भारतीय लष्करात लाॅ ऑफिसरसाठी भरती, 'अशी' होईल निवड

भारतीय लष्करात लाॅ ऑफिसरसाठी भरती, 'अशी' होईल निवड

Indian Army, Law Officer - भारतीय लष्करात व्हेकन्सी आहे. त्यात महिलांनाही संधी आहे

  • Share this:

मुंबई, 17 जुलै : भारतीय लष्करानं JAG एन्ट्री स्कीम नोटिफिकेशन प्रसिद्ध केलंय. लष्करात लाॅ ऑफिसरच्या पदासाठी भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 14 ऑगस्टच्या आधी अर्ज करावा. या पदासाठी 8 जागा आहेत.

लष्करात लाॅ ऑफिसर म्हणून नोकरी हवी असेल तर उमेदवाराकडे LLB पदवी हवी. परीक्षेत 55 टक्के मिळवून उत्तीर्ण झालं असलं पाहिजे.

खूशखबर! आज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या नवे दर

उमेदवार बार काउन्सिल ऑफ इंडियासोबत वकील हवा. त्यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 27 वर्षाच्या मधे असावं. मागासवर्गीयांसाठी आरक्षणाचे जे नियम आहेत त्याप्रमाणे वयात सवलत मिळेल.

अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in वर क्लिक करा. अर्ज 14 ऑगस्टआधी करावा. लाॅ ऑफिसर पदासाठी 5 पुरुष आणि 3 महिला निवडल्या जातील.

सशस्त्र सीमा दलात 150 जागांवर व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

कशी होईल निवड?

पहिल्यांदा अर्ज शाॅर्ट लिस्ट केले जातील. उमेदवारांना ईमेलद्वारे कळवलं जाईल. सेंटरची माहिती दिली जाईल.

त्यानंतर उमेदवाराला SSB परीक्षेची तारीख निवडावी लागेल. फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह यावर ही निवड होईल.

दोन भागात पेपर असतील. पहिला पेपर उत्तीर्ण झाला तर दुसरा देता येईल.

त्यानंतर इंटरव्ह्यू आणि वैद्यकीय तपासणी होईल.

Income Tax रिटर्न भरायची तारीख चुकवलीत तर काय होईल?

लष्कर, नौदल आणि वायू दल या तीनही दलांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता जाणवतेय. हा मुद्दा राज्यसभेत एका प्रश्नोत्तरादरम्यान संरक्षण राज्य मंत्री श्रीपाद नाईक यांनी मांडला. राज्यमंत्र्यांनी सांगितलं, तीनही दलांमधली 78,291 पदं रिकामी आहेत. यात 9427 पदं अधिकारी रँकमधली आहेत. तर ज्युनियर लेव्हलची 68,864 पदं  रिकामी आहेत. दुसऱ्या बाजूला अधिकारी नोकरी सोडण्याचा सिलसिला सुरूच आहे.

याबाबत असं सांगण्यात आलंय की तीनही दलांमध्ये अधिकाऱ्यांची कमतरता पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरुणांना जागरुक केलं जातंय. जाॅब फेअरमध्ये तरुणांना माहिती दिली जाते. वेळोवेळी कँपेन चालवलं जातं. इतर उपायही केले जातात. म्हणजे प्रमोशनमध्ये सुधारणा, आकर्षक वेतन पॅकेज, धोकादायक आव्हान पेललं तर बक्षीसही दिलं जातं, कुटुंबासाठी घर आणि इतर सुविधा अशा गोष्टींचा समावेश केला जातो.

मला खल्लास केलं तुझ्या नादाने, आजीबाईंचा VIDEO तुफान व्हायरल

First published: July 17, 2019, 8:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading