LIC मध्ये नोकरी करण्याची संधी, 'या' उमेदवारांनी करा अर्ज

LIC मध्ये नोकरी करण्याची संधी, 'या' उमेदवारांनी करा अर्ज

LIC - तुम्हाला LIC मध्ये नोकरी करायची असेल तर पुढीलप्रमाणे योग्यता हवी

  • Share this:

मुंबई, 08 ऑगस्ट : तुम्हाला LIC मध्ये नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्समध्ये असिस्टंट आणि असोसिएट मॅनेजर या पदांसाठी व्हेकन्सी आहे. या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. LIC नं मॅनेजर पदांसाठी जी व्हेकन्सी काढलीय त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 20 ऑगस्ट.

एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या ऑफिशियल वेबसाइट www.lichousing.com वर माहिती दिलीय. असिस्टंट आणि असोसिएट मॅनेजरसाठी 300 जागा आहेत. या पदांवर निवड मेरिटच्या आधारे होईल.

या महिन्याच्या शेवटी बदलेल तुमच्या टीव्हीचा सेटटाॅप बाॅक्स, कारण...

शैक्षणिक पात्रता

असिस्टंट आणि असोसिएट मॅनेजर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे 55 टक्के मार्क हवेत.

असोसिएट पदासाठी पदवी परीक्षेत 60 टक्के गुण हवेत.

असिस्टंट मॅनेजर पदासाठी पदवीबरोबर एमबीए डिगरीही हवी.

वयाची मर्यादा

दोन्ही पदांसाठी उमेदवाराचं वय 21 ते 28 वर्षापर्यंत हवं. एलआयसी एचएफएलच्या मॅनेजर पदांसाठी लिखित परीक्षा आणि इंटरव्ह्यूनंतर निवड होईल.

सौर पॅनल लावून करा घरबसल्या कमाई, 'असे' मिळवता येतील पैसे

याशिवाय, तुम्हाला बँकेत नोकरी करायचीय? मग चांगली संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रनं स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी प्रसिद्धीपत्रक काढलंय. बँकेनं लॉ ऑफिसर, सिक्युरिटी ऑफिसर, फायर ऑफिसर, मॅनेजर काॅस्टिंग, इकॉनाॅमिस्ट आणि इन्फॉर्मेशन सिस्टम या पदांसाठी अर्ज मागवलेत. इच्छुक उमेदवारांनी या पदांसाठी ऑफिशियल वेबसाइटवर 5 ते 19 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत.

बँक ऑफ महाराष्ट्रनं एकूण 46 व्हेकन्सीज् आहेत.

पदं आणि पदसंख्या

लॉ ऑफिसर -  2

सिक्युरिटी ऑफिसर - 12

फायर ऑफिसर - 1

मॅनेजर काॅस्टिंग - 1

इकॉनाॅमिस्ट - 1

इन्फॉर्मेशन सिस्टम- 5

शैक्षणिक पात्रता

लॉ ऑफिसर स्केल 2 - या पदासाठी उमेदवाराकडे लाॅची पदवी हवी. त्यात 55 टक्के मार्क हवेत. आरक्षित उमेदवारासाठी 5 टक्के सूट मिळेल. याशिवाय उमेदवाराकडे वकील आणि लाॅ ऑफिसरचा अनुभवही हवा.

सिक्युरिटी ऑफिसर स्केल 2 - या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कुठल्याही विषयातली पदवी हवी. 5 वर्ष Armed Forces / Paramilitary Forces मध्ये Commissioned Officer म्हणून काम करण्याचा अनुभव हवा.

फायर ऑफिसर स्केल 2 - BE (Fire)सोबत NFSC मधून ग्रॅज्युएट हवं. UGC मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटीची डिगरी हवी. NFSC मधून स्टेशन ऑफिसर कोर्स केलेला असला  पाहिजे. तीन वर्ष कामाचा अनुभवही हवा.

मॅनेजर काॅस्टिंग स्केल 2, इकाॅनाॅमिस्ट स्केल 2, इकाॅनाॅमिस्ट स्केल 4 आणि इन्फाॅर्मेशन सिस्टिम ऑडिटर स्केल 3साठी इथे क्लिक करा -    शैक्षणिक पात्रता आणि बाकी डिटेल्स

आईने प्राण सोडले पण लेकरू सोडलं नाही, काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

Published by: Sonali Deshpande
First published: August 9, 2019, 6:42 AM IST
Tags: LIC

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading