बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ, नवी आकडेवारी जाहीर

बेरोजगारीच्या दरात मोठी वाढ, नवी आकडेवारी जाहीर

कामगार दिनाच्या दिवशी काही आकडेवारी बाहेर आली. त्यामुळे तरुणांमध्ये निराशेचं वातावरण पसरलंय.

  • Share this:

मुंबई, 03 मे : कामगार दिनाच्या दिवशी काही आकडेवारी बाहेर आली. त्यामुळे तरुणांमध्ये निराशेचं वातावरण पसरलंय. सेंटर फाॅर माॅनिटरिंग इंडियन इकाॅनाॅमी ( CMIE )नं जाहीर केलेल्या सर्वेक्षणानुसार एप्रिल महिन्यात देशात बेरोजगारीचा दर वाढलाय. तो 7.6 टक्के झालाय. आॅक्टोबर 2016नंतरचा हा सर्वात मोठा दर आहे. मार्चमध्ये तो 6.71 टक्के होता.

Pan Card साठी अर्ज करताना 'या' चुका करू नका

मुंबईमधल्या सीएमआयचे प्रमुख महेश व्यास यांनी राॅयटर्सची बोलताना सांगितलं की, मार्चनंतर बेरोजगारीचा दर वाढलाय. सध्या सगळीकडे निवडणुकांचा माहोल आहे. मोदी सरकार बेरोजगारीवर कमी भाष्य करतंय. पण विरोधी पक्ष हा मुद्दा उचलून धरतायत.

या निवडणुकीच्याच काळात एका कमर्शियल सर्वेक्षणानुसार एप्रिलमध्ये आठ महिन्यात कारखान्यांच्या कारभारात हळूहळू विस्तार झालाय, हे जाणवलं.  उत्पादनांची मागणी वाढलीय.

उत्तर प्रदेशात भाजपला बसू शकतो मोठा धक्का, 'या' नेत्याची उमेदवारी धोक्यात

उत्पादनं करणाऱ्या कंपनीज मेमध्ये येणारं नवं सरकार कुठली नीती वापरतेय, या विचारांमध्ये आहे.

सरकारनं सध्या नोकऱ्यांची आकडेवारी जाहीर करण्यावर बंदी घातलीय. अधिकाऱ्यांनी सांगितलंय की याची तपासणी करणं आवश्यक आहे.

भारत प्रत्येक 5 वर्षांनी बेरोजगारीची अधिकृत आकडेवारी सादर करतं. पण डिसेंबरमध्ये बेरोजगारीचे आकडे लीक झाले होते. तेव्हा कळलं की 2017-18मध्ये असलेली बेरोजगारी ही गेल्या 45 वर्षांतली सर्वात जास्त असलेली बेरोजगारी आहे.

भारतीय लष्कर – दहशतवाद्यांमध्ये चकमक; बुरहान वाणीच्या गँगमधील या दहशतवाद्याचा खात्मा

काही दिवसांपूर्वी NSSO या संस्थेनं बेरोजगारीबाबतची आकडेवारी दिली होती. पाच वर्षांत जवळपास दोन कोटी पुरूष बेरोजगार झाले, असा धक्कादायक खुलासा NSSO (नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस) च्या रिपोर्टमधून झाला आहे. याबाबत 'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी दैनिकाने वृत्त दिलं होतं.

केंद्रातील मोदी सरकारने दरवर्षी कोट्यवधी युवकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण आता समोर आलेल्या नव्या आकडेवारीने सरकारच्या दाव्यांना धक्का दिला. NSSO ने केलेला सर्व्हे अडचणीचा असल्यानेच सरकार जाणून-बुजून हा सर्व्हे प्रकाशित करत नसल्याचा आरोप आता केला जात आहे.

'2017-18 या वर्षात NSSO ने केलेल्या सर्व्हेमधून खुलासा झाला आहे की, पुरुष कामगारांची संख्या 28 कोटी 60 लाख एवढी घसरली आहे, जी 2011-12 मध्ये 30 कोटी 40 लाख एवढी होती. तसंच 2011-12 पासून आतापर्यंत एकूण 4 कोटी 70 लाख रोजगार कमी झाले आहेत. या रिपोर्टमध्ये शहरी आणि ग्रामीण भागाची वेगवेगळी आकडेवारीही देण्यात आली आहे. त्यानुसार शहरात बेरोजगारी दर 7.1 टक्के एवढा राहिला आहे तर ग्रामीण भागात हा दर 5.8 टक्के एवढा आहे.' असं इंडियन एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं होतं.

ओडिशामध्ये समुद्रकिनारा खवळला, पाहा थेट LIVE दृश्य

First published: May 3, 2019, 11:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading