मुंबई, 18 मे : मोदी सरकारच्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या बुलेट ट्रेनचं काम जोरदार सुरू आहे. आता नॅशनल हाय स्पीड काॅर्पोरेशन लिमिटेड ( NHSRCL )नं भरती सुरू केलीय. पहिल्या बॅचच्या कर्मचाऱ्यांसाठी भरती सुरू आहे. यात स्टेशन आॅपरेशन, ट्रेन आॅपरेशन, रोलिंग स्टाॅक, सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अँड ट्रॅक अशा आॅपरेशन आणि मेन्टेनन्स पदासाठी 13 जणांची नियुक्ती केली जाईल. हे लोक मुंबई ते अहमदाबाद हाय स्पीडनं जाणाऱ्या 508 किमी लांब रस्त्यावरच्या या प्रोजेक्टचं काम पाहतील.
आता ज्येष्ठ नागरिकांना मेडिकल इन्शुरन्स नसला तरी मिळेल दिलासा
NHSRCL नं 13 पदांसाठी व्हेकन्सी काढलीय. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या लोकांना जपानी भाषेचं ज्ञान हवं. या पदासाठी संबंधी सर्व माहिती nhsrcl.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. ट्रेनिंगसाठी उमेदवारांना जपानला पाठवलं जाईल.
हे 13 उमेदवार भारतात येऊन इतर लोकांना प्रशिक्षण देतील. या आर्थिक वर्षात 26 ड्रायव्हर्सना बुलेट ट्रेनचं ट्रेनिंग दिलं जाईल. पुढच्या वर्षात आणखी 30 कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जाईल.
आता इंटरनेटशिवाय BHIM App च्या मदतीनं करा पैसे ट्रान्सफर, 'हे' आहेत फीचर्स
पहिली बुलेट ट्रेन मुंबईहून अहमदाबाद 508.17 कि.मी. प्रवास करेल. यात ती महाराष्ट्रात 155.76 किमी, गुजरातमध्ये 384.04 किमी आणि दादर नागर हवेलीत 4.3 किमी प्रवास करेल.
बळीराजासाठी आनंदवार्ता, मान्सून अंदमानात दाखल!
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या मार्गावर अहमदाबाद, आनंद, साबरमती, भरुच, सूरत, बिलिमोरा, वडोदरा, बोईसर, विरार, वापी, ठाणे आणि मुंबई या 12 स्टेशन्सवर थांबेल. पहिली बुलेट ट्रेन रात्री 8.30 ते 9च्या मध्ये चालेल. ही ट्रेन समुद्राच्या खालूनही जाईल.
वर्षाच्या सुरुवातीला रेल्वे बोर्डानं 10 बुलेट ट्रेन बनवणार असल्याचं सांगितलंय. या 10 मार्गांवर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचा खर्च 10 लाख कोटी आहे.
ही ट्रेन दिल्ली-अमृतसर, दिल्ली- मुंबई, दिल्ली- कोलकाता, दिल्ली-वाराणसी, चेन्नई-बंगळुरू, पाटणा-कोलकाता या मार्गांवर चालेल.
VIDEO : माझ्या नवऱ्याची दुसरी बायको, मग काय पत्नीने शिकवला असा धडा!