Elec-widget

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर पदासाठी भरती, 'या' उमेदवारांनी करा अर्ज

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर पदासाठी भरती, 'या' उमेदवारांनी करा अर्ज

Bank job, Maharashtra Bank - तुम्हाला बँकेत नोकरी करायची चांगली संधी आहे. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट : तुम्हाला बँकेत नोकरी करायचीय? मग चांगली संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रनं स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी प्रसिद्धीपत्रक काढलंय. बँकेनं लॉ ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर, फायर ऑफिसर, मॅनेजर काॅस्टिंग, इकॉनाॅमिस्ट आणि इन्फॉर्मेशन सिस्टम या पदांसाठी अर्ज मागवलेत. इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी ऑफिशियल वेबसाइटवर 5 ते 19 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत.

बँक ऑफ महाराष्ट्रनं एकूण 46 व्हेकन्सीज् आहेत.

पदं आणि पदसंख्या

लॉ ऑफिसर -  2

सिक्युरिटी ऑफिसर - 12

Loading...

फायर ऑफिसर - 1

मॅनेजर काॅस्टिंग - 1

इकॉनाॅमिस्ट - 1

इन्फॉर्मेशन सिस्टम- 5

EPFO नं बदलला PF मधून पैसे काढण्याचा नियम, 'या' आहेत नव्या अटी

शैक्षणिक पात्रता

लॉ ऑफिसर स्केल 2 - या पदासाठी उमेदवाराकडे लाॅची पदवी हवी. त्यात 55 टक्के मार्क हवेत. आरक्षित उमेदवारासाठी 5 टक्के सूट मिळेल. याशिवाय उमेदवाराकडे वकील आणि लाॅ ऑफिसरचा अनुभवही हवा.

सिक्युरिटी ऑफिसर स्केल 2 - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कुठल्याही विषयातली पदवी हवी. 5 वर्ष Armed Forces / Paramilitary Forces मध्ये Commissioned Officer म्हणून काम करण्याचा अनुभव हवा.

पेट्रोलच्या किमतीत घसरण, 'हे' आहेत आजचे भाव

फायर ऑफिसर स्केल 2 - BE (Fire)सोबत NFSC मधून ग्रॅज्युएट हवं. UGC मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीची डिगरी हवी. NFSC मधून स्टेशन ऑफिसर कोर्स केलेला असला  पाहिजे. तीन वर्ष कामाचा अनुभवही हवा.

मॅनेजर काॅस्टिंग स्केल 2, इकाॅनाॅमिस्ट स्केल 2, इकाॅनाॅमिस्ट स्केल 4 आणि इन्फाॅर्मेशन सिस्टिम ऑडिटर स्केल 3साठी इथे क्लिक करा -    शैक्षणिक पात्रता आणि बाकी डिटेल्स

याशिवाय जळगावमध्ये जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेत व्हेकन्सी आहे. इथे 220 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. योग्य आणि इच्छुक उमेदवारांनी JDCC बँकेच्या jdccbank.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

पदवीधरांना मुंबई हाय कोर्टात नोकरीची संधी, 'असा' करा अर्ज

या पदांसाठी 20 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता. 20 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. या पदासाठी अर्ज केल्यानंतर ऑनलाइन प्रिंटआउट घेण्याची शेवटची तारीख आहे 4 सप्टेंबर. या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेकडून 50 टक्के मार्क मिळवून पदवीधर हवा. उमेदवाराचं वय 21 ते 30 वर्षाच्या आत हवं.

VIDEO: उद्धव ठाकरेंकडून मोदी सरकारचं तोंडभर कौतुक तर विरोधकांना खोचक सल्ला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Aug 5, 2019 02:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...