप्रिल 2020 बॅच
एकूण जागा - 400
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण
या पदासाठी शारीरिक पात्रतेची गरज असते. उमेदवाराची उंची किमान 157 सेंमी हवी.
पुणे महानगरपालिकेत 45 जागांवर भरती, 'या' पदासाठी करा अर्ज
शारीरिक फिटनेस चाचणी - 7 मिनिटात,1.6 किमी धावणे, 20 स्क्वॅट अप (उठाबशा) आणि 10 पुश-अप
वयाची अट - जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2003 दरम्यान हवा.
नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे.
अर्जाची फी - 205 रुपये, SC, ST साठी फी नाही
पुन्हा सोनं झालं महाग, 'हा' आहे 10 ग्रॅमचा दर
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 1 ऑगस्ट 2019
अर्ज ऑनलाइनच करू शकता. 26 जुलै 2019 पासून अर्ज करता येतील. त्यासाठी https://www.joinindiannavy.gov.in/en/account/login इथे क्लिक करा.
याशिवाय भारतीय लष्करानं JAG एन्ट्री स्कीम नोटिफिकेशन प्रसिद्ध केलंय. लष्करात लाॅ ऑफिसरच्या पदासाठी भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 14 ऑगस्टच्या आधी अर्ज करावा. या पदासाठी 8 जागा आहेत.
Income Tax रिटर्न भरताना खोट्या भाडेपावत्या देत असाल तर 'असे' याल अडचणीत
लष्करात लाॅ ऑफिसर म्हणून नोकरी हवी असेल तर उमेदवाराकडे LLB पदवी हवी. परीक्षेत 55 टक्के मिळवून उत्तीर्ण झालं असलं पाहिजे.
उमेदवार बार काउन्सिल ऑफ इंडियासोबत वकील हवा. त्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 27 वर्षाच्या मधे असावं. मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचे जे नियम आहेत त्याप्रमाणे वयात सवलत मिळेल.
अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in वर क्लिक करा. अर्ज 14 ऑगस्टआधी करावा. लाॅ ऑफिसर पदासाठी 5 पुरुष आणि 3 महिला निवडल्या जातील.
कशी होईल निवड?
पहिल्यांदा अर्ज शाॅर्ट लिस्ट केले जातील. उमेदवारांना ईमेलद्वारे कळवलं जाईल. सेंटरची माहिती दिली जाईल.
त्यानंतर उमेदवाराला SSB परीक्षेची तारीख निवडावी लागेल. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह यावर ही निवड होईल.
दोन भागात पेपर असतील. पहिला पेपर उत्तीर्ण झाला तर दुसरा देता येईल.
त्यानंतर इंटरव्ह्यू आणि वैद्यकीय तपासणी होईल.
VIDEO : उभ्या गाडीला लागली अचानक आग, नंतर झाला भीषण स्फोट